मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाज

गर्भलिंग आणि पर्यावरण

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गर्भलिंग आणि पर्यावरण =====================  गर्भाचे लिंग निश्चित होण्यास वाय-गुणसूत्र कारणीभूत असते असे मानले गेले आहे. पण वाय गुणसूत्रावरील Sry या जनुकाचे गर्भधारणेच्या काळात काम बिघडले तर लिंगदोष निर्माण होतात. पर्यावरण यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पाडत असते. निसर्गाच्या या चुकीचे उंदरांमधले कारण शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. गर्भधारणेच्या काळात लोहाची कमतरता या दोषाला कारणीभूत ठरते, असे उंदरावरील संशोधनात आढळले आहे.

ब्रेकींग - नैराश्य != केमिकल लोच्या

युयुत्सु ·
लेखनविषय:
ब्रेकींग - नैराश्य != केमिकल लोच्या ====================== एक महत्त्वाच्या व्यापक आढाव्यातून आढळले आहे की नैराश्य हे रासायनिक असंतुलनामुळे होते याला कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी केलेल्या एका प्रमुख व्यापक आढाव्यात असे आढळून आले आहे की नैराश्य हे सेरोटोनिनची कमी पातळी किंवा सेरोटोनिन क्रियेतील घट यामुळे होते याचा पटवणारा पुरावा मिळत नाही.

किडकी प्रजा आणि ’ब्रेन रॉट’

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
किडकी प्रजा आणि ’ब्रेन रॉट’ ===============  मी काही वर्षांपूर्वी विशिष्ट उद्देशाने (समाजाला जागे करण्याच्या) तयार केलेला शब्द प्रयोग काही जणांना अपमान कारक वाटतो. बरं ’किडकी प्रजा’ हे शब्द कुणा विशिष्ट गट किंवा समूहाला टारगेट करून अपमानित करण्यासाठी तयार केलेले नाहीत. एखाद्या महालात राहणार्‍या व्यक्तीपासून ते रस्त्यावर राहणार्‍या व्यक्तीपर्यंत कुणीही "किडू" शकतो. मग मला धमक्या पण दिल्या जातात.

ग्रोक४

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ग्रोक४ === बहुचर्चित ग्रोक४ चे नुकतेच अनावरण झाले. मी ग्रोक३ ची सशुल्क सेवा घेत असल्याने आणि मी त्याबाबत समाधानी असल्याने ग्रोक४ काय करणार याची उत्सूकता होतीच. ग्रोक४ च्या लोकार्पणाचा समारंभ इथे बघायला मिळाला. https://www.youtube.com/watch?v=MtYsUdfZPMA या दृक्फितीमध्ये तंत्रसामर्थ्योद्धत महामंडलेश्वर इलॉनशास्त्री मस्क यांचे गर्वसूक्त ऐकून धक्का बसला. सुमारे दीडेक वर्षापूर्वी एका जपानी समूहाने लवकरच ए०आय० पीएचडी दर्जाचे काम करू शकेल असा दावा केला होता. हा दावा अपेक्षेपेक्षा लवकरच प्रत्यक्षात उतरलेला दिसतो.

मराठी अस्मिते साठी : उच्च शिक्षण मराठीत द्या.

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही महिन्यांपूर्वी मराठीचिये नगरी पुण्याला गेलो होतो. बाप आपल्या दोन वर्षाच्या मुलीशी आंग्ल भाषेत बोलत होता. दोन्ही उच्च शिक्षित नवरा -बायको ही त्याच भाषेत बोलत होते. दोन दिवस तिथे राहिलो आणि मला आपण "अनपढ़ गंवार" आहोत असा फील येऊ लागला. त्याची लेक बाहेर खेळताना इतर मराठी मुलांशी हिन्दीत मिश्रित आंग्ल भाषेत बोलत होती. बाहेर हिन्दी आणि घरात आंग्ल. लेकीसाठी मराठी भाषा परकी झाली होती. तिच्या वडिलांना ही चूक म्हणू शकत नाही. प्रत्येक पालकला वाटते त्याच्या मुलाने उत्तम दर्जाचे शिक्षण घ्यावे आणि उत्तम पगारची नौकरी त्याला मिळावी.

ए० आय० पेक्षा भयानक तंत्रज्ञान येत आहे...

युयुत्सु ·
लेखनविषय:
 माझ्या या पोस्ट्मध्ये (https://www.misalpav.com/node/52703) २०२२४ मध्ये एका संघोट्याशी झालेल्या भांडणाची हकीकत लिहीली होती. चीनबद्दल मी जेव्हा ही भूमिका घेतली तेव्हा ब्लूमबर्गने आयोजित केलेल्या एका परिसंवादात केलेल्या भाषणाचा त्याला आधार होता. हा चीनचा प्रतिनिधी मोठ्या अभिमानाने सांगत होता की आमची पॉलिसी डॉक्युमेण्ट वाचा. आमच्या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीचा दर ८०-८५% टक्के आहे. भविष्यात चिनी अर्थव्यवस्था मुख्यतः ए० आय० आणि कृत्रिम जीवशास्त्र या दोन तंत्रज्ञानामधल्या चीनच्या आघाडीवर अवलंबून असेल.

किडकी प्रजा - सायकोपथी

युयुत्सु ·
लेखनविषय:
 सायकोपथी हा गुंतागुंतीच्या समाजघातक वर्तनाला कारणीभूत ठरणार्‍या व्यक्तीमत्वातील बिघाडांचा समूह मानला जातो. अशा बिघडलेल्या व्यक्तीमत्त्वाच्या लोकांना सायकोपॅथ अशी संज्ञा आहे.

21 जून योग दिवस : उद्यानातिल स्वास्थ्य साधक

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(हा लेख लिहण्यापूर्वी उद्यानात सकाळी पाच ते आठच्या दरम्यान अनेक स्वास्थ्य साधकांशी वार्तालाप केला आहे.) माझे बालपण जुन्या दिल्लीत गेले. त्याकाळी मोरीगेट ते यमुने पर्यन्त अनेक मोठी उद्याने होती. नंतर 35 वर्षे उत्तम नगर इथे राहिलो. जवळच्या जनकपुरी इथेही मोठे-मोठे उद्यान आहेत. बालपणापासून मला पासून उद्यानात फिरण्याची सवय आहे. गेल्या ऑगस्टच्या सुरवातीला ग्रेटर नोएडा इथल्या एका हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये शिफ्ट झालो. मुलाला 22व्या माल्यावरचा फ्लॅट विकत घ्यायला भाग पाडले याचे एकमेव कारण या भागातील उद्यान बाल्कनीतून समोर दिसते.

सृष्टीआड दृष्टी

कुमार जावडेकर ·
एक मुलाखत: “नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली. “पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले. “हा आपला विनय आहे.

आपण अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार आहोत का!

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ Too much comfort ultimately leads to much discomfort ✪ तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक ✪ कठिण परिस्थितीला सामोरं जाण्याबद्दल मुलांची तयारी होते का? ✪ समजा पाच दिवस इंटरनेट बंद पडलं तर आपण काय करू? ✪ पेट्रोल तर संपणार आहे. ते उद्या झालं तर? ✪ आपत्ती येणारच आहेत ✪ आणीबाणीमध्ये आपण स्वत:ला व इतरांना मदत कशी करू शकतो? डॉ. जयंत नारळीकरांची एक विज्ञानकथा होती. पृथ्वीवर सर्व कामे यंत्रे करत जातात. ह्या यंत्रांचं नियंत्रण काही कंप्युटर्स करतात. आणि हे कंप्युटर्सही नंतर इतके वाढतात की, त्यांचं नियंत्रण एक सुपर कंप्युटर करतो.