एकटेपणा- सत्य कथा
मी प्लॅटफॉर्मवर पोहचलो. भरपूर लोक दिसत आहेत. थोडी गर्दी आहे. पण माझ्यासारखा कोणीच नाही. मला एकटेपणाची तीव्र जाणीव झाली. कोणीही माझ्यासारखा दिसत नाहीय. असह्य एकटेपणा! मला खूप अस्वस्थ व बेचैन वाटतंय. नकळत मी सारखा बघतोय कोणी माझ्यासारखा दुसरा आहे का.
किती तरी वेळ गेला. गर्दीतही मी एकटाच. भीड में भी अकेला. असह्य एकटेपणा मला अस्वस्थ करतोय. मनात विचार सुरू आहे की माझ्यासारखा दुसरा कधी येईल, कधी येईल.
आणि दूरवर एक जण दिसला. त्याचं येणं मला दिलासा देतंय. तोही एकटा असावा. तोही मला शोधतोय. आणि अखेर त्याची व माझी नजरानजर झाली. आता आम्ही दोघंही निश्चिंत झालो. आता आम्ही एकटे नाही.
मिसळपाव
आत्ता लेट तिशीत असलेल्या पिढीचं नव्वदीतलं बालपण, शेन वाॅर्न या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, इतकं मोठं वलय त्या नावामागे होतं. बहुतेकांच्या स्मरणात शेन वाॅर्न म्हणजे शारजातला कोका-कोला कप, धुळीचे वादळ, सचिनने पुढे सरसावत मिड ऑनला मारलेले षटकार, इतकंच असेल, पण सच्च्या क्रिकेटवेड्या लोकांच्या हा फिरकीचा जादूगार कायम स्मरणात राह्यला, तो त्याच्या जादूई लेगस्पिनमुळे.