Skip to main content

संस्कृती

जय भवानी ............. जय शिवाजी.........

लेखक विनोदबाण़खेले यांनी बुधवार, 03/03/2010 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
जय भवानी जय शिवाजी........................ निश्चयाचा महा मेरु , बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी......... यशवंत,कीर्तिवंत, सामर्थ्यवंत,वरदवंत, पुण्यवंत,नीतिवंत, जाणता राजा

भुर्जपत्र ते वेबपेज

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 03/03/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
भुर्जपत्र ते वेबपेज हा साहित्यप्रवास उलगडणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात संमेलन पुर्व संमेलनात झाला. किरण ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. डॊ सतिश देसाई यांनी एकुण कार्यक्रमाची रुपरेषा व संकल्पना सांगितली. परिसंवादाला प्रसिद्ध लेखक अनिल अवचट, मराठी अंकाचे ई संपादक व कवि महेश घाटपांडे, साहित्यक व समन्वयक मिलिंद जोशी, पत्रकारिता क्षेत्रातील माजी संपादिका साप्ताहिक सकाळ श्रीमती संध्या टांकसाळे, वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रमुख उज्वला बर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी ब्लॊगर व स्टार माझाचे सहा. निर्माते प्रसन्न जोशी यांनी केले. अनिल अवचटांनी आपला संगणक प्रवास सांगितला.

बांगड्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 28/02/2010 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
नगरला लहानपणी वाड्या मधे कासार यायचा..पाठीवर पेटारा असायचा... आत रंगी बेरंगी बांगड्या..आला कि मजेदार आरोळी द्यायचा...बांगड्या घ्या बांगड्या ..बायकाना विकत..पुरुषाना फुकट..असे एकले की आम्ही मुले हसायचो...आज आठवले कि त्याच्या त्या स्लोगन च्या कल्पकतेची मजा वाटते.

'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 27/02/2010 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज २७ फेब्रुवारी. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन म्हणजेच आपला मराठी भाषा दिन. तमाम मराठी बांधवांना 'मिसळपाव' परिवाराकडून 'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!

नवीन मराठी संस्थळ- http://thinkmaharashtra.in/

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 26/02/2010 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकर, येत्या पाच मार्च रोजी http://thinkmaharashtra.in/ या संस्थळाचे उदघाटन आहे. मी आणि तात्या याप्रसंगी होणार्‍या चर्चेत सहभागी होणार आहोत. मला मिळालेले हे आमंत्रण मी तुमच्या समोर ठेवत आहे. सध्या हे संस्थळ प्रायोगीक तत्वावर सुरु झाले आहे. समस्त मिपाकर आणि मराठी अनुदिनीकारांना एक नम्र विनंती. आपल्या आणि आपल्याला माहीती असलेल्या मराठी ब्लॉगर्सची माहीती कृपया द्यावी.(म्हणजे मला गृहपाठ करून जाता येईल.) आमंत्रणाची प्रत देत आहे. धन्यवाद. ************************************************************************ मा.

&%^$@# !!!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 24/02/2010 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
दचकायला काय झालं? .... ते शीर्षक तसंच आहे.... &%^$@# !!! चाणाक्ष लोकांच्या लक्षात आलंच असेल... &%^$@# !!! म्हणजे काय ते. ज्यांच्या आलं नसेल त्यांच्या लवकरच येईल. :) तर झालं काय... नुकताच सौदी अरेबियामधे जाण्याचा योग आला होता. दिवसभर कस्टमरकडे राबराबून मी माझ्या एक दोन सहकार्‍यांबरोबर गेस्टहाउसकडे परत चाललो होतो. ऑफिसमधून बाहेर आलो आणि टॅक्सीला हात केला. टॅक्सी थांबली. आखाती देशात सहसा टॅक्सीवाले पाकिस्तानी किंवा भारतियच असतात. तसे असले तर गप्पा मारत प्रवास होतो. पण त्या दिवशीचा टॅक्सीवाला नेमका येमेनी होता... टॅक्सी सुरू झाली. गडी भलताच गप्पिष्ट होता. त्याची अखंड बडबड सुरू झाली.

असेही हळदीकुंकू

लेखक रेवती यांनी सोमवार, 22/02/2010 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
(लेखातील व्यक्तींची नावे काल्पनिक आहेत. साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) "अगं हो, मला वाटलंच होतं तू फोन करणार म्हणून, पण पाच घरी हळदीकुंकू म्हणजे वेळ लागला परत येतायेता!" सौ. सासूबाई संक्रांतीच्या हळदीकुंकवांबद्दल सांगत होत्या. कुलकर्ण्यांकडे प्लास्टिकच्या टोपल्या तर देशपांड्यांकडे बांगड्या लुटल्या.......कान्हेरे आज्जींकडे डाळतांदळाची खिचडी........असं बोलणं झालं. अश्या प्रकारांमध्ये मला फारच इंटरेस्ट होता. कोणाकडे नविन सुना आल्यात? त्यांच्याकडच्या पहिल्या हळदीकुंकवाला कायकाय झालं? कोणी काय डिश ठेवली होती हेही विचारून झालं.

गुंडाळलेल्या कापडाची कहाणी!

लेखक नीधप यांनी मंगळवार, 16/02/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणापासून नव्वारी साडी म्हणजे काहीतरी प्रचंड अवघड, गूढ आणि एकदम खानदानी प्रकरण असावं असा एक समज बसला होता डोक्यात. माझी आजी काही नव्वारी नेसत नाही. पण नव्वारी नेसणार्‍या लांबच्या आज्या घरी आल्या की मला खूप मस्त वाटायचं. आपल्या नात्यात पण हे अवघड आणि खानदानी प्रकरण आहे याचं समाधान वाटायचं. पण तरी कधी नव्वारी नेसून बघण्याचा प्रयत्न केला नव्हता. 'जाणता राजा' नाटकात मी सामील झाले मग नव्वारी नेसायला शिकणं, नेसणं, नेसवणं हे ओघानेच आलं.