Skip to main content

समाज

कप आणी बशी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 28/09/2011 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
कप आणी बशी ही जगत विख्यात जोडी आहे..एका लेखकाने संसाराला कप बशीच्या स्टॅंडची उपमा देत पुरुष म्हणजे कप लटकत असतात तर बश्या आरामात वर पहुडलेल्या असतात..असे वाचाल्याचे स्मरते.. आमच्या लहान पणी समाजात बशीने चहा पिण्याच्या प्रघात होता ..पण फुर्र आवाज करायचा नाहि असा दंडक होता कारण तसे करणे मागासलेपणाचे समजायचे.. पढे जसा काळ सरकत गेला तसे लोक घरात बशीने पण बाहेर मात्र कपाने चा पिवु लागले..चार चौघात बशिने चहा पिणे असभ्य/कमी पणाचे वाटु लागले.. आज तर जवळ जवळ बशीचा चहा पिण्या साठी वापर ना घरात वा बाहेर कुणी करताना दिसतो... एका मित्राने पुर्वि एक टिप दिली होति..हॉटेल मधे चहा पिताना नेहमी डाव्या हातात क

(आणखी एक) सर्वपित्रि पेश्शल ... नरकभेट !

लेखक मस्तानी यांनी बुधवार, 28/09/2011 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
जर मी तुम्हाला सांगितल की "एकदा किनई आम्ही नरकात गेलो होतो" तर तुम्ही नक्कीच मला 'भूतबाधा झालेली दिसतेय हिला' किंवा 'सर्वपित्रिचा परिणाम काय हो' किंवा तत्सम काहीतरी म्हणाल. पण जरा थांबा, मी अगदी खर तेच सांगते आहे. हा बघा पुरावा ... http://www.hell2u.com/ गेले काही दिवस इथे भूतांविषयी 'चर्चा' चालू आहे ती वाचताना आठवण झाली तीन वर्षांपूर्वी जिथे भेट दिली होती अशा एका छोट्याश्या जागेची.

आपणच भान ठेवायला हव..............

लेखक gangotri_ यांनी सोमवार, 26/09/2011 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पिलु(माझी छोटी शेजारिण ) काल घरी आली आणि म्हणाली " दीदी मी आज वर्गातल्या एका मुलाला कानाखाली दिली" आता ही पिलु 2 रीत आहे.मी तिला म्हटलं "पिल्या तू शाळेत मस्ती करायला जातेस का? मारामारी नाही करायची .." तर ती म्हणाली "दीदी तो मुलगा माला म्हटलं माझ्याशी लग्न करशील का???????" आता मात्र मला शॉक बसला.2 रीतल्या मुलांना कधीपासून लग्नाचं सुचायला लागलं ????? मी तिच्या शाळेत गेले , त्या मुलाशी बोलून त्याला समजावून सांगितलं की अभ्यासात लक्ष द्या . पण .......... पण..... प्रॉब्लेम सुटला का एवढ्यावरच?????? तो त्यांच्या पुरता मिटला .

आजचा सवाल-'?'

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 26/09/2011 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
मानव जेंव्हा अदीम अवस्थेतून पुढे सरकला,त्या काळात धर्म कल्पना बाल्यावस्थेत होत्या,पुरुष प्रक्रुती यांच्या मिलनातून स्रुष्टी घडली...हा सामान्यतः भारतीय पौरुषी धर्मांचा पाया आहे.ही कल्पना कमी अधिक फरकानी सगळीकडे आलेली आहे. याच कल्पनेला आधारभूत मानून पुढचा पुरुष/प्रक्रुती यांचा आजचा सवाल-जबाब लिहिला आहे... पु-मरणं येऊ दे याचे तेंव्हा,काशास चिंता आज करू?

समारोप - गुरूपदेश

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 23/09/2011 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो तुमच्या भरघोस आणि उत्स्फूर्त प्रतिसादातून बरेच काही शिकायला मिळाले. पण एक खुलासा आवश्यक आहे. माझ्या गुरूला मी अंतर्बाह्य ठाऊक असल्याने माझे भले कशात आहे ते त्यांना चांगले ठाऊक होते. त्यांनी दिलेला सल्ला पूर्णपणे वैयक्तिक होता. तो माझ्याकरता म्हणजे विशिष्ट व्यक्तीकरता होता. मला माझा विकास साधायचा असेल तर मी ज्या वातावरणात असायला हवे तेथे मी नव्हतो, एव्हढेच त्यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे आयायटियन्स बुद्धीमान की आयायटी बाहेरचे बुद्धीमान हा मुद्दा गैरलागू आहे. ज्योतिषाशी लावलेला संबंध तर अत्यंत हास्यास्पद आहे.

जशास तसे

लेखक शुचि यांनी गुरुवार, 22/09/2011 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्याशी कोणी उर्मटासारखे वागले, तरी तुम्ही त्या व्यक्तीशी चांगुलपणाने वागता की तुम्ही त्या व्यक्तीला "ईंट का जवाब पत्थर से" देता? उदा - तुमची बायको एखाद्या किरकोळ कारणावरून तुमच्याशी अतोनात भांडली, खूपच आक्रस्ताळेपणाने वागली तर भांडण झाल्यानंतर तिला खूष करण्यासाठी तुम्ही तिला गुलाबाचा गुच्छ पाठविता का? का तुमच्या कृतीमधून तिची चूक जाणवून देता? जर तुम्ही तिला गुलाबाचा गुच्छ पाठवत असाल तर मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून ते चूकीचे आहे. कारण तुमच्या कृतीमधून तुमच्या दुबळेपणाचा, चूकीचा संदेश तिच्याकडे जातो आहे.

३२ रुपये आहेत मग तुम्ही गरीब नाही

लेखक शाहिर यांनी गुरुवार, 22/09/2011 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या खिशात ३२ रुपये असतील तर तुम्ही गरीब नाहीत, असा आपल्या सरकारचा म्हणाना आहे . आयोगाच्या मते, देशातील शहरात राहणारी व्यक्ती ३२ रुपयांत तर ग्रामीण भागातील व्यक्ती २६ रुपयांत सहज एका दिवसाची गुजराण करू शकतो. पूर्ण हिशोब केला असता शहरात राहणार्‍या एका माणसाला एका महिन्याच्या खर्चासाठी ९६५ रुपये पुरेसे आहेत. ग्रामीण भागात असाल, तर खर्च ७८१ रुपये इतका होऊ शकतो.

हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/09/2011 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार सदाचार नाही हा तर आहे भ्रष्ट आचार भ्रष्ट आचार काम करण्यासाठी कुणी ऑफीसात येतो, ऑफिसर कारकुनाची विनवणी करतो आज ये उद्या ये म्हणून वेळ फुक्कट जातो, पैसे घेवूनच मग कामं तो करतो असल्या कामासाठी लाच खाणं झाला शिष्टाचार शिष्टाचार हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार गोरगरीबाचे कामं तुम्ही लवकर कराना, चिल्यापिल्यांचे तुम्ही आशिर्वाद घ्याना माणसातली माणूसकी आता जागवाना पैसे मागण्याचा खेळ आता संपवाना सदाचार, सुनीती, निष्ठा यांचा करा प्रचार, करा प्रचार हटव