Skip to main content

आग्रहाचे निमंत्रण..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 13/07/2010 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! मिसळपावच्या सर्व रसिक वाचक, लेखक्, कवी, सुगरणी आणि बल्लवाचार्य मित्र्-मैत्रीणींना सांगताना मला खूप आनंद होतोय, की, माझ्या कविता 'फुलांची आर्जवे' च्या रूपाने रसिकांसमोर आल्यानंतर, त्यातल्या काही कविता आता गीत रूपाने अल्बम मधून तुमच्या समोर येत आहेत. माझ्या कवितांना, उत्तम चाली मध्ये बांधलं आहे संगीतकार अभिजीत राणे यांनी, आणि गायलं आहे वैशाली सामंत, बेला शेंडे, मधुरा दातार, संगिता चितळे, अमृता काळे आणि पौलमी पेठे यांनी. एक स्वप्नं , जे उरी बाळगलं होतं.. ते आता प्रत्यक्षात येताना बघणे म्हणजे एक सोहळाच आहे. एक अपेक्षापूर्तीचा क्षण... एक खूप मोठा दिवस.. एक खूप मोठा प्रसंग.. आणि एक खूप मोठं पाऊल क्षितिजाच्या दिशेने! याचे साक्षीदार तुम्ही रसिक माय्-बाप. मोठ्या मनाने, माझ्या बाळबोध कवितांना प्रगल्भ केलंत, अखंड मायेचा हात पाठीवर ठेवलात, नेहमीच उत्तमोत्तम लेखन माझ्याकडून व्हावं म्हणून प्रोत्साहन दिलंत.. तुमची नेहमीच ऋणी राहिन मी. या माझ्या आनंदाच्या क्षणी, तुमची उपस्थिती असणं खूप गरजेचं आहे.. तुमच्या शिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शक्णार नाही. अपूर्णच राहील ही घडी ! नेहमीच माझ्या सोबत आलात.. माझ्या या क्षणांतही माझी साथ द्याल असा विश्वास आहे. आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण.. माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी मनापासून विनंती करते.. nimantraN आपल्या सर्वांची वाट पाहीन कार्यक्रमाच्या ठिकाणी.. - प्राजु अल्बम मधील काही गाण्यांची झलक आपल्याला येथे ऐकायला मिळेल. कार्यक्रमाच्याठिकाणी अल्बम १०% सवलतीच्या दरात उपलब्ध राहील.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 246189
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

रविवारी भेट होईलच! पण त्याआधी मनापासून अभिनंदन. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे मस्त झालं ! कार्यक्रमाला येणे जमणार नाही. पण शुभेच्छा आहेतच. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्राजुतैचे मनापासुन अभिनंदन ! कार्यक्रमाचे कळाले होतेच, १००% प्रयत्न करतो येण्याचा. बाकी आपली दोस्तमंडळी असल्याने वृत्तांताची सोय झालीच आहे :) ------ छोटा डॉन

In reply to by प्राजु

नक्की येणार आहे असे सांगतो. प्लान आहेच यायचा, आता फिक्स करतो. :) ------ छोटा डॉन

मनापासुन अभिनंदन.. येणे अवघड आहे .. पण सी डी बुक करुन ठेवतो .... काँग्रॅट्स..... =D> =D> =D> =D> =D> विनायक पाचलग वाँट टु टॉक

मनापासून अभिनंदन. रविवारी भेट होईलच! :)

प्राजू, मनापासून अभिनंदन...!!!! online CD कोठे मिळेल ते शोधतो आता...!!! खादाडमाऊ

जमले तर नक्कीच हजर राहु. तु येणार आहेस का भारतात? कोल्हापुर मध्ये कधी असणार? परत एकदा खुप खुप शुभेच्छा...अन अगदी मनापासुन अभिनंदन.. वेताळ

In reply to by वेताळ

प्राजु ताई भारतातच आहे .. कोल्हापुरात कधी येणार ते कळाले तर बरे होईल .. भेटता येइल.. विनायक पाचलग वाँट टु टॉक

In reply to by वेताळ

मी भारतातच आहे सध्या. ३० जुलै पर्यंत आहे. कार्यक्रमाला मी असणार आहे.. नक्कीच! वरच्या आमंत्रण पत्रिकेत माझा सेल फोन नंबर दिला आहे. कोल्हापूरला हाच कार्यक्रम पुन्हा २४ जुलै ला होणार आहे.. शाहूस्मारक भवन येथे. वर्तमानपत्रातून त्याची बातमी येईलच. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

खूप आनंद झाला. अभिनंदन नितिन थत्ते

प्राजुताईंचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील काव्य-वाटचालीस शुभेच्छा !

मनापासून अभिनंदन!!!

मस्त... अभिनंदन!!! पुण्यात असलो तर नक्की येतो...

ग्रेट प्राजु ताई.... खरंच मोठं पाउल.. आता यानंतर अशा कार्यक्रमांची सहज सवय व्हावी इतकं यश मिळावं अशा शुभेच्छा!!

अभिनंदन प्राजु. आणखी असेच यश मिळु दे. ह्या बातमीच्या उत्साहाच्या भरात तू मिपा ऐवजी मी मराठी वाचकांना आमंत्रण दिले! ते वाक्य बदलून घे.

प्राजुताईंचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील काव्य-वाटचालीस शुभेच्छा !

मनापासून अभिनंदन!!! आता "डी व्ही डी" ची वाट पाहतो आहोत आम्ही. लवकरच येऊ देत ही शुभेच्छा !!!

प्राजु तुला खुप खुप शुभेच्छा.

मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!!!

मनःपूर्वक अभिनंदन आणि अल्बमची भरपूर विक्री होवो अशा शुभेच्छा!!

अभिनंदन. Flowers प्राजुतै माझ्याही मनापासुन शुभेच्छा.. [पण कॉलेज मुळे जमेल असे नाही वाटत तरी बघु प्रयत्न करुन..] ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

झकास!!! अभिनंदन.

अभिनंदन...............! -दिलीप बिरुटे

अभिनंदन प्राजु!! गाण्यांची झलकच इतकी सुरेल आहे कि सीडीवर संपूर्ण गाणी ऐकण्याची उत्सुकता वाढलिये! माझे आईबाबा येणार आहेत कार्यक्रमाला! आत्ताच फोनवर तसे बोलणे झाले. रेवती

छान बातमी, गायनही झकास. प्राजुचे मनापासून अभिनंदन! आणि शुभेच्छा!

कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला आलो होतो. त्यापुढचा टप्पा इतक्या लगेच गाठला गेला ह्याचा खूप आनंद आहे! :) प्राजू तुझे आणि जगदीशचे कौतुक वाटते. तुम्हा दोघांचे अभिनंदन! :) सीडीच्या प्रकाशन समारंभाला आणि रसिकांच्या पसंतीला ही सीडी येवो अशा शुभेच्छा! चतुरंग

मला तुझा पुण्यातला फोन नंबर माझ्या जीमेलवर पाठव किंवा इथे व्यनि कर. फोनवर बोलूच

आणि हार्दिक शुभेच्छा!

अभिनंदन. पुण्याला असतो तर नक्की आलो असतो.

अभिनंदन... येण्याचा प्रयत्न असेलच. :) बिपिन कार्यकर्ते

अभिनंदन आणि शुभेच्छा.. मराठी भावसंगीतात यापुढेही आपल्या सर्वांकडून काही मोलाची कामगिरी व्हावी हीच प्रार्थना..

हार्दिक अभिनंदन!

हार्दिक अभिनंदन प्राजूतै !! (कविताप्रेमि) अर्धवटराव -रेडि टु थिंक

अरे वा! मनःपूर्वक अभिनंदन! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

वा! हार्दिक अभिनंदन!! =D> =D> =D> शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

मनःपूर्वक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा !! :-) बेलाचा आवाज आवडतो. सीडी घेऊन गाणी ऎकण्याच्या प्रतिक्षेत आहे.

मनःपुर्वक अभिनन्दन प्राजुताई.

=D> =D> =D> =D> =D> मनापासुन अभिनंदन =D> =D> =D> =D> =D>