Skip to main content

समाज

मिपाकरांना मदतीचे आवाहन!

लेखक अनामिका यांनी मंगळवार, 18/10/2011 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरांना सस्नेह जय महाराष्ट्र! तुंम्हास एक आवाहन करण्यासाठी हा पत्र प्रपंच्.ठाण्यातील शिवाईनगर भागात राहणारा आमच्या शाळेतील २००६-०७ ला दहावी पास झालेला, एक अत्यंत हुशार मुलगा समीर पितळे (जो विज्ञान विषयात होमीबाबापर्यंत जाउन आला होता) यास दि.५/१०/२०११ रोजी रेमंड, समतानगर येथे बाइकवरुन जात असताना मागुन वाहनाने धडक दिल्याने मोठा अपघात झाला, ज्यात बाजुने जाणारा ट्रक त्याच्या हातावरुन गेल्याने हात जबर जखमी झाला आहे (कदाचित हात गमवण्याची शक्यता आहे) ज्युपिटरमधे ऑपरेशनसाठी मोठा खर्च येत आहे. त्याची २लाखाची मेडीक्लेम पोलिसी आहे, परंतु आता पर्यंत रु.४.५० लाख इतका खर्च झाला असुन साधारण १०-१२ लाख रुपयांची अजुन आवश्यकता आहे...त्याच्या वर्गातील मुलांनी रु.२०,५०० जमवले आहेत, सध्या तो शिकत असलेल्या केळकर महाविद्यालयात देखील मदत निधी गोळा केला जात आहे..... माजी विद्यार्थ्यातर्फे समाजसेवी संस्था तसेच निरनिराळ्या पक्षांच्या सर्व नगरसेवक, आमदार, खासदारांकडुन मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, सिद्धीविनायक ट्रस्ट दादर आणि साईबाबा संस्थान वर्तकनगर येथुन सुद्धा मदतीचे प्रयत्न माजी विदयार्थी करत आहेत. सदर मुलास आपल्याकडून काहि आर्थिक मदत होऊ शकेल का?.मुलगा अत्यंत हुशार व अभ्यासू आहे आणि आईवडिलांच एकुलते एक अपत्य आहे......सध्या जुपिटर मधे उपचार सुरु आहेत पण वेळीच उपाय न झाल्यास हात गमावण्याचा धोका संभवतो..निधी अभावी त्याच्या उपचारात खंड पडल्यास त्याच्या भावी आयुष्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.......आपण सगळेच मिपा सदस्य कायम सकारात्मक उद्देश बाळगून येथे लिखाण करत असतोच्...समाजाप्रती असलेली आपल्या सगळ्यांची बांधिलकी वेळोवेळी लिखाणातून अधोरेखित होत असतेच्....सदरहू गरजू मुलास आर्थिक मदत मिळवून देण्यात आपले सर्व मिपासदस्य नक्कीच मदत करतीत या भावनेतून इथे लिहिण्याचे धाडस केले आहे....आपणा सर्वांस विनंती करण्याच्या हेतूने हे लिहिते आहे...शक्य झाल्यास नक्की मदत करावीत हि कळकळीची विनंती..... आपणास सदर व्यक्तीबद्दल खातरजमा करावयाची असल्यास जुपिटर हॉस्पिटल ठाणे येथे करु शकता.. आपल्याकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे... जय हिंद जय महाराष्ट्र मदत निधीसाठी संपर्क क्रमांक सचिन ९८९२२५४४६६ (१९९५-९६) अमोल ९७६६६३००९० (२०००-०१) प्रतिक ९८७०९०३५६६ (२००६-०७) आदित्य ९००४०२७१११ (२००६-०७) आशिष ८६५२५०८५१५ (२००६-०७) आपणास येउन पैसे दयायला, वेळ नसल्यास पैसे आपल्या घरुन देखिल गोळा करता येतील

धर्माच्या अड्ड्यात निधर्मी देश

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 18/10/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
या कवितेची प्रेरणा---प्रकाश१११ यांची निधर्मी देशात..!! ही कविता,हे उघड आहे.पण तरीही दोन्ही मध्ये एक मूलभूत फरकही आहे.
काव्यरस

सामुदायिक हुषारी

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 15/10/2011 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
१९०७ मधली, ब्रिटनमधील एका लहानशा गावात घडलेली ही एक गोष्ट आहे. त्या गावात एक जत्रा भरली होती. पंचक्रोशीतले शेतकरी, व्यापारी, पशुपक्षी पालन करणारे अशांनी तिथे आपले स्टॉल थाटले होते. लोक भटकत होते, खातपीत होते आणि खरेदी विक्री चालू होती. एका स्टॉलवर मांस विकणारा एक शेतकरी होता. गर्दी जमवायला त्याने एक शक्कल लढवली. एक चांगला धष्टपुष्ट बैल स्टॉलवर बांधला. त्याचे वजन अचूक ओळखणार्‍याला अमके एक पौंड बक्षीस लावले. त्याने चिठ्ठ्या बनवल्या होत्या. त्यावर आपले नाव आणि आपले उत्तर लिहून द्यायचे. संध्याकाळी जत्रा संपायच्या वेळेस बक्षीस जाहीर होणार होते. अर्थातच त्याची शक्कल कामी आली.

डेनिस रिचीला श्रध्द्दांजली

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 14/10/2011 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
'C' programming चा जनक डेनिस रिची आज आपल्यातुन निघुन गेला. Unix operating system च्या निर्मीत्तीमध्येही याचा खुप मोठा वाटा होता. Assembly च्या जमान्यात 'C' खरच एक रिव्होल्युशन होते. त्याला श्रध्द्दांजली चेतन

वेळ आहे कुणाला?

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 14/10/2011 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
मेंढरं ? मेंढरं आणि आम्ही छे! छे! काहीतरी गैरसमज होतोय. आमच्यामागे इतकी कामं पडलेली असतात की आम्हांला कुठे म्हणजे कुठेही लक्ष द्यायला वेळच नसतो. आणि आपला नगरसेवक कोण आहे? हे सर्वांना माहीत झाले म्हणजे काय तो वार्डातली पेंडिंग कामे तातडीने मार्गी लावणार आहे का? देशाचं नेतृत्व काय करतंय? त्याने कसं काम करावं? हे सांगणारे आपण महाभाग कोण? आणि जरी ओरडून सांगितलं तरी ते ऐकलं जाईलच हे कशावरून? नळी फुंकिली सोनारे... असं नेहमी होतंच आलंय की नाही? आता ह्या जनलोकपालाचंच घ्या. ते विधेयक पारित झाल्यावर फार फार तर दोन चार वर्षे भ्रष्टाचार होणार नाही.

अकिला & दी बी ...

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 13/10/2011 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणातली गुणवत्ता आणि विद्यार्थ्याची कौटुंबिक्/सामाजिक्/आर्थिक पार्श्वभुमी ह्यांचे परस्परसंबंध आहे म्हटला तर आहे आणि नाही म्हटला तर नाही. लाखा-लाखाने फिया घेऊन 'हमखास' यश मिळवुन देणार्‍या संस्था/क्लासेस आहेत, त्यात जाणारे विद्यार्थीही आहेत.

कोठे जाशी भोगा...!!

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 11/10/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
''थांबा थांबा.... हे...हे समोरचं होर्डिंग... वाढदिवसाच्या शुभेच्छांचं हो.... तो कोणाचा फोटो आहे?'' सिग्नल सुटत असताना आमच्या कारच्या खिडकीतून मला दिसलेलं ते क्षणभर दचकायला लावणारं होर्डिंग... सॉरी... होर्डिंगवरचा चेहरा.... ''ताई, हे तर आमच्या भागातले प्रसिद्ध राजकारणी आहेत हो मोठे! खूप वट आहे हां त्यांचा.... इथं बऱ्याच जमिनी, इमारती, शॉपिंग मॉल्स त्यांच्याच मालकीची आहेत. सगळीकडे होल्ड आहे म्हणे त्यांचा! कोणीही त्यांच्याकडे गेला की त्याचं काम झालंच म्हणून समजा.... दिलेला शब्द पडू देत नाहीत म्हणून रुबाब आहे बरं का त्यांचा...

शिवसेना दसरा मेळावा २०११, ६ ऑक्टोबर

लेखक कौन्तेय यांनी मंगळवार, 11/10/2011 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
६ ऑक्टोबर २०११ला आयुक्ष्यात पहिलयांदा सेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्कावर हजेरी लावली. तीही बायकोसोबत. बाळासाहेबांची जादू नेमकी काय ते याचि देही याचि डोळां बघणं आवश्यक होतं. माध्यमांवर यांबाबतीत अवलंबून रहाता येतच नाही. पाहिलं तर खरंच, दुसऱ्या दिवशी ‘अण्णा हजाऱ्यांबद्दल ठाकरे असं असं म्हणाले' अशी एक खोडसाळ बातमी पेपरवाल्यांनी सर्व-संगनमताने दिलेलीच होती. मग एका दिवसासाठी व्यवस्थित ठाकरे-हजारे कुस्ती रंगली. वास्तविक अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते. मैदानावरचा प्रत्यक्षदर्शी म्हणून हे मी खात्रीपूर्वक सांगतो. आणखी हेही की बाळासाहेब ठाकरे ही एक जादू आहे.

मनातलं, जनातलं

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 07/10/2011 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
लिहु कि नको? का लिहावं? खरचं? काय लिहाव? का? अनेक प्रश्न. मी का लिहितो? कशासाठी? इथेच का लिहाव? ...... आजचा दिवस असाच गेला... आयुष्य का जगतो.. माहित नाही.. नक्की कुठे जायचय.. काय करायचय. आजकाल मिपावर काय धिंगाणा चाललाय.. खरच चाललाय कि मला वाटतय. हे तर कायमचच.. बदल होत राहतात. कुणीतरी पिंग केलं होतं.. ते काय होतं. कुठे थांबेल? की स्वत:च थांबाव. एक ब्रेक घ्यावा. शांत जागेत जावं. फोटोग्राफी सुरु करावी का? जाउदेत.. आज काय जेवायचं. फेसबुकवर जाउया.. बघुया काय काय नविन आहे. अरे इथे पण काहीच नाही.. एखादा सिनेमा पाहुया. पण कोणता आणि काय मिळणार, ह्म्म्म्म आज एखाद्या मित्राला फोन करुया.