Skip to main content

समाज

देवळातला शंकर

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 18/09/2011 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा शंकर देवळात कान उघडुन बसला भक्तांच्या ललकाय्रा ऐकुन खुदकन मनात हसला भं...भोले..ही अरोळी खरोखरच छप्परतोड कुणाच्या मनाची जखम तर कुणाचा नुसताच फोड माझ्याकडे येणारे असेच कुणी शांत,कुणी भेदरलेले आयुष्याच्या कलहात कुणी मिटलेले,कुणी विटलेले होते काहो ती अरोळी.. जीवनरोगाचे औषध? का थोड्या वेळाचं मलम नी शेवटी नुसतीच खदखद तुंम्ही म्हणाल या खेरीज दुसरा जालीम उपाय काय? का तुंम्हीही अमच्यासारखेच..? समस्या आली...की बाय बाय मी तुम्हाला सांगेन...की मीही तुमच्यातलाच आहे फार पूर्वी माणुस होतो अता मात्र 'देव' आहे मोडुन टाका ते देऊळ अणी मुक्त करा मला माझा आधार..कशाला? एकमेकांचा घेऊ...चला..! पुरे झालं म

माझं गाव

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 18/09/2011 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझं गाव
याहो याहो पाव्हने तुम्ही; या हो माझ्या गावाला वाहता ओढा ओलांडा; तेव्हा गाडी लागेल शिवेला वेशीवरती आहे मारूतीचे मंदिर दर्शन घ्या त्याचे; मुर्ती पुरातन सुंदर थोडं पुढं या; तुम्हाला लागेल बावडी वेशीतून शिरा आत; तिच्यावर आहे चावडी डाव्या हाताला ईमारत नवी कौलारू ग्रंथालय अभ्यासिका तेथे सुरू; तुम्ही बोला हळू बँक अन व्यायामशाळा ती बघा समोर पोरं खेळतात कब्बडी; ते गावाचे मैदान या की जरा पुढे; पहा दवाखाना सरकारी पंचक्रोशीचे रुग्ण इथं येती होण्यासाठी बरी इथून पुढं लागेल माळी गल्ली, शिंपी आळी फाल्गूना
काव्यरस

निस्तीच पोकापोकी!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 16/09/2011 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकानं दुसऱ्याला पोक केलं की दुसऱ्यानं पहिल्याला पोक करायचं, कोणी ‘हे’ शेअर केलं की कोणी ‘ते’ शेअर करणार, कोणी ‘ह्याची’ इमेज पेष्ट केली की कोणी ‘तिच्या’ इमेजा पेष्ट करीत सुटणार... सोशल नेटवर्किंग साईटा म्हणजे निस्ती पोकापोकी झालीय बघा. काय मनाला वाट्टेल ते गरळ बाहेर टाकून ओकाओकी करीत जायचं. भिंतीवर चढून पाहिजे ते खरडीत निघायचं, वाट्टेल ते डकवित चालायचं, नक्को नक्को त्या लिंका पेष्टवित जायचं. मग त्या कोण उघडून पाहतो तर कोणी न उघडताच छान, मस्त, उत्तम असं लिहून पुढे पळतो. सकाळ झाली रे झाली की सुप्रभात, जीएम म्हणत कोण काय प्रतिक्रिया देतो ते चाळीत जायचं. दुपारीही तेच.

जग दर्शनका मेला

लेखक क्रेमर यांनी शुक्रवार, 16/09/2011 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
('उड जायेगा हंस अकेला' ही बहूधा कबीराची रचना अनेकदा कुमार गंधर्वांच्या आवाजात ऐकली होती. आज असेच सूचल्यावर पुन्हा ऐकली. तेव्हा सूचलेले काही विचार.) मी हंस एकटाच काय टोळक्यात/नेही उडतांना पाहिलेला नाही. त/नेवरून आठवले. टोळक्याने की टोळक्यात? म्हणजे या दोन शब्दांत नेमका काय फरक असावा? 'टोळक्याने' म्हणजे 'रस्त्याच्या कडेने' किंवा 'धीराने तोंड दिले' किंवा 'साल्याने नाहीच दिले' सारखे असावे. टोळके - एक शस्त्र किंवा ढाल किंवा उगाचचपणा. 'टोळक्यात'म्हणजे 'जगात काहीच नाही', 'पावसाळ्यात चिखल', 'टेम्पोत बसवला' किंवा 'रिक्षात चिंतन' वगैरे. थोडक्यात छोटा, मर्यादीत. कशाततरी बसणारा.

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 14/09/2011 08:19 या दिवशी प्रकाशित केले.

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध

वाढदिवसाच्या शुभेच्छा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 14/09/2011 07:14 या दिवशी प्रकाशित केले.
वेळोवेळी 'डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट' बनून विचार आम्हांस करण्यास प्रवृत्त करणार्‍या पंगाशेटना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंगाशेट हे आमच्या काही आवडत्या जाल-आयडींपैकी एक. आमचं शिव्या देणं असो वा प्रश्न विचारणं, पंगाशेटने सदैव तार्किक मुद्द्यांवर सहमती वा असहमती दाखवत आम्हांस विचार करण्यास भाग पाडलं. कधी थोडे चिमटे काढत पंगाशेटने कधी आमची निखळ करमणूकही केली. पंगाशेटना मी "जिवेत शरदः शतम्।" असं म्हणून शुभेच्छांची चार वाक्य संपवते.

पॉप टेट्स..

लेखक गवि यांनी सोमवार, 12/09/2011 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
पॉप टेट्स ही व्यक्ती म्हणजे माझ्या माहितीनुसार "आर्चीस" कॉमिक्समधल्या पोरापोरींच्या टोळक्याचा अड्डा असलेलं जे आवडतं रेस्टॉरंट असतं त्याचा मालक. "जगहेड" हे त्याचं बर्‍यापैकी खाबू गिर्‍हाईक. बस्स. पॉप टेट्सविषयी इतकी माहिती मला मिळाली आहे. पण हे नाव धारण करुन मुंबईत खूप ठिकाणी पॉप टेट्स "अनरेस्टॉरंट्स"ची मालिका उभी राहात आहे. मिपावर खादाडीच्या ठिकाणांविषयी शेकडो धागे आलेले आहेत. त्यातले अनेक धागे आणि त्यांच्यावर आलेल्या प्रतिक्रिया या गावोगावच्या मिसळीच्या टपर्‍या, वडापाव अशा रोडसाईड चविट्ट पदार्थांपासून ते उत्तमोत्तम हाटेलांपर्यंत सर्वकाही वर्णन करुन सांगणार्‍या आहेत.

दर्शन लालबागच्या राजाचे...

लेखक सुहास झेले यांनी रविवार, 11/09/2011 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्रीच्या सुमारास गेट वेच्या उधाणलेल्या समुद्रात काही सेकंदासाठी एक तेजस्वी प्रकाश पसरला. दिल्लीत परवा बॉम्बस्फोट झाला, त्यामुळे आज पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त होता. कोणाला वाटलं तो कॅमेराचा फ्लॅश आहे, तर कोणाला वाटलं लाईट हाऊसचा दिवा. कोणी ते विशेष गांभीर्याने घेतलं नाही आणि दुर्लक्ष केलं. इतक्यात एका हवालदाराने अंधारात उभ्या असलेल्या व्यक्तीला हटकले, "ए कोण रे तू, इतक्या रात्री इथे काय करतोयस, दिसत नाही इथे यायला बंदी आहे ते??" "नारायण नारायण...वत्सा तू मला ओळखले नाहीस काय? (हातातल्या चिपळ्या वाजवत) मी नारदमुनी, देवलोकी माझा मुक्काम असतो" पिऊन आला आहेस वाटतं? कुठे चालला आहेस?

चित्रकथेच्या स्वरूपात अण्णांचे भ्रष्टाचारविरोधी "बिल"

लेखक सुधीर काळे यांनी शनिवार, 10/09/2011 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
(१) २G, राष्ट्रकुल स्पर्धा वगैरेसाठी (२) पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स वगैरेसाठी (३)सरकारी कार्यालयांतील किरकोळ कामांसाठी