Skip to main content

समाज

कुटुंब गेले कुणीकडे?...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 28/08/2009 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिकीकरणामुळे बदललेल्या विकासाच्या प्राधान्यक्रमाचा मोठा फटका महिलांनाच बसत असून, जागतिक मंदीची सर्वाधिक झळही त्यांनाच सहन करावी लागत आहे. कुटुंबाचे भविष्य निर्भर करण्याची शक्ती असलेल्या महिलांच्या सबलीकरणासाठी जगाने प्रामाणिक इच्छाशक्तीने पुढे यावे, अशी साद संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधीने जगाला घातली आहे. जागतिकीकरणामुळे विकासाचे प्राधान्यक्रम झपाट्याने बदलत असून, कुटुंबकल्याण आणि माता-बालकांच्या आरोग्याचा प्रश्‍न मागे पडत आहे. हा प्रश्‍न हाताळण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव भविष्यात आणखी गंभीर समस्या निर्माण करू शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधीने दिलाय.

स्वाईन फ्लू विषाणू व फुकट उपलब्ध असलेला नैसर्गीक फिल्टर

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 28/08/2009 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाईन फ्लू चे विषाणू नाकातोंडाला मास्क लावल्यास आपल्या शरीरात जात नाहीत हे आता आपल्या सरावाचे झाले असेल. त्या बरोबरच हातही धूतले पाहिजे म्हणा. पण जर कमीतकमी माणसांनी जर त्यांना उगवणारी मिशी काढली नाही व नाकातले केस तसेच वाढू दिले तर मला वाटते की स्वाईन फ्लू चे विषाणू "ह्या" केसांच्या नैसर्गीक गाळणीत अडकून पडतील. वारंवार नाक तोंड साफ करावे हा सल्ला तर डॉक्टर देतच असतात. त्या साफसफाईत मिशी पण साफ होते. म्हणजे महागाचा मास्क किंवा अडणीचा रुमाल वापरावा लागणार नाही.

बदलाबदली !

लेखक भोचक यांनी गुरुवार, 27/08/2009 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
बदल हा माणसाचा स्थायीभाव आहे. बदलतो तो माणूस. बदलला म्हणून माणूस इथवर पोहोचला. असली बदलाबदलीची वाक्ये ऐकून, वाचून कान आता किटले नि डोळे विटले आहेत. अस्मादिक 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या तुकारामी प्रवृत्तीचे. त्यामुळे बदलाचं वारं काही झेपत नाही. मग तो बदल वैयक्तिक असो की सार्वजनिक. वैयक्तिक बाबतीत लिहायचं तर, अगदी हाफिसमधली जागा असो, खुर्ची असो, कम्प्युटर असो की आणखी काही. यातलं काही काही बदललेलं चालत नाही. मालकाने पैसे मोजून ठेवून घेतलं असलं तरी या 'ठेविले अनंते' वृत्तीचा माज मात्र त्याला सहन करावाच लागतो. कारण माझ्याकडून होणार्‍या कामातूनच त्याला 'चित्ती समाधान' लाभत असतं.

सूड - भाग २ (कथा संपूर्ण )

लेखक सागर यांनी गुरुवार, 27/08/2009 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार रसिक वाचकहो, माझ्या "सूड्"कथेचा दुसरा भाग देण्यास थोडा विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व. पहिल्या भागाला मिळालेल्या वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे मी कथानकात मूळ ढाचा न बदलता थोडेफार फेरबदल केले आहेत, ते कितपत यशस्वी झाले आहेत ते वाचकांवरच सोपवतो. माझ्या "सूड" या कथेचा दुसरा आणि अंतिम भाग देताना आनंद होत आहे. तुम्हा सर्वांच्या अभिप्रायाची अपेक्षा आहे.

चिंतातुराणां न सौख्यं, न मज्जा.

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 26/08/2009 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसभराचं पाट्या टाकणं झालं आणि मी ऑफिस बंद करत होतो. तेवढ्यात फोन वाजला. "दत्ता. . मी मंदार. तू ऑफिसमध्येच आहे कां ?" मी म्हणालो " हे काय बंद करून निघतोच आहे. कां रे ?" तुझ्याकडे तासभर वेळ आहे कां ? हो आहे. कुठे जायचंय कां ? हो. जरा गप्पा मारंत बसू. कुठे ? भोलाकडे. वडा-पाव बर्‍याच दिवसांत खाल्ला नाही. च्यायला, नुसता वडापाव ? आणि वडापाव खायला तास कशाला लागतो? मला वाटलं तू 'कवी'मध्ये बसायचं म्हणतोयस. लेका . . . श्रावण चालू आहे. नेहमी पिणार्‍यांना श्रावण. मला नाही. तरीसुध्दा नको. तू भोलाकडे ये. मी निघतोय लगेच. मी भोला वडेवाला कडे पोहोचलो.

एक गाणे आणि शुभेच्छा

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 22/08/2009 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. सर्व मिपाकराना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या लाडक्या मिपाला २ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. असो,तर मुळ सांगायचा मुद्दा असा की आत्ता झी टॉकीजवर आयुष्यावर बोलु काही चे पुनःप्रक्षेपण चालु आहे. आणि मगाशीच मी त्यात एक गाणे ऐकले. हे गाणे खरेतर मी काही दिवसापुर्वीच यु नळीवरुन उतरवुन घेतले आहे, व सध्या त्याचे पारायण चालु आहे,अगदी या गाण्याव लिहायचे,त्याचे रसावलोकन का रसग्रहण जे काही म्हणतात ते करायचेच असे ठरवुन मनात लेखही तयार केला होता.

आम्ही क्युबिकल डेकोरेशन करतो ....

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 19/08/2009 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
तर मित्रांनो ही स्पर्धा होती आमच्या आस्थापनात, ती तिथेच घेतली गेली आणि निकाल तिथेच जाहीर झाले. जर पुढेमागे आमची कंपनी केंद्र सरकारने बेल-आउट पॅकेज देऊन चालवायला घेतली तर स्पर्धा महाराष्ट्रात, जाहिरात युपी/बिहारात, प्रत्येक्ष स्पर्धा कर्नाटकात व बक्षिसवितरण समारंभ दिल्लीत वगैरे होऊन ह्याला "*** गांधी पुरस्कॄत क्युबिकल डेकोरेशन स्पर्धा " असे नाव दिले जाऊ शकते ... ( कोणीतरी विचारत होता की मिपावर निकाल जाहीर झाले का म्हणुन तर त्याला हे उत्तर समजावे.