मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली: एक धावता परिचय
हुसेनच्या मृत्यूची बातमी कळताच अपेक्षेनुसार या संस्थळावर सडक्या प्रतिक्रियांचा एक ओघ येऊन गेला. काहींनी मेल्या माणसाबद्दल हे असं बोलणं कसं रुचिहीन आणि सभ्यतेची पातळी सोडून आहे हे सांगितलं. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी किंवा वृद्ध हुसेनना जो देशत्याग करावा लागला त्याविषयी अनेक उदारमतवादी लोकांनी अनेक ठिकाणी या निमित्तानं पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. पण मुळात चित्रकार म्हणून हुसेन यांचं कर्तृत्व काय याचा थोडा परिचय करून द्यावा यासाठी हा लेख लिहिला आहे.
त्याआधी थोडी स्वातंत्र्यपूर्व भारतातली कलासंस्कृती पाहणं गरजेचं आहे. इंग्रजांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. त्याच साली जे.जे. कला महाविद्यालयही निर्माण केलं. त्यात कलाविषयक शिक्षण हे इतर विद्याशाखांनुसार एका आखीव चौकटीत बांधलं गेलं. स्वत:च्या हुशारीविषयी गर्व असणाऱ्या जगज्जेत्या इंग्रजांना तेव्हा आपलीच कला श्रेष्ठ आहे आणि भारतीय कला कनिष्ठ आहे असा विश्वास होता. त्यामुळे या कलाशिक्षणात युरोपियन पद्धतीचं शिक्षण अंतर्भूत होतं. म्हणजे युरोपात तेव्हा प्रचलित असणारी वास्तवदर्शी शैली त्या शिक्षणातला अविभाज्य भाग होती. ती आकर्षक होती याविषयी वादच नाही. त्याचा एक नमुना पहा:
सॉक्रेटिसचा मृत्यू (१७८७) – जाक लुई दाविद (फ्रेंच)
पण यात झालं असं की भारतीय शैलींचा परिचय शिक्षणचौकटीत होत नव्हता. भारतात हजारो वर्षं अनेक प्रकारची कला निर्माण होत होती. मोहेंजोदारो, भीमबेटका आणि अजिंठा-वेरूळ अशा काळापासून ते मधुबनी किंवा कांगरा अशा आपल्या परंपरेतल्या अनेक शैलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कलाविष्कार होत होता.
भीमबेटका
अजिंठा
मधुबनी
अगदी खेड्यातल्या घरांपुढे काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या किंवा भिंतींवर रेखाटले जाणारे देखावे यांत भारताची कलापरंपरा दिसत होती.
यांपैकी कशाचा त्या शिक्षणात समावेश नव्हता. थोडक्यात कलाक्षेत्रातसुद्धा निव्वळ पाश्चिमात्य शैलीच्या नकलीत निपुण असे ब्राऊन साहेब निर्माण करणारं ते शिक्षण होतं.
गंमत म्हणजे खुद्द युरोपात यानंतर लगेचच म्हणजे १८७०च्या आसपास वास्तवदर्शी चित्रणाला छेद देऊन वेगळी इम्प्रेशनिस्ट शैली निर्माण झाली. वास्तवदर्शी म्हणजेच चांगलं हा विचार हळूहळू मागे पडत गेला. १९०७मध्ये पिकासोच्या Les Demoiselles d'Avignon या चित्रानं क्रांती घडवली. त्यात पिकासोनं आफ्रिकन मुखवट्यांवरून प्रेरणा घेतली होती. यापूर्वी व्हॅन गॉघसारख्यांनी जपानी कलेपासून प्रेरणा घेतली होती. म्हणजे पश्चिमेनं पूर्वेकडून उसनं घेण्याचा एक उलटा प्रवास चालू झाला होता.
पण आपल्याकडे आता पूर्व-पश्चिम संगम वेगळ्या पद्धतीनं होत होता. रविवर्मानं पाश्चिमात्य शैलीमध्ये आपल्या मिथ्यकथा आणि पौराणिक कथांमधले प्रसंग चित्रित केले होते. हे एक प्रकारे पाश्चिमात्य श्रेष्ठत्व मान्य करणं आणि आपली समृद्ध परंपरा सोडून देण्यासारखं होतं. उदा: हे चित्र पहा:
वर दाखवलेल्या दाविदच्या चित्राचं या चित्राशी असलेलं नातं लक्षात येईल.
फाळक्यांनी चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. त्यातही परदेशी तंत्रज्ञान वापरून आपल्या पौराणिक कथा आणि त्यातले चमत्कार वगैरे दाखवण्याचे प्रकार सुरु झाले.
पण त्याच वेळी आपण स्वातंत्र्यासाठीसुद्धा लढत होतो. आणि त्यातही पूर्व-पश्चिम असे दोन ध्रुव होतेच. एकीकडे गांधीजी देशीवादाला अनुसरून खेड्याकडे चला वगैरे सांगत होते, तर नेहरूंना विज्ञान-तंत्रज्ञान आणून आधुनिक भारत घडवायचा होता. जर सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचं असेल तर दोनही गोष्टींचा संगम होणं आवश्यक होतं.
कलेतही हे व्हायला हवं होतं. तसे काही प्रयत्न होत होते. उदा: टागोरांच्या प्रभावाखाली शांतीनिकेतनमधून असे प्रयोग होत होते.
बिनोद बिहारी मुकर्जी
नंदलाल बोस
या बेंगाल स्कूल व्यतिरिक्त जामिनी रॉय यांनी कालीघाट शैलीशी साधर्म्य राखत आपली शैली बनवली.
अमृता शेरगिल यांनी पाश्चिमात्य प्रभाव घेऊन आपली एक वेगळी पण खास भारतीय शैली घडवली.
अमृता शेरगिल
पण १९३०-४०च्या सुमाराला काही तरुण या सर्वाविरोधात बंडखोरी करायला उभे ठाकले. प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टस ग्रुप नावानं हे ओळखले जातात. त्यांच्या मते हे आधीचे प्रयत्न एकतर फार देशी होत होते किंवा पूर्णत: पाश्चिमात्य प्रभावाचे होत होते. त्यांना वेगळं काहीतरी करायचं होतं. जे खास भारतीय वाटेल, पण तरीही परंपरागत शैलींशी त्याचं अगदी उघड नातं लागणार नाही आणि त्यावरचा पाश्चिमात्य प्रभाव इतकाही नसेल की त्यात काही भारतीय उरणारच नाही असं त्यांना साधायचं होतं. आता ही तारेवरची कसरत कशी साधणार होती? प्रत्येकानं आपापलं उत्तर शोधलं. आपण फक्त हुसेनचं उत्तर थोडं खोलात जाऊन पाहू.
वेगवेगळ्या भारतीय शैलींमध्ये वरवर पाहता साधर्म्य दिसत नाही. पण नीट विचार केला तर त्याची काही वैशिष्ट्यं लक्षात येतात. भारतीय रंगसंगती पाश्चिमात्यांपेक्षा खूप झगझगीत असते. (म्हणून कदाचित या संस्थळावरची रंगसंगती काहींना भडक वाटते ;-)) कडक उन्हाच्या प्रदेशात रंग नीट उठून दिसावे म्हणून ते नकळत अधिक भडक होत असावेत. कदाचित त्वचेच्या काळ्या रंगावर ते अधिक उठावदार वाटत असतील. राजस्थान किंवा दक्षिण भारत वगैरे ठिकाणी हे प्रकर्षानं लक्षात येतं. उदा: हे पहा, किंवा हे पहा:
हुसेन यांनी हे झगझगीत रंग आपलेसे केले. अर्थात त्यांनी आधी हिंदी सिनेमाची पोस्टर्स चितारलेली असणं याचादेखील या गोष्टीशी संबंध आहे.
(हे हुसेन यांनी रंगवलेलं नव्हे. शैलीचा परिचय होण्यासाठी म्हणून एक प्रातिनिधिक पोस्टर निवडलेलं आहे.)
अवास्तव चित्रण, वास्तवाहून भडक रंग आणि तपशीलांचा काला ही वैशिष्ट्यं पारंपारिक भारतीय कलेत दिसतात, पूर्वीच्या सिनेमाच्या पोस्टर्समध्ये दिसतात आणि हुसेन यांच्या चित्रातही दिसतात. आधुनिक कलेत या रचना आल्या तेव्हा त्या अशा पुरातन आणि खास भारतीय परंपरेशी नातं जोडत आल्या. याशिवाय अगदी अजिंठा-वेरूळ काळापासून प्रचलित असलेल्या शरीरचित्रणाचे अनेक विशेषसुद्धा त्यांनी आत्मसात केले. हे सर्व अर्थात जे. जे. मध्ये शिकवल्या जाणाऱ्या वास्तवदर्शी शरीरचित्रणाहून वेगळं आणि अधिक भारतीय होतं.
पण याशिवाय हुसेन यांनी पाश्चिमात्य कलेत तोवर झालेला आधुनिक विचार उचलला. विशेषत: काही ठळक रेषा वापरून चित्र कशाचं आहे हे पटकन कळावं ही पिकासोची शैली त्यांनी उचलली.
पिकासो - दम्वाजेल द'आविन्यो (१९०७)
गंमत म्हणजे तपशीलांचा काला पिकासोच्या गेर्निकासारख्या चित्रांतदेखील दिसतो. त्यामुळे आधुनिक चित्रणशैली उचलतानासुद्धा हुसेन यांनी आपली भारतीयता जपत ती उचललेली दिसते.
पिकासो - गेर्निका (१९३७)
आणि अर्थात प्रत्यक्ष विषयाच्या निवडीतसुद्धा समकालीन किंवा कालातीत पण परिचित भारतीय विषय त्यांनी निवडले. त्यांत घोडे, हत्ती, गाई असे भारतीयांचे आवडते प्राणी होते; गांधीजी, इंदिरा गांधी, मदर तेरेसा अशा प्रसिद्ध व्यक्ती होत्या. त्यात सामाजिक विषय होते (उदा. गरीबी, भ्रष्टाचार, शिक्षणाचा अभाव); सांस्कृतिक घटक होते. उदा: ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक पाहून त्यांनी काही अप्रतिम चित्रं रंगवली आहेत. त्या काळात मुंबईत अलेक पदमसी, इब्राहिम अल्काझी अशा अनेकांनी जे नवनवीन नाट्यप्रयोग केले ते पाहून काढलेली त्यांची चित्रं गाजली. वाराणसीच्या घाटांवरची त्यांची एक अख्खी मालिका आहे. अशा पुष्कळ गोष्टी सांगता येतील.
हुसेनच्या चित्रांच्या बाबतीत विशेष लक्षात येण्यासारखी अजून एक गोष्ट होती: अनेकदा मुंबईच्या फोर्ट भागात विविध कलादालनांत अनेक आधुनिक चित्रकारांची प्रदर्शनं भरायची. मध्यवर्ती भाग असल्यामुळे कलेविषयी पूर्णत: अनभिज्ञ असे सर्व सामाजिक थरांतले अनेक लोक जाताजाता ही प्रदर्शनं पहायला यायचे. ते हुसेनच्या चित्रांकडे जितके पटकन आकर्षले जायचे तितके क्वचित इतरांच्या चित्राकडे जाताना दिसत. हुसेनच्या चित्रांमध्ये त्यांना काहीतरी आपल्या परिचयाचं दिसायचं. यामागे हुसेनची भारतीय दृष्टीची जाण दिसत असे. (असे अनुभव आता येत नाहीत. कारण हुसेनची चित्रं प्रदर्शित करायला कलादालनं घाबरतात. असो.)
पुष्कळ महागात ज्या कलाकृती विकल्या जातात त्यांच्या बाबतींत येणारी एक अडचण म्हणजे त्या बाजाराच्या काल्यामध्ये आणि खाजगी संग्रहांमध्ये हरवतात आणि आंतरजालावर त्यांच्या प्रतिमा उपलब्ध नसतात. तरीही त्यातल्या त्यात हुसेनच्या मृत्यूच्या निमित्तानं ज्या काही थोड्याबहुत प्रतिमा उपलब्ध झाल्या त्या खाली देत आहे. पण त्याच्या कलेचा हा एक छोटा प्रातिनिधिक अंशही नाही हे लक्षात घ्या. (इथे लेख संपला आहे. आता फक्त चित्रांचा आस्वाद घ्या.)

वाचने
38800
वाचनखूण
प्रतिक्रिया
67
लेख
In reply to लेख by श्रावण मोडक
+१
छान चित्र
In reply to छान चित्र by रणजित चितळे
लेख आणि चित्रे छान आहेत.
हुसेनच्या मृत्यूची बातमी
In reply to हुसेनच्या मृत्यूची बातमी by परिकथेतील राजकुमार
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
In reply to हुसेनच्या मृत्यूची बातमी by परिकथेतील राजकुमार
+१००००१
In reply to हुसेनच्या मृत्यूची बातमी by परिकथेतील राजकुमार
१०००% सहमत. असेच म्हणतो.
चांगला लेख
हुसेनांनी काढलेले घोड्याचे
हुसैन सर खरे तर फारसे कुणाला कळलेच नाही
In reply to हुसैन सर खरे तर फारसे कुणाला कळलेच नाही by वाहीदा
लेख अतिशय सुंदर आणि ही
ज्याने पाप केले नाही, त्याने दगड मारावा..
In reply to ज्याने पाप केले नाही, त्याने दगड मारावा.. by योगप्रभू
पण जे फक्त दाढीचा ब्रश नियमित

In reply to पण जे फक्त दाढीचा ब्रश नियमित by अभिज्ञ
पहावे आपणासी आपण...
In reply to पहावे आपणासी आपण... by योगप्रभू
>>कला या अंगाने पाहिले तर
In reply to ज्याने पाप केले नाही, त्याने दगड मारावा.. by योगप्रभू
>>हुसेन यांच्यावर बाळासाहेब
In reply to >>हुसेन यांच्यावर बाळासाहेब by नगरीनिरंजन
सहमत

अगदी बरोबर
In reply to ज्याने पाप केले नाही, त्याने दगड मारावा.. by योगप्रभू
हुसेन यांच्यावर बाळासाहेब
In reply to हुसेन यांच्यावर बाळासाहेब by मृत्युन्जय
"असे असेल तर हुसेननी काढलेली
In reply to हुसेन यांच्यावर बाळासाहेब by मृत्युन्जय
दाऊद च्या गुन्हाची सजा (मराठी?) सर्व-सामान्य मुसलमानांना का ??
In reply to दाऊद च्या गुन्हाची सजा (मराठी?) सर्व-सामान्य मुसलमानांना का ?? by वाहीदा
सर्व मुसलमान हे धर्मांध असतात
In reply to सर्व मुसलमान हे धर्मांध असतात by मृत्युन्जय
अर्थाचा अनर्थ करण्यात पटाईट आहात
In reply to अर्थाचा अनर्थ करण्यात पटाईट आहात by वाहीदा
मी आधीच सांगीतले आहे की
In reply to ज्याने पाप केले नाही, त्याने दगड मारावा.. by योगप्रभू
'त्यांचा अल्ला त्यांना शांती
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सेरेपी
>>एक प्रश्नः ते आपल्या जुन्या
In reply to धन्यवाद by सेरेपी
एक प्रश्नः ते आपल्या जुन्या
In reply to एक प्रश्नः ते आपल्या जुन्या by मृत्युन्जय
समजण्यात काही तरी गफलत होत आहे का ?
In reply to समजण्यात काही तरी गफलत होत आहे का ? by वाहीदा
त्यांनी जे काही केले तो
हुसेनच्या मृत्यूची बातमी
लेख आवडला. हुसेन बद्दल हिंदू
परिचय
लेख मनापासून वाचला. हिंदू
In reply to लेख मनापासून वाचला. हिंदू by शाहरुख
>>>तसेच या चित्रांचे
In reply to >>>तसेच या चित्रांचे by अरुण मनोहर
खोडकरपणा तर केला आहेच पण
या विषयाबाबत काहीच माहिती
वरील लेखात जंतू यांनी राजा
In reply to वरील लेखात जंतू यांनी राजा by जगड्या
तथाकथित
In reply to तथाकथित by चित्रा
+१
In reply to तथाकथित by चित्रा
जरा वेगळ्या अंगाने...
In reply to जरा वेगळ्या अंगाने... by योगप्रभू
बरोबर
In reply to वरील लेखात जंतू यांनी राजा by जगड्या
धन्यवाद
In reply to धन्यवाद by गोगोल
धन्यवाद व उत्तर
>>नग्नतेला फारशी नावे ठेवता
प्रतिक्रियांविषयी प्रतिक्रिया
In reply to प्रतिक्रियांविषयी प्रतिक्रिया by चिंतातुर जंतू
प्रतिक्रिया वाचून गंमतही
In reply to प्रतिक्रिया वाचून गंमतही by परिकथेतील राजकुमार
Half knowledge is Dangerous !
वादग्रस्त
भारतीय आधुनिक चित्रकलेच्या परंपरेची ओळख
काही प्रतिक्रिया वाचून लक्षात
In reply to काही प्रतिक्रिया वाचून लक्षात by अरुण मनोहर
ओह ! तुमच्या वरील
काही प्रतिक्रिया वाचून लक्षात
दुसरा भाग दिलेला आहे
(वरातीमागून घोडं!)
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
प्र. का. टा. आ.
दुर्दैव! आणि काय?
In reply to दुर्दैव! आणि काय? by धमाल मुलगा
इर्शाद!!
In reply to इर्शाद!! by Nile
चालायचंच की. शेवटी....
In reply to दुर्दैव! आणि काय? by धमाल मुलगा
ह्या वाक्याद्वारे श्री.जंतू
In reply to दुर्दैव! आणि काय? by धमाल मुलगा
+१००१
सडक्या ?
सहमत आहे
बाकी