मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र
http://www.misalpav.com/node/28198
http://www.misalpav.com/node/28241
________________________________________________________
नमस्कार मंडळी. काही अपरिहार्य अडचणींमुळे हा पुढचा भाग टाकायला उशीर झाला आहे, त्यासाठी क्षमस्व. याआधीच्या भागात आपण आपल्याला आवडलेल्या कादंबर्यांबद्दल लिहिले होते. या वेळी आपल्या आवडत्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल थोडक्यात लिहूया!
आधीच्या यशस्वी भागांप्रमाणेच तुमच्या उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आहे! चला तर लिहूया आपल्या आवडत्या आत्मचरित्र किंवा चरित्रांबद्दल!
मिसळपाव
“काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.
“काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.
“अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे.
“हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे.
“अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला?