Skip to main content

समाज

धमाल मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 16/06/2011 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव खरडसम्राट, आमचे निकटचे स्नेही व आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर धमाल मुलगा, श्री. कैवल्य देशमुख यांचा आज, १६ जुन हा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या खरडवहीला असेच उधाण येत राहो, व त्यांनी आपल्या जालीय व जालाबाहेरील आयुष्यात यशाची नवनवीन शिखरे सर करावीत, हिच श्री गणेशाचरणी प्रार्थना. :) हॅपी बर्थडे धमाल, कीप रॉकिंग! :)

' वर्षा सहल - ०१ - जुन २०११

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 14/06/2011 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
चिंब भिजलेले.... तुम्हाला हे गाणं माहितच असेल ना, चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. काय नाही माहीत, असं कसं होईल, एवढं फेमस गाणं अन माहीत नाही, बघा बघा आठवा, छान पाउस पडतोय, आणि आजुबाजुला हिरवाई आहे, पाना पानातुन थेंब टपकताहेत आणि लांब कुठंतरी नदीच्या उफाणाचा आवाज येतोय, नेहमी करपट वाटणारे दगड पण जिंवत वाटतात, आणि त्यावेळी मनात हे गाणं घुमायला लागतं.. चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. नाही आठवलं अजुन, अवघड आहे मग...

कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....!

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 13/06/2011 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! मा. कुलगुरू डॉ.व्यंकट मायंदे, पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला. स.न.वि.वि दि. ६ जून २०११ च्या लोकसत्तामध्ये एक बातमी प्रकाशित झाली आहे. कृषी अधिकार्‍यांच्या तांत्रिक कार्यशाळेत "प्रकल्प आधारित शेती" या विषयावर मार्गदर्शन करताना "शेतकर्‍यांना फुकट काही देऊ नये, नुसते फुकट जर दिले तर शेतकरी फुकट घेण्यासाठीच बसलेले असतात, अशी शेतकर्‍यांची प्रवृत्तीच झाली आहे" अशा आशयाचे विधान केल्याचे प्रकाशित झाले आहे. डॉ. मायंदे साहेब, आपण एका विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विराजमान आहात आणि कुलगुरू या शब्दाची महतीसुद्धा फार मोठी आहे.

एक प्रतिसाद - "बोगस अध्यात्माची सुरसकथा-१" ला

लेखक धन्या यांनी रविवार, 12/06/2011 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख श्री. ईश आपटे यांच्या "बोगस अध्यात्माची सुरसकथा-१" या लेखाचा प्रतिसाद आहे. माझा प्रतिसाद लिहिता लिहिता मूळ लेखापेक्षा मोठा झाल्यामुळे स्वतंत्र लेख म्हणून देत आहे. १. गेल्या शतक भरात, साधारण १८९३ पासुन भारतभरात नव्या आध्यात्मिक गुरुंची मोठी लाट आली. अगदी खरंय. नव्हे, तुमचा "लाट आली" हा शब्दप्रयोग खुप काही सांगून जातो. ईंग्रजीमधील "फॅड आलंय" हा शब्दप्रयोग सुद्धा चालला असता. पण... लाट किंवा फॅड हे हे खुप अल्पजीवी असतं. ते येतं, थोडा वेळ राहतं आणि निघून जातं. अध्यात्मिक गुरूंच्या बाबतीत मात्र तसं झालं नाही.

मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली (भाग २)

लेखक चिंतातुर जंतू यांनी रविवार, 12/06/2011 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १: मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली: एक धावता परिचय पूर्वपीठिका: लेख जरा लांबलचक होतो आहे अशी जाणीव लिहिताना झाली होती. त्यामुळे तो शेवटीशेवटी थोडक्यात आटपला होता, हे कबूल करतो. पण शेवटचा भाग त्रोटक करण्यामागे त्याशिवाय अजून एक विचार होता: अखेर चित्रं ही डोळ्यांनी पहायची असतात. त्याविषयीचं विवेचन हे फार फार तर जरा मदत एवढ्यापुरतंच यावं असं मला वाटतं. असो. काही लोकांची तशी इच्छा दिसल्यामुळे थोडं अधिक विवेचन देत आहे.

मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली: एक धावता परिचय

लेखक चिंतातुर जंतू यांनी शनिवार, 11/06/2011 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
हुसेनच्या मृत्यूची बातमी कळताच अपेक्षेनुसार या संस्थळावर सडक्या प्रतिक्रियांचा एक ओघ येऊन गेला. काहींनी मेल्या माणसाबद्दल हे असं बोलणं कसं रुचिहीन आणि सभ्यतेची पातळी सोडून आहे हे सांगितलं. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी किंवा वृद्ध हुसेनना जो देशत्याग करावा लागला त्याविषयी अनेक उदारमतवादी लोकांनी अनेक ठिकाणी या निमित्तानं पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. पण मुळात चित्रकार म्हणून हुसेन यांचं कर्तृत्व काय याचा थोडा परिचय करून द्यावा यासाठी हा लेख लिहिला आहे. त्याआधी थोडी स्वातंत्र्यपूर्व भारतातली कलासंस्कृती पाहणं गरजेचं आहे. इंग्रजांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. त्याच साली जे.जे.