Skip to main content

समाज

सीमोल्लंघन

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 07/10/2011 05:17 या दिवशी प्रकाशित केले.
दसरा! रावणाशी झालेलं युद्ध संपलं. आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी हे नाव पडलं. रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर तिचा शोध, त्यासाठी सुग्रीवाशी मैत्री, त्यातून हनुमानाची भक्ती, लंकादहन, सेतूबांधणी व त्यानंतर नऊ दिवसांचं घनघोर युद्ध. अशा लांबलचक चाललेल्या प्रवासाची समाप्ती झाली. एक पर्व संपलं. आणि नवीन रामराज्य सुरू झालं. पांडवांचा अज्ञातवास संपला. अर्जुनाने बृहन्नडेची घुंगरं पायातून काढली आणि हातात गांडिव धारण केलं. भीमाने बल्लवाचार्याचा झारा ठेवला आणि परत गदा धरली. शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली शस्त्रं अज्ञातवासातून पुन्हा बाहेर आली, त्यांच्या टणत्कारासह, खणत्कारासह.

आय.आय.टी. एक निरीक्षण्/आत्मपरीक्षण

लेखक अन्या दातार यांनी शुक्रवार, 07/10/2011 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या एकंदर आय.आय.टी. मूर्ती, भगत इ. इ. वाचून काही प्रश्न पुढे आले. त्यांची उत्तरे शोधण्याचा एक साधासा प्रयत्न मी माझ्यापरिने करत आहे. आपणा सर्वांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतोय. १. आय आय टी होली काऊ आहे काय? नक्कीच नाही. पण मीडिया हाईपमुळे, तिथल्या विद्यार्थ्यांना मिळणार्‍या भरमसाठ पगारामुळे (जरी इनोवेटीव किंवा इंजिनीअरिंग्शी दुरान्वयेही संबंध नसलातरी) तशी एक धारणा निर्माण झाली, जिचा विस्तार प्रचंड वेगाने झाला. २. आय आय टीत प्रवेश मिळणे फारच अवघड आहे का? डीग्री लेवलला म्हणत असाल तर हो. जेईई (JEE) क्रॅक करणे हे गेट (GATE) क्रॅक करण्यापेक्षा कितीतरी अवघड आहे.

इंडोवेशन

लेखक विकास यांनी बुधवार, 05/10/2011 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
गेले दोन दिवस इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि चेतन भगत यांचे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कंपन्यां कशा या मुलांना वापरतात यावरून वाद चालला होता. पण दोघांचाही आपल्याकडील सिस्टीम आणि त्या सिस्टीमचे प्रॉडक्ट असलेले व्यावसायीक अशा दोन्हीवर रास्त असला तरी काहीसा त्रागाच दिसत होता. त्याच्याकडेच बघण्याचा दुसरा दृष्टीकोन कर्मधर्मसंयोगाने मला काल ऐकायला मिळाला. ठिकाण होते एम आय टी आणि वक्ते होते, डॉ. रघुनाथ माशेलकर. विषयाचा मथळा होता: Innovation's Holy Grail: Getting More from Less for Many. उपस्थित हे भारतीय तसेच अभारतीय होते - विद्यार्थी, प्राध्यापक/फॅकल्टी, उद्योजक आणि शास्त्रज्ञ.

अ सेपरेशन – इराणी घटस्फोट की इराणपासून घटस्फोट?

लेखक चिंतातुर जंतू यांनी सोमवार, 03/10/2011 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
A Separation - Poster गेल्या काही वर्षांत अहमदीनेजादच्या अधिपत्याखाली इराण हा आपल्या सर्वसामान्य नागरिकांवर अधिकाधिक बळजबरी करू लागला आहे. सरकारला विरोध केला म्हणून जाफर पनाहीसारख्या जगविख्यात दिग्दर्शकाला सहा वर्षं कैद आणि २० वर्षं चित्रपट बनवायला आणि देशाबाहेर जायला बंदी अशी शिक्षा भोगायला लागते आहे. नागरिकांच्या सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीवर सरकारची कडक नजर आहे. अर्थात, चित्रपटासारख्या माध्यमावर कडक सेन्सॉरशिप आहे.

मिथ्या-शास्त्रे - न्या. होम्सचा गमतीदार परिच्छेद

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 30/09/2011 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
ऑलिव्हर वेंडेल होम्स हा १९०२-१९३२ सालापर्यंत यू.एस. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात व्यायाधीश होता. बिंदूगामी पण गमतीदार लिखाण हा त्याचा हातखंडा होता. त्याचा हा परिच्छेद नुकताच वाचला, तो मजेदार आणि मननीय वाटला :
- - - - - मिथ्या-शास्त्रांबाबत (Pseudo-science) -
मित्रांनो, सुरुवातीला मी तुम्हाला मिथ्या-शास्त्राची व्याख्या देतो. मिथ्या-शास्त्रांत स्वतःचे खास शब्द (nomenclature) असलेले तंत्र असते.

‘फोर लायन्स’ – बावळट जिहादींची आचरट ब्रिटिश कॉमेडी

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 29/09/2011 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
Four Lions - Poster कोणतीही गोष्ट पवित्र न मानता कशाचीही यथेच्छ चेष्टा करण्यात ब्रिटिश लोक पारंगत आहेत. मग जिहादी दहशतवाद याला अपवाद कसा ठरेल? दहशतवाद्यांची आणि त्याला तोंड देणाऱ्या ब्रिटिशांचीही खिल्ली उडवणारा ‘फोर लायन्स’ हा ब्रिटिश चित्रपट Channel 4वर नुकताच ११ सप्टेंबरच्या दशकपूर्तीनिमित्त दाखवण्यात आला. असला नमुना चित्रपट अशा वेळी दाखवून ब्रिटिशांनी आपली विनोदबुद्धी आजही शाबूत आहे याचाच निर्वाळा दिला.