Skip to main content

समाज

एडसचा जीवघेणा पाश

लेखक पिंगू यांनी मंगळवार, 17/05/2011 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक सत्य घटना आहे. मी स्वत: अनुभवलेली. ही कथा आहे दहा वर्षापूर्वीची. जेव्हा मला मूळव्याधीच्या उपचारासाठी एका इस्पितळात भरती करण्यात आले होते. त्या इस्पितळात एक मोठे दालन होते जिथे बहुतेक सर्व रुग्ण दाखल केले जात आणि मी पण तिथेच होतो. मी तिथे डेरेदाखल झाल्यानंतर रोज एक वेगळा रुग्ण म्हणून मला जी वागणूक मिळाली ती खूपच चांगली होती. कारण काय तर मी एक वेगळा रुग्ण आणि विद्यार्थ्यासाठी एक अभ्यासाचा भाग होतो.

मिशन काश्मीर - भाग ३ - श्रीनगर

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 16/05/2011 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
http://misalpav.com/node/17957 - मिशन काश्मीर - भाग १ http://misalpav.com/node/17973 - मिशन काश्मीर - भाग २ ************************************************************** काश्मीर आज भारतीयांसाठी सुद्धा एक दंतकथा झाली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात काश्मीर म्हणजे दहशतवाद असे एक समीकरण झाले आहे. पण एकेकाळी ही देवांची भूमी होती. साक्षात शंकराने इथे साधना केल्याचे मानले जाते. कश्यपाच्या या भूमीत हजारो वर्षे हिंदु राजांनी राज्य केले. त्याच्या अनुषंगाने बरीच मंदिरे देखील बांधली गेली.

'अविस्मरणीय' उटी कोडाई

लेखक स्मिता. यांनी रविवार, 15/05/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूचना: या लेखातले सर्व अनुभव १००% सत्य घटना असून त्यात काल्पनिक असे काहीही नाही. त्यात काही काल्पनिक वाटल्यास ते आमचे दुर्दैव समजावे. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ कधी कधी असे अनुभव येतात की वाटते एखाद्या गोष्टीचा विचार करताना जर ती अयोग्य, चुकीची किंवा करू नये अशी वाटत असल्यास ती न केलेलीच उत्तम! तसा माझा शकुन-अपशकुन, दैवी संकेत, इ. गोष्टींवर विश्वास नाही पण जिथे आपलं मनच नाही म्हणतं तिथे उगाच शहाणपणा करूच नये.

जैतापुर प्रकल्पाचा गुंता

लेखक शंकर पु. देव यांनी रविवार, 15/05/2011 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
कोणताही प्रकल्प एखाद्या ठिकाणचे लोक सहजासहजी स्वीकारत नाहीत. स्थानिक लोकांचे त्यांच्या राहत्या ठिकाणशी एवढे जवळचे संबंध व नाती निर्माण झाली की, सहजासहजी स्थनिक रहीवाशी आपली जमिन व घरेदारे आणि शेतीवाडी देण्यास तयार होत नाहीत. यामुळेच महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी एखाद्या प्रकल्पाबाबत लोकांनी विरोध केला नाही, असे घडलेले नाही. सेझ विरोधात रायगडमध्ये शेतक-यांनी लढा दिला आणि जमिन संपादन करणे अशक्य केले. यामुळेच सरकारला सेझची योजना गुंडाळून ठेवावी लागली. प्रकल्पामुळे जनता विस्थापीत होते आणि एकदा विस्थापीत झाली की, मग या प्रकल्पग्रस्तांना किंवा धरणग्रस्तांचा वाली कुणीच रहात नाही.

कसा जपावा मराठी बाणा?

लेखक शंकर पु. देव यांनी शनिवार, 14/05/2011 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र सरकारची मराठीबद्दलची असणारी आस्था किती बेगडी आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. विरोधकांनी मराठीचा मुद्दा उचलून धरुन राजकारण सुरु केले की सत्तेतील राज्यकर्त्यांना मराठीचे प्रेम वाटू लागते. आम्हालाही मराठीबद्दल किती तळमळ आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्यकर्ते करतात. पण कुठे ना कुठे नव्हे, तर प्रत्येक ठिकाणी सरकाअचे हे पुतना मावशीचे प्रेम उघडे पडते व सरकार तोंडघशी पडते. सांस्कृतिक संचनालय हे किती सुसंस्कारीत आहे हे लपून राहिलेले नाही. म्हणूनच पारितोषिकांचे नामांकने जाहिर करताना नेहमीप्रमाणे सरकारी गोंधळ घातला गेला.

क्रोमियम प्लेटेड ढग

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 13/05/2011 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
कविता सुचली ही बातमी वाचून. क्रोमियम प्लेटेड ढग उंदराला सोडून धरतीवर, गेला नभात संगणेशक पीसीची कटकट कशाला, मेघातून गर्जणार निर्देषक दर तीन वर्षांनी व्हायचा घरचा संगणेशक म्हातारा लडखडती चाल बघून सगळ्यांचा चढायचा पारा मुन्नी नाचतांना हटकून संगणेशक व्हायचा जॅम आतातरी नविन आणा, आम्ही व्हायचो बदनाम अचानक येऊन कोठूनसे उंडारायचे व्हायरस त्यांचा ताप उतरवतांना अंगारात बुडायचा शांतरस मेंदू आपलाच वापरायचा सोडा संगणकी प्रघात रहाणार बृहस्पति आता क्रोमच्या रंगीत मेघात किचकट कामे सारी मेघात भले खालचा मजल

कॉशसली ऑप्टीमिस्टीक

लेखक रामदास यांनी गुरुवार, 12/05/2011 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
डांबीसानी रसाची वाटी जरा निरीच्छेनीच बाजूला ठेवली. मास्तराकडे बघत एकदा च्यक असा आवाज काढला. आंबेवाले विजूभाऊ गॉड हसत म्हणाले "कसे होते आंबे.." मास्तरानी एक विचीत्र आवाज काढत विजूभाऊंचं संभाषण मूळातच बंद करून टाकलं. मुक्तसुनीत पेंगत होता. श्रावण मोडकांनी त्याच्या हातातली जाडजूड कादंबरी हळूच काढून घेतली आणि त्याच्या डोक्याखाली ठेवली. चतुरंग पाचव्यांदा ए-२ *सी-५ असं म्हणत जागा बदलत राहीला. बिपीन होमसिक झाल्यासारखा खिडकीजवळ उभा राहून एखादा उंट दिसतो का ते बघत बसला होता.