Skip to main content

समाज

एक वाचनानुभव

लेखक यकु यांनी रविवार, 13/05/2012 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
दि. 6 मे 2012 काल म्हणजे 5 मे चे सकाळचे काही तास वगळता पूर्ण दिवस झोपण्‍यात गेला. नेहमीची जागरणं. पण रात्री 10 वाजता जाग आली तेव्हा बाहेर पाऊस पडून गेला होता आणि वीज गेली होती. पाणी संपलं होतं म्हणून ते आणायला गेलो. आमच्या कॉलनीतल्या छोट्याशा झोपाळू स्टेशनसमोर पाण्‍याची सोय आहे. अपरात्री दुकाने बंद असताना तिथे कधीही पाणी मिळू शकतं. रेल्वेट्रॅकपलीकडे असलेल्या शेजारच्याच कॉलनीतमात्र वीज होती. त्यामुळं कुंद वातावरणात रस्त्यावरुन जाताना सकाळचे चार साडेचार वाजल्याचा भास होत होता. पाणी आणून थोडे जेवलो आणि नेहमीप्रमाणे मिपावर लॉगीन झालो.

अंगणात बाप, दारात माय,

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 13/05/2012 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
अरे अंगणात बाप अन दारात माय, घरला तुज्या यायला मी खुळा हाय की काय, येड्या, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, घराकडे आलो तर काय काय देशील घराकडे आलो तर काय काय देशील गरम गरम पीठल अन भाकर तू खाशील सोताच्या हातानी भरवणार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, पोटभर खाल्यावर लै झोप येते पोटभर खाल्यावर लै झोप येते दोघांसाठी खोलीत गोधडी घालते खोलीच दार आतुन लावनार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय

सुप्रभात .. शुभ रजनी ...

लेखक विदेश यांनी शनिवार, 12/05/2012 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रभात .. शुभ रजनी ... कशासाठी दोस्त ? अफजलगुरू कसाब मजेत मस्त आपण महागाईने नेहमीच त्रस्त गृहिणी टंचाईत नित्य चिंताग्रस्त सामान्यांची स्वप्ने धुळीत उध्वस्त नेतेमंडळीचे दौरे कायम जबरदस्त जनतेची कमाई दलालाकडून फस्त सभागृह नेहमी गोंधळातच व्यस्त गुड मॉर्निंग... गुड नाईट... कशासाठी दोस्त ? "
काव्यरस

कलाईगनर

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी शुक्रवार, 11/05/2012 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
राजकिय स्थीत्यंतरांचा, किंवा सत्तापालटाचा दांडगा अनुभव असलेलं एकमेव राज्य म्हणजे तामिळनाडू! कधी घवघवीत यशाची शिखरे तर कधी अत्यंत लाजिरवाणे पराभव ही येथील नेत्यांची नियती आहे. दक्षीण किनार्र्यावरच्या या वादळी परिस्थीतीत आपल्या द्रविड मुन्नेत्र कझगम (डिएमके) पक्षाची नाव नेटाने रेटणारे तामीळ राजकारणाचे भिष्म पितामह म्हणजे 'कलाईगनर' मुथुवेल करूणानिधी! डोळ्यावरचा काळा चष्मा, शुभ्र वस्त्रांवर शोभुन दिसणारी पिवळी शाल, आणि कुठल्याही परिस्थीतीत चेहर्र्यावर कायम ठेवलेलं स्मीतहास्य -- एव्हाना ही करूणानिधींची राजकारणातली छवी बनलेली आहे.

पाणी अडवा, पाणी मिळवा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 10/05/2012 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा बराचसा भाग सध्या दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे भरडला जात आहे. पाणीटंचाईचा सामना शहरातील लोकांनाही करावा लागत आहे. पुण्यातही सध्या जवळपास ३० टक्के पाणीकपात सुरु आहे. पाऊस लांबल्यास परिस्थिती अधिकच बिकट होण्याचा संभव आहे. उन्हाळा सुरु झाल्यावर पाणीटंचाईचे प्रश्न नेहमीच उभा राहतो. पण या प्रश्नाची सोडवणुक करण्याचे अगदी सोपे मार्ग आपल्या हाती आहेत. पावसाळ्यात वाहुन वाया जाणार्‍या पाण्याचा योग्य वापर केल्याने या समस्येचे स्वरुप बरेच सुकर होईल असे तज्ञांचे मत आहे.

खान्देशी लग्न पद्धती, चालीरिती, लग्नातील गाणी इ.

लेखक आर्या१२३ यांनी मंगळवार, 08/05/2012 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
खान्देश हा महाराष्ट्राच्या उत्तर सिमेवरचा परगणा. याला एका बाजुला गुजरात राज्याची सीमा तर दुसरीकडे मध्यप्रदेशची सीमा आहे त्यामुळे एकूणच खान्देशी जीवनशैलीवर या तीन्ही राज्यांचा मिश्र प्रभाव दिसतो. खान्देशी भाषा ही मराठी + हिन्दी + गुजराती अशी बनलेली आहे. जवळच सातपुडा डोंगररांगात भिल्ल ही आदिवासी जमात आहे.खान्देशी नृत्यात त्यांचीही थोडी शैली दिसुन येते. तसेच महाराष्ट्र-म.प्र. सीमेवरील बु-हाणपुर हे गाव आधी गुजरातचा राजा अहमद याची राजधानी होते. त्यामुळे थोडा मुसलमानी पगडा दिसतो. तिथली विवाह पद्धती, चाली रिती सर्वांना माहित व्हावी एवढीच अपेक्षा.

मनाची कवाडे बंद करु नका...

लेखक योगप्रभू यांनी मंगळवार, 08/05/2012 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
(पैसा सोडून बोल.. हा धागा नुकताच वाचला. तिथे प्रतिसाद फारच लांबलचक झाला असता म्हणून हा स्वतंत्र धागा) ................................................................................................................................. आयुष्यात पुष्कळदा आपल्याला मनस्ताप देणारे अनुभव येतात. विशेषतः आपण विश्वास टाकून मित्र म्हणवणार्‍यांना रक्कम उसनी देतो, पुस्तके वाचायला देतो, वस्तू वापरायला देतो आणि ते त्याची किंमत ठेवत नाहीत. देणे खुशाल बुडवतात, पुस्तके लंपास करतात, वस्तू मोडतोड करुन परत देतात. आपलेच पैसे आपल्याला वारंवार मागायला लावतात. सबबी सांगतात.

नारायण सान्याल आणि काही प्रश्न...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 08/05/2012 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या माणसाला मदत केली म्हणून डॉ. बिनायक सेन यांना अटक झाली होती त्याला, नारायण सान्याल, यांना आता सर्वोच्च न्यायालयाने जामिन दिला आहे. त्या संबंधीची माहिती आजच्या वृत्तपत्रातून आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा दुवा इथे देत आहे. http://timesofindia.indiatimes.com/india/Supreme-Court-grants-bail-to-N… बातमी नीट वाचली. मात्र हे वाचल्यावर काही प्रश्न मनात आले.