इंटरव्हेन्शन
बरेच लोक दारू पितात. दारू पिण्यात काहीच गैर नाही. मित्रांबरोबर दोनचार पेग घेतले, थोडी दंगामस्ती केली, अधूनमधून जरा जास्त देखील घेतली. आपणही कधी कधी असं करतो. प्रत्येकाचीच एक मर्यादा असते. बहुतांश वेळी बहुतेक लोक त्या रेषेच्या आत रहातात. कधी कधी एखादवेळी ती ओलांडलीही जाते. असं चालतंच. 'काहीतरी यडपटासारखं बरळेल. मग थोड्या वेळाने उलटी काढेल. उद्या दुखेल प्रचंड डोकं. पण नंतर येईल ताळ्यावर.' हे आपल्याला आपल्या अनेक मित्रांविषयी माहीत असतं.
पण एखाद्या कोणाचीतरी कथा थोडी वेगळी व्हायला लागते. मित्रांबरोबरच नव्हे, तर सदासर्वकाळ दारू पिणं सुरू होतं. मैफिलीसाठी दारू न होता दारूसाठी मैफिली होतात.
मिसळपाव
क्रुसेडची पार्श्वभूमी. ६२२-१०९०
इतिहासातील घटना त्यावेळी अचानक उद्भतवल्या असे वाटले तरी आत्ता त्याचा अभ्यास करताना त्या तशा अचानक उद्भवल्या नाहीत हे आपल्याला कळते. ते कळाल्यावर त्या तशा का घडल्या याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते.