Skip to main content

समाज

अमेरिका , महाराष्ट्र आणि परप्रांतीय

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 27/08/2012 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र आणि अमेरिका दोन्ही मध्ये सध्या परप्रांतीय , त्यांचे आक्रमण आणि लोकल माणसाचा रोजगार याविषयी बरीच चर्चा चालू असते. सहज गंमत म्हणून त्यामध्ये काही साम्य आहे ते बघितले तर मला खालील मुद्दे सापडले. मुद्दे गंमत म्हणून आहेत आणि ते खालील छोट्या गृहीतका वरून काढले आहेत .

वासंती भाटकर आणि स्त्री-मुक्ती

लेखक पैसा यांनी शनिवार, 25/08/2012 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. तेव्हा मी प्राथमिक शाळेत जात होते आणि रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका खेड्यात रहात होते. हे इतकं लहान खेडेगाव होतं, की रत्नागिरी फक्त ५ मैलांवर असून तिथे जायला थेट रस्ता नव्हता. मधे साखरतरची खूप मोठी खाडी होती. रत्नागिरीला जायचं तर आधी बैलगाडीने तरीपर्यंत जायचं, मग तरीने खाडी ओलांडायची आणि मग बस मिळायची. गावात दुपारी १२ वाजता वगैरे पेपर यायचा. म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे रेडिओवरची खरखरत्या आवाजातली सुशील दोशीची कॉमेंट्री नाहीतर सिलोन रेडिओवरची बिनाका. त्यासाठी आम्ही बुधवार रात्रीची वाट बघायचो.

(आपले) स्वातंत्र्य, (इतरांचे) चारित्र्य आणि (तथाकथित) संस्कृती

लेखक रमताराम यांनी शनिवार, 25/08/2012 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच फेसबुकवर एका ग्रुपवर नटनट्यांच्या शिर्डीप्रेमाचा विषय निघाला होता. गप्पा तशा खेळीमेळीत चालू असताना अचानक एक नवा सदस्य अवतीर्ण झाला नि त्याने काही स्टेटस् टाकले ते वाचून अख्खा ग्रुप हादरला. एकदोघांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, स्त्री सदस्यांनी त्याच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला. परंतु महाराज अजिबात बधले नाहीत. एकामागून एक अशी तिरस्करणीय विधाने करणे चालू होते. यात त्यावर आक्षेप घेणार्‍या सदस्यांवर वैयक्तिक शेरेबाजीही चालू होती. सारा रोख स्त्रियांच्या - चित्रपटात काम करणार्‍या नट्यांच्या - चारित्राबद्दल होता. त्यांची विधाने आठवली तरी अंगावर शहारे येतात.

जुलूस

लेखक नगरीनिरंजन यांनी गुरुवार, 23/08/2012 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
सहावी संज्ञा, Intuition किंवा आतला आवाज या प्रकाराला काही शास्त्रीय आधार आहे की नाही, कोण जाणे? आजकाल तंत्रज्ञानाने इतकी मोठी झेप घेतलेली आहे आणि ते इतक्या प्रकारे, इतक्या वेळा मनावर आदळले जाते की कधीकधी स्वत:चा आतला आवाज खोटा वाटायला लागतो. इतकी भरभराट होत असतानाही चुकचुकणारी माणसं नैराश्याची बळी वाटायला लागतात, काहीतरी जुन्याच्या आठवणींनी उसासणार्‍यांना सरसकट वायफळ नॉस्टॅल्जियाचे रोगी समजले जाते आणि इतक्या मोठमोठ्या गोष्टी बोलणार्‍यांसमोर साध्या-साध्या शंका विचारण्याची लाज वाटू लागते. मुळात माझ्यासारख्याच अनेक लोकांना स्वतंत्र विचार करण्याचं शिक्षण मिळालेलंच नाहीय.

जय हिन्द (१)

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 21/08/2012 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
१. ऑफिसला सकाळी बाहेर पडताच गेटबाहेर काही लोक वाट पहात उभे असलेले लोक कलेक्टरांना दिसले. हे आता सवयीचेच झाले होते. जेंव्हा जाऊ तेंव्हा हा कलेक्टर आपल्याला भेटतोच असा अनुभव आल्यामुळे वेळी अवेळी केंव्हाही लोक भेटत. त्यावर उपाय म्हणून मग कलेक्टर फक्त आपल्याच ऑफिसमध्ये बसण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग्ज घेत. म्हणजे मीटिंग्जनाही अडथळा नको, आणि लोकांनाही नाराज करायला नको. अ‍ॅडिशनल डीएमना ते सर्व अर्ज निवेदने गोळा करायला सांगत आणि नंतर स्वतः डोळ्यांखालून घालत.

छिद्रान्वेषी वैतागसम्राटाची डायरी ( भाग २)

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 16/08/2012 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
१ जानेवारी : आत्ता रात्रीचे बारा वाजताहेत. सकाळपासून कालच्या पार्टीचा हॅंगओवर. म्हणजे उलट्या, मळमळ तर आहेच त्यात जुलाबही...रजाच पडली. रात्री डॉक्टरकडे जावं लागलं... नवीन कुठलीतरी स्ट्रॉन्ग औषधं दिली.. वर चारचौघांत " पिणं कमी करा" हा सल्ला. आता औषधं घेतल्यावर जुलाब बंद झालेत तर आता अंगावर रॅश आल्यासारखी वाटतेय... आणि लिहिताना खाज येतेय सर्व त्वचेवरती... म्हणजे ऍलर्जी नक्की कोणत्या गोळीची हेही आता कळणार नाही.. *** चा फोनही लागत नाहीये आता.. आता बसा खाजवत.. असा हा वर्षाचा पहिला दिवस... वै ता ग.... ५ जानेवारी : ही स्वप्नं म्हणजे एक त्रास असतो.

सरदार अजितसिंह यांना आदरांजली

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 15/08/2012 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
ajit singh सरदार अजितसिंह यांचा जन्म नवान्शहर तहसिलातील खट्करकलान येथला. जन्मदिवस दिनांक २ फेब्रुवारी १८८१. ज्या कुळात जन्म घेतला ते सिंधु कुल म्हणजे साक्षात क्रांतिचा कल्पवृक्ष. सरदार अजितसिंहांचे वडील सरदार अर्जुनसिंह हे प्रखर राष्ट्रवादी आणि आधुनिक विचारसरणीचे. आपले ईंटर आर्ट्स चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षकाची नोकरी सुरू केली.

बेसुमार -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 14/08/2012 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
. उद्या आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन ! रोज आपण मारे बेंबीच्या देठापासून ओरडत आहोत.. भ्रष्टाचार - - बेसुमार महागाई -- बेसुमार भाववाढ - - बेसुमार वाहने -- बेसुमार लोकसंख्या - - बेसुमार अनाधिकृत बांधकामे -- बेसुमार घुसखोर -- -बेसुमार रोगी, व्यसनी, कुपोषित -- बेसुमार रस्त्यात खड्डे .. ! ! ! आता आपल्या देशाला स्वतंत्र होऊन इतकी वर्षे लोटली .. "बेसुमार" म्हणून ओरडणारे.. मतदानाच्यावेळीच आपला "अबाधित मतदानाचा हक्क" विसरून - घरातच का बरे गप्प बसून रहातात - ? बेसुमारीला बराचसा आळा घालणे, आपल्या बोटाच्या शाईवर अवलंबून आहे - असे मला तरी वाटते . तुम्हाला ? ? ? .

चावडीवरच्या गप्पा - असुरक्षित भारत

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 11/08/2012 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
“आता भारत अजिबात सुरक्षित राहिलेला नाही, पुण्यात बॉम्बस्फोट... चक्क पुण्यात!”, चिंतोपंत, उत्तर भारत सहलीमुळे बर्‍याच दिवसांनी कट्ट्यावर हजेरी लावत. “काय म्हणता!

शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत

लेखक भरत कुलकर्णी यांनी शनिवार, 11/08/2012 05:13 या दिवशी प्रकाशित केले.
शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत
नमस्कार श्रोतेहो. आज आपल्या स्टूडीओमध्ये ग्रामीण भागातले शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी आलेले आहेत. त्यांच्या कादंबर्‍या, लेख, कथा, निबंध प्रसिद्ध आहेतच तसेच कवितांचे पीक ते जोमाने दर हंगामात घेतात. पंचक्रोशीतील इतर शेतकवी त्यांच्या उत्पादनातून नेहमीच प्रेरणा घेत आलेले आहेत. त्यांच्या शेतसाहित्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.