एखाद्या वाद्यातून जर तुम्हाला मराठी भावगीताचे बोल जसेच्या तसे, हो जसेच्या तसेच, म्हणजे अगदी काव्यातल्या जोडाक्षरांसकट आणि गायकाच्या/गायिकेच्या आवाजातली मींड, ताना, आलाप या बारकाव्यांसकट ऐकू आले तर तुम्हाला काय वाटेल?
तुम्ही अचंबित व्हाल, इतकेच नव्हे तर या माणसाच्या प्रेमातच पडाल! माझंही अगदी असंच झालंय.
प्रभाकर जोग नावाच्या एका अवलियाचे काही यूट्यूब वीडिओज मध्यंतरी बघितले त्याचवेळी मी वेडा झालो होतो. आज मी ते वीडिओ पुन्हा बघितले आणि मग मला राहवेना म्हंटलं आता मात्र या चमत्काराची ओळख मिपाकरांना करुन द्यायलाच हवी.
मराठी संगीत क्षेत्रातले हे अतिशय नाणावलेले व्यक्तिमत्त्व आहे.