एका रिक्षावाल्याची गोष्ट
मला नेहमीच असे काहीतरी अनुभव येत असतात...कुर्ल्याला होते तेव्हा स्टेशनवर बसने जायचे...बसथांब्याशेजारीच रिक्षा उभ्या राहायच्या...बरेचदा लोक बसची वाट पाहण्यापेक्षा २-३ मिळून शेअर रिक्षा करून स्टेशनला जायचे...बसच तिकीट ३/- म्हणून माणसी ३/- घ्यायचे रिक्षावाले....एकदा दुपारी मी बसची वाट पाहत थांबले...एक रिक्षावाला "स्टेशन... स्टेशन " करत आला...इतर कोणीच नव्हतं..मी त्याला विचारलं " तीन रुपयात नेणार ना? ", उत्तरादाखल त्याने मन हलवली आणि बस म्हंटला...मी बसले...स्टेशनच्या रिक्षा थांब्यावर थांबलो आणि मी उतरून त्याला ३/- दिले...लगेच त्याने ओरडा आरड चालू केली " आठ रुपये द्या"
"आठ कसले ?
मिसळपाव