Skip to main content

सांग सांग भोलानाथ...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 22/04/2012 16:36 या दिवशी प्रकाशित केले.

आज मार्केटयार्डातुन फुलं घेऊन परत येताना,डोस्क्यावरच्या उन्हानी आणी आधी मार्केटमधे याच उन्हाळ्यामुळे फुलांच्या अव्वाच्यास्सव्वा वाढलेल्या रेटनी चांगलाच तापलो होतो.साली आंम्ही कायमची गिर्‍हाइकं असुनही अतिमहाग किमतीनी अती पडिक माल उचलायची वेळ आली की हे असच होतं.बाहेर पार्किंगकडे येऊन आमच्या न्हेमीच्या हाटिलवर गेलो.तर आज तेही काही अ-परिहार्य कारणानी बंद...! म्हणुन दुसरी टपरी गाठली आणी तिथे चहा देणार्‍या पोर्‍यानी सक्काळीच घातलेल्या इस्त्रीच्या शर्टवर चहा सांडवला.मग त्याच्या मालकाच्या शिव्या उघड आणी माझ्या मनात देऊन झाल्या.आज आपला दिवस नाही.असं मनाशी पुटपुटत गाडी काढली आणी कुठेतरी निरा

कलsssssssssर्क

लेखक अन्या दातार यांनी शनिवार, 21/04/2012 17:22 या दिवशी प्रकाशित केले.

सर्वप्रथम तुम्ही माझे अभिनंदन करावे अशी मी विनंती करतो. स्वतःच आरती ओवाळून घेतोय, कारण हा पराक्रमच असा आहे. मी चक्क मनोज कुमार कृत चित्रपट ‘क्लर्क’ (उच्चार: कलर्क) पूर्ण पहिला. ज्याचा एकतरी पुरावा म्हणजे हे रसग्रहण! दचकू नका. माझ्या भुताने लिहिले नाहीये. खुद्द मी; एक मर्त्य मानव या चित्रपटाचे रसग्रहण लिहीत आहे. आणि मी चक्क जिवंत आहे हे विशेषत्वाने लक्षात घ्या मंडळी!

''मसाला'' म(स्ट)स्त आहे...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 21/04/2012 16:46 या दिवशी प्रकाशित केले.

मसाल्या'ची मी तर प्रोमोज पाहिल्या पासुन वाट बघत होतो. वासही चांगला खमंग येत होता.आणी कारखान्याचा अंदाज असल्यानी तो खमंग असणार इतकं मनाशी पक्कं झालेलं होतं. त्यामुळे आज पुन्हा एकदा शिनुमा बघत असताना त्यात पुर्ण हरवायचा आनंद घेता आला.

डुप्लिकेट आयडी : एक मार्गदर्शन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 19/04/2012 12:56 या दिवशी प्रकाशित केले.

ढिस्क्लेमर :-

१) हा धागा निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने काढला असून, कोणत्याही गैरकृत्याला उत्तेजन देण्याचा हेतू नाही.

२) धाग्यातील युक्त्या वापरून देखील आपण तोंडावरती पडल्यास लेखक जबाबदार नाही.

पारंपारीक ज्ञानाचे जालीय ग्रंथालय

लेखक विकास यांनी गुरुवार, 19/04/2012 06:21 या दिवशी प्रकाशित केले.

पूर्वपिठीका:

"पौराणिक विमाने" या चर्चेच्या निमित्ताने येथे माशेलकरांच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला होता. त्यातील माझ्या लेखी महत्वाचा आणि व्यावहारीक भाग पेटंट्सच्या संद्रर्भात होता. त्याला मी जरी हा प्रतिसाद दिला होता, त्यातील माशेलकरांसंदर्भातील भागः

नकार

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 17/04/2012 16:42 या दिवशी प्रकाशित केले.

नकार

तू,

तू मला जन्म दे
तुझ्या शिवाय कोण झेलेल हा प्रसव कल्लोळ?
अन
तुझ्याशिवाय कोण करेल हा अट्टाहास?
म्हणूनच तू मला जन्म दे
अग त्या मूळेच तर तू महान ठरतेस

पण

कृपा करून

तू माझ्या पोटी नको येऊ.

तू

आय आय टी रामैय्या

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी मंगळवार, 17/04/2012 15:16 या दिवशी प्रकाशित केले.

पंचवीस-सव्वीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे आपल्या जवळच्याच आंध्रप्रदेशातली. तेलंगणातल्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना गणित शिकवत आयुष्य घालवलेला चुक्का रामैय्या नावाचा एक हाडाचा शिक्षक होता. शिक्षकी पेशा एक व्रत म्हणुन स्विकारण्यापुर्वी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेला, गांधींजींच्या सत्याग्रह आंदोलनात तुरूंगवास भोगलेला एक देशभक्त! वारंगळमधल्या आपल्या गुडुर या मुळगावी अस्पृश्यता विरोधी चळवळ चालवून आपल्याच ब्राम्हण समाजातून वाळीत टाकल्या गेलेला एक पुरोगामी विचाराचा माणुस.