पल पल है भारी.. (येथे ऐका)
स्वदेस चित्रपटातल्या रामलिलेतलं एक अतिशय सुंदर गाणं..
पल पल है भारी वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई..
स्वराच्या तबल्याचा छान भजनी ठेका. जौनपुरी रागातला सुंदर मुखडा. राग जौनपुरी. आपल्या रागसंगीतातला एक अतिशय गोड, कारुण्याने भरलेला राग!
आओ रघुवीर आओ, रघुपति राम आओ
मोरे मन के स्वामी, मोरे श्रीराम आओ
या पुढल्याच ओळीत जौनपुरी बदलला आहे.. जौनपुरीत वर्ज्य असलेले शुद्ध गंधार, शुद्ध निषाद अचानक ताबा घेतात आणि जौनपुरीच्या सुरावटीत हा अचानक झालेला बदल कानाला सुखावून जातो.
राम-राम जपती हूँ, सुन लो मेरे राम आओ
राम-राम जपती हूँ, सुन लो मेरे राम जी
पुन्हा एकदा कोमल गंधाराचं राज्य!
बजे सत्य का डंका, जले पाप की लंका
इसी क्षण तुम आओ, मुक्त कराओ,
सुन भी लो अब मेरी दुहाई
गाडीनं पुन्हा रुळ बदलले..'सुन भी लो अब मेरी दुहाई' हे शब्द खूप छान पडले आहेत, लयीत पडले आहेत..
राम को भूलो, ये देखो रावन आया है
फैली सारी सृषटी पर जिसकी छाया है
क्यों जपती हो राम\-राम तुम?
क्यों लेती हो राम नाम तुम?
राम\-राम का रटन जो ये तुमने है लगाया
सीता, सीता तुमने राम में ऐसा क्या गुन पाया?
ही रावणाची कोरस एन्ट्री ठीक आहे! :)
गिन पायेगा उनके गुण कोई क्या,
इतने शब्द ही कहाँ हैं
पहुंचेगा उस शिखर पे कौन भला,
मेरे राम जी जहाँ हैं
क्या बात है.. गाण्याच्या सुरावटीत आता जयजयवंतीचा सुंदर प्रवेश..राग जयजयवंती.. आपल्या रागसंगीताच्या खजिन्यातला अजून एक सुरेख, शांत राग.. जयजयवंतीने रावणाच्या तणतणाटाला अगदी शांतपणे दिलेलं उत्तर! :)
जग में सबसे उत्तम हैं, मर्यादा पुरुषोत्तम हैं
सबसे शक्तिशाली हैं, फिर भी रखते संयम है
क्या बात है..! 'सबसे उत्तम हैं' आणि 'मर्यादा पुरुषोत्तम हैं' तलं बॅलन्सिंग खूप छान आहे, प्रसन्न आहे..
राम में शक्ति अगर है, राम में साहस है तो
क्यों नहीं आए अभी तक वो तुम्हारी रक्षा को
जिनका वर्णन करने में थकती नहीं हो तुम यहाँ
ये बताओ वो तुम्हारे राम है इस पल कहाँ
पुन्हा एकदा अहंकारी रावण..
यानंतर मल्हाराशी मिळताजुळते संगीताचे सुंदर तुकडे टाकले आहेत..सारा आसमंत भारून टाकणारा मल्हार..! काय सांगावी आपल्या रागसंगीताची थोरवी? किती वर्णावी आपल्या रागसंगीताची श्रीमंती?
आणि त्यानंतर...?
राम हृदय में है मेरे, राम ही धडकन में है
राम मेरे आत्मा में, राम ही जीवन में है
राम हर पल में है मेरे, राम है हर स्वास में
राम हर आशा में मेरी, राम ही हर आस में
इथे विषय संपतो, या गाण्याचं रसग्रहण संपतं.. कारण? कारण..
'राम हृदय में है मेरे, राम ही धडकन में है' या ओ़ळीमध्ये साक्षात यमन प्रवेशतो आणि सारं गाणं एका क्षणात अत्त्युत्तम उच्चीला पोहोचतं...! यमनबद्दल माझं अनेकदा बोलून झालंय त्यामुळे अधिक काही बोलत नाही..
पल पल है भारी..
मधुश्रीने गायलेलं एक छान गाणं, सुंदर चित्रिकरण. गायत्री जोशी नावाची नटी सीतेच्या भूमिकेत छान दिसली आहे..
अलिकडच्या काळातलं आपल्या रागसंगीतानं समृद्ध असं गाणं.. कालचा, आजचा, उद्याचा - काळ कोणताही असो, आपलं रागसंगीत चिरतरूण आहे.. अजरामर आहे, अमर आहे..नेहमी आपल्या रागसंगीताची भक्ति करावी, पूजा करावी.. त्यातच समाधान आहे, सुख आहे!
या गाण्याकरता रेहमानचं मात्र कौतुक वाटतं! हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचं असं खास स्थान निर्माण करणार्या मराठमोळ्या आशुतोष गोवारीकराचंही कौतुक वाटतं!
-- तात्या अभ्यंकर.
वाचने
6185
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त ...
रावणालाच
आपलं रागसंगीत चिरतरूण आहे.. अजरामर आहे,
माझेही
तात्या,
मस्त गाणे आहे.....
मस्त :)
वाह!
छान गाणे
या
+१
In reply to या by ३_१४ विक्षिप्त अदिती
वा सुंदर
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to छान by नंदन
सुरेख
सुंदर
सुरेख
सर्व