Skip to main content

समाज

पेरू : भाग ११ : लोकजीवन

लेखक समर्पक यांनी सोमवार, 08/09/2014 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
या भागात पेरूच्या समाजाचे जवळून दर्शन. कुठल्याही प्रदेशात नुसतं 'बघायला' न जाता अनुभवायला जायचं असेल तर स्वत:च्या 'फॉरेनर टॅग' चा उपरेपणाचा रंग उतरवून उत्सुक, जिज्ञासू रंगाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आजुबाजूच्या लोकांशी शक्य तितका संवाद साधत आपला अनुभव अधिकाधिक गडद व सखोल करता आला तर अभ्यास व आनंद दोन्ही वृद्धिंगत होतात. प्रत्येक समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण वीण असते, पोत असतो, त्याविषयी जाणण्याचा, ज्या ज्या लोकांना भेटण्याचा योग आला त्यातून या समाजाविषयी जाणण्याचा केलेला हा प्रयत्न, व बरोबरच काही साधी चित्रे.

रस्त्यावर वाहन चालविणारे

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 06/09/2014 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी सुनीलला भेटायला त्याच्या घरी गेलो. बिछान्यावर पडलेला होता. डाव्या पायाच्या मांडीत लोखंडी रॉड टाकलेली होती. त्याला विचारले, कसं झाले हे सर्व. तो म्हणाला, तुझ्या सारख्या नियम पाळणाऱ्या एका मूर्ख माणसामुळे ही पाळी आली. मी म्हणालो, साला स्पष्ट बोल कि काय म्हणायचं आहे ते. उगाच माझ्या डोक्यावर खापर नको फोडू? तुला माहितच आहे, बाईक चालविताना मी ट्रफिकचे कुठलेच नियम-कायदे पाळत नाही. किक मारल्या बरोबर बाईक हवेत उडाली पाहिजे तरच चालविण्यात मजा. त्या रात्री घरी परतताना असेच हवेत उडत जात होतो. एका ट्रफिक सिग्नल वर लाल बत्ती होती. नेहमीप्रमाणे पर्वा केली नाही.

मलई!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 05/09/2014 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
.........................आत्मूज जिल्बी भांडार......................... जिल्बी क्रमांकः- ............. अशीच!* =)) (*-चे.पु.वर आमच्या-पाठी :p दुर्बिण घेऊन फिरणार्‍या एका मित्राच्या ग्रहास्तव,सदर जिल्बी तळायला :D सोडत आहोत!यथायोग्य आस्वाद घ्यावा. आणि आकारापेक्षा चविशी सलगी साधावी...ही विणम्र विणंती! =)) ..) सदर जिल्बीमधे:- व्यवसायात नविन पडलेल्या,किंवा वर्षानुवर्ष नविनच राहिलेल्या एका विक्रेत्याची कैफियत मांडायचा प्रयत्न केला आहे.

फेसबुकची वचवच- आणि वचावचा करणारं फेसबुक!

लेखक अन्नू यांनी शुक्रवार, 05/09/2014 15:52 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या सोशल नेटवर्किंगची क्रेझ चालू आहे मग ती ट्वीटरवरची टीवटीव असो नाहीतर, फेसबुकवरची गपशप असो. सगळीकडेच अगदी या साईट्स हातपाय पसरत असलेल्या दिसत आहेत. त्यात ट्वीटरचा विचार केला तर तिथे जास्तकरुन सेलिब्रिटीजचीच टीवटीव आपल्याला ऐकायला येते. सामान्य माणुस मात्र जास्त टीवटीवत नाही, त्यामुळेच कदाचित तो फेसबुकवर पडीक असतो! फेसबुक. म्हणजेच थोडक्यात आपलं- FB ! –यात एक गोष्ट मात्र मला जास्त इंटरेस्टींग वाटते, ती म्हणजे फोटो अपलोडींग आणि टॅगिंग. इथे प्रत्येकजण आपल्या भावना जास्तकरुन वेगवेगळ्या इमेजेसमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.

परिघ परिक्रमा

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 05/09/2014 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
बीजगणित हा माझा आवडता विषय. मला समीकरणांची उत्तरं शोधायची भारी हौस. पण 'डावीकडची बाजू उजवीकडच्या बाजूशी समान आहे हे सिद्ध करा' हा प्रश्न माझा स्वाभिमान दुखवत आलाय, आणि मला नाउमेद करत आलंय, नेहमीच. एकतर ज्या प्रश्नाचं उत्तर मला आधीपासूनच समोर दिसतंय तेच कसंतरी मटका मारून, नाहीतर पुस्तकात छापलेली पद्धत वापरून आपण आणणं अपेक्षित असतं. त्याचं कसलं कौतुक करायचं? आणि समजा ते उत्तर सिद्ध करता येत नसेल, मग तर माझं टाळकंच हटायचं. येत नाही म्हणजे काय! समोर एवढं ढळढळीतपणे दिसतंय म्हणजे यायलाच हवं. आपल्याला आधीपासूनच ठाऊक असलेल्या ठिकाणीच जर जायचं असेल तर प्रवासाचा उत्साह कसा निर्माण करावा माणसानं?

सत्याचा जय...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 04/09/2014 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपिठिका: नुकतेच मिपावरच्या एका धाग्यावरच्या डॉ सुबोध खरे यांच्या प्रतिसादात खालील वाक्य वाचले... शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच. पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद !

माझ्या घरचा बाप्पा!

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 31/08/2014 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काहीजणांकडे बाप्पांना पुढच्या वर्षी यायचे निमंत्रण देऊन निरोपही दिला आहे. सगळी मंडळी मोदकांवर ताव मारून सुस्त झालेली असणार! गेल्या वर्षी आपण घरोघरच्या गणेशासाठीच्या सजावटी, मखरे यांच्या फोटोंची स्पर्धा आयोजित केली होती आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी मात्र छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त "महास्पर्धा" चालू असल्याने श्रीगणेश सजावटीची स्पर्धा रद्द करत आहोत. मात्र घरबसल्या सर्वांना इतर मिपाकरांच्या घरच्या गणपतीबाप्पाचे दर्शन व्हावे म्हणून हा धागा काढत आहोत.

परदेशातला संस्कृती संगम

लेखक कल्पक यांनी रविवार, 31/08/2014 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या अनेक शतकांपासून माणूस हा शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समृद्धी ह्या कारणांसाठी स्थलांतर करतोय आणि नविन प्रदेशाशी जुळवून घेताना आपले खाद्यपदार्थ, भाषा, संगीत, कला आणि संस्कृती ह्यांचं आवर्जून जतन करतोय. आज तंत्रज्ञानामुळे आणि प्रगतीच्या संधींमुळे देशादेशातील अंतर कमी होऊन अनेक संस्कृती एकमेकांमध्ये मिसळत आहेत. आणि जागतिक खेड्यातील ह्या संस्कृतीसंगमामध्ये प्रगतीसाठी धडपड हा एक समान धागा आहे. अशा संस्कृतीसंगमामध्ये खाद्य पदार्थ, भाषा, संगीत, कला, ज्ञान यांची देवाणघेवाण होते आहे.

गणपती पूजेच्या मागची अवधारणा

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 29/08/2014 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज गणेश चतुर्थी, आज बाप्पा आपल्या घरी येतात. १० दिवस आपण बाप्पाची पूजा अर्चना करतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतो. आपण बाप्पाची पूजा का करतो या मागची अवधारणा काय? हा प्रश्न मनात येतोच.