Skip to main content

समाज

इण्टरेस्टिंग गोष्ट

लेखक इरसाल यांनी सोमवार, 27/06/2011 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी कुठली गोष्ट कुठे जुळून येईल सांगता येत नाही. झाले असे की २४ जून ला ऑफिस मधे सहजच चाळता-चाळता एका फोल्डर मधे मागील वर्षाचे काही फोटो सापडले. तारीख होती २५ जून २०१०. नेमका ह्या दिवशी आमच्या मागच्या कंपनीत एच. आर. चा पाठवणी कार्यक्रम होता. त्यावेळी हजर असणार्‍या सगळ्यांना म्हणजे हेडना फोन लावला कारण आम्ही बहुसंख्य तिथून आधीच कटलो होतो. सगळे एकदम खुश, बोलले की पुन्हा एकदा मागील वर्षी जिथे भेटलो होतो तिथेच भेटूया. थोडीफार फोनफोनि करून जागा ठरवली. डि. एस. ओ. आय. धौला-कुआ, नवी दिल्ली. तुम्ही मिलीटरी किंवा तत्सम पाठबळचे नसला तर डि.एस.ओ.आय. मधे तुम्हाला प्रवेश नाही.

तुका जातो वैकुंठाला

लेखक यकु यांनी शनिवार, 25/06/2011 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
न कळत्या वयात प्रभातचा संत तुकाराम पाहिला होता - खूप रडलोही होतो. अगदी काल-पर्वा युट्य़ूबवर संत तुकाराम चित्रपटातील दोन क्लिप्स पुन्हा एकदा पाहाण्यात आल्या. त्या उतरवूनदेखील घेतल्या. या चित्रपटातील तुकोबाची भूमिका विष्णुपंत पागनिसांची (पु.लं. च्या हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका मधली पेस्तनकांकाची "अरे साला काय ऎक्टिंग, तुला सांगतो साला ओरिजिनल तुकारामबी असा नसेल, ते विस्नुपंत आता वैकुंटमदी असेल, सिटिंग नेक्स्ट टू दी गॉड..." ही दाद आठवते का?). विष्णुपंत पागनीसांनी केलेल्या तुकारामाच्या या भूमिकेने त्या काळात अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते.

निरागस चेहेर्‍याआडचे धर्मांतर

लेखक आंसमा शख्स यांनी गुरुवार, 23/06/2011 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही संस्था फार मोठ्या असतात. त्यांची पोहोच ही मोठी असते. कायदेशीर आणि बेकायदेशीर अशी अनेक हत्यारे त्यांच्याकडे असतात. अशा संस्थांविषयी लिखाण करतांना कसे करावे हा मोठा पेच आहे. कारण मी एक सामान्य माणूस आहे. मला अचानकपणे रहस्यमय रित्या गायब व्हायचे नाही. किंवा माझा अचानक अपघाती मृत्युही घडायला नको आहे. अशा परिस्थितीत मी एखाद्या बलाढ्य संस्थेच्या धर्मांतराच्या कामाच्या स्वरूपाचे अवलोकन कसे करणार? वल्ड विजन या संस्थेच्या स्वरूपाबद्दल माहिती देणारे काही लेखन मी केले होते. ते माझा हेतु फक्त पॉलिटिकली करेक्ट स्वरूपात लेखन करण्याचा होता.

तुम्ही नकळतपणे धर्मांतराला मदत करत आहात का?

लेखक आंसमा शख्स यांनी मंगळवार, 21/06/2011 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
वल्ड व्हिजनच्या लोभसवाण्या जाहिराती आपण सर्वजण पाहत असतो. त्या निरागस चेहेर्‍याच्या मुलांना मदत करण्याची इच्छा आपणा सर्वांनाच होते. यांच्या जाहिराती महत्त्वाची संकेतस्थळे, बरेचसे कॉर्पोरेट इव्हेंटस ते चक्क जेट एयरवेज मध्ये फिरणारा डोनेशनचा डबा येथ पर्यंत दिसतात. मी ही अशाच एका निरागस चेहेर्‍याच्या मीना नावाच्या मुलीला मदत देण्याच्या निर्णयावर येणार होतो. पण पैसे देतांना आधी हात भाजले आहेत म्हणून जरा खात्री करण्यासाठी माहिती घ्यायला सुरुवात केली. मला मिळालेली माहिती तुमच्या पर्यंतही पोहोचावी म्हणून हे लेखन करतो आहे.

ज्येष्ठ नागरिक अत्याचार : जागृती, कायदा, मदत व उपाय

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 16/06/2011 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
सत्तर वर्षाच्या डॉ. सिंग यांना दोन वर्षांपूर्वी पत्नीशोक झाला. पण आपला मुलगा, सून व नातू यांच्या सहवासात आपले दु:ख कमी होईल असे त्यांना वाटले. पण खरे दु:ख तर पुढेच होते. आपल्याच मालकीच्या घरात डॉ. सिंगांना हळूहळू जगणे असह्य झाले. मधुमेहाचे रोगी असलेल्या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, घरातील वावरणे, घरातील व्यवहारांत सहभाग याविषयी त्यांच्याच घरच्यांनी उदासीनता दाखवायला सुरुवात केली. नियमित वेळेला खाणे, पथ्य वगैरे तर राहूच दे, पण त्यांनी काही सांगितलेलेही घरच्यांना पटेना. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की डॉ.