Skip to main content

संस्कृती

प्राचीन साहित्यातील वसंतोत्सव

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 15/03/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
वसंत ऋतू म्हटल्यावर त्याची सांगड बहरलेले आम्रतरु, फुललेले पलाशवृक्ष, शीतल वारे, कोकिळगान, रंगोत्सव व गंधोत्सवाशी घातली जाते. शिशिराच्या कडाक्याच्या थंडीनंतर वसंत ऋतू अवतरतो तेच झाडांच्या निष्पर्ण फांद्यांवर हिरवी, कोवळी, लुसलुशीत पालवी पांघरून! कवी, प्रेमी, कलासक्त, रसिक जनांसाठी वसंतोत्सव म्हणजे साक्षात पर्वणीच! होळी, वसंतपंचमी व शिवरात्री हे तिन्ही उत्सव ह्याच काळात येतात. आपले पूर्वज हा वसंत ऋतूचा उत्सव कसा साजरा करायचे ह्याचीही अतिशय रोचक वर्णने प्राचीन साहित्यात वाचायला मिळतात. पौराणिक कथांच्या अनुसारे वसंत हा कामदेवाचा पुत्र!

खतरनाक पीजे

लेखक नाम्या झंगाट यांनी सोमवार, 15/03/2010 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर....... एक विरंगुळा म्हणून काही खतरनाक पीजे ...... १. प्यार म्हणजे काय................????? २. रवीवार सोमवार पेक्षा जास्त strong का? ३. असे काय की जे राम करु शकतो पण रावण नाही आणि रावण करु शकतो पण राम नाही??? ४. "क्युं की सास भी कभी बहु थी"मधील "बा" का मरत नाही..... आजसाठी इतकेच...बाकी उद्या.................. : : : : : : : : : : : : : : : : : : : : : : उत्तर :- १. काही मित्र बार मधे बसलेले असतात आणि दुस-या मित्राला म्हणतात.... .................................................. पि....यार ....!

या नाडीला लिहितो? कोण एक सारखी नसती दोन...

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 13/03/2010 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
या नाडीला लिहितो? कोण एक सारखी नसती दोन...
नाडीग्रंथांतील अदभूतता मला सागराच्या धीरगंभीर अथांगपणाच्या, हिमालयाच्या उत्तुंगतेच्या, अमरनाथ गुहेतील रात्रीच्या काळोख्याच्या, खोल दरीत आणखी पुढे जाऊन डोकावताना थरारण्याच्या इंद्रधनुच्या अदृष्य रंगबहाराच्या अनुभूतीप्रमाणे खुणावते.
मालकंसाची लकेर हवेत विरते आहे. संतूरवर शिवरंजनी शहारे आणणारे तरंग धुंद करतेय. बासरीच्या मधुर स्वरांनी वसंत बहारला आहे.

एक टुमदार गाव - माझे माधवनगर

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 13/03/2010 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक टुमदार गाव - माझे माधवनगर भाग १- (सन १९६० ते १९७०च्या आसपासच्या आठवणी) माधवनगर गाव तस फार लहान. पण आखीव आणि टुमदार. सांगली व बुधगाव संस्थानांच्या मधे पुणे-बंगलोर मीटर गेजलाईनवर मिरजेच्या आधीचे स्टेशन. तर दुसऱ्या बाजूला किर्लोस्करवाडी जवळचे. पुण्याहून सांगलीला उतरणाऱ्यांना सोईचे म्हणून रेल्वेस्टेशनवर गर्दी. तरतरीत घोड्याचे व गोंडेदार टांगे, एसटी बस वाहतुकीची साधने तर बाकीचे सायकल स्वार. बुधगावच्या वाटेवर स्व. गंगाधर नातू शेठजींची माधवनगर कॉटन मिल तर सांगलीच्या रस्यावर स्व.

सविताभाभी

लेखक ब्रिटिश यांनी शुक्रवार, 12/03/2010 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
पाचेक वर्सापुर्वी जगन मारवाड्यान गावान दुकान टाकलवत. ईन मीन तिनशे घरं. कीराणा आनाला पार हायवे पोतूर जाव लागाच. सरपंचान जराशी जमिन दिल्लीवती. त्याच्यानच खोपटीसारक दूकान न पाटीमाग रायची खोली. मारवाड्याच लग्न झाल्त पन येकटाच आल्ता. आस्ती आस्ती गावची नाडी त्यान पकरली. लोकांना ऊधार द्याची सुरवात केली. उधारी वाडली क त्यांचेकडशी भात घेवाचा न मार्केट मदी विकाचा. आनि उधारी कती पैशे लावाचा ते त्याजं त्याला माईती. पाच वर्सात पक्क दुकान केल. खाडीजवल येकराच जमीनीत घर बांदल. न धा बारा दीवस आदी बायकोला झेउन आला. त्याला पॉर नवत. मना तो सगल काय सांगाचा. माजि न त्याची लय संगत व्हती.

मस्यशेती विषयी माहिती हवी आहे

लेखक संजा यांनी बुधवार, 10/03/2010 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो नमस्कार मला मस्यशेती विषयी मराठीतून शैक्षणीक, व्यवस्थापन, मार्केट, मस्यप्रकार अशी संपूर्ण माहीती देणार्‍या संस्थळा विषयी माहिती हवी होती. जाणकारांनी क्रुपया मदत करावी (माहीती मिळालावर धागा ऊडवला तरी चालेल.) संजा.

तात्यांचे आणि मिसळपावचे अभिनंदन ( लोकसत्ता ०७/०३/२०१०)

लेखक JAGOMOHANPYARE यांनी रविवार, 07/03/2010 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या लोकसत्तामध्ये मिसळपाव आणि तात्या यांची एक बातमी आहे. अभिनंदन. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=52…