देणाऱ्याने देत घेणाऱ्याने घेत रहावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे .
देण्याचा आनंद हा घेण्याच्या आनंदापेक्षा खूप मोठा असतो .
२ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर हा आठवडा जगात joy of giving week म्हणून साजरा केला जातो .
भारतात हा आठवडा 'दान उत्सव' या नावाने साजरा केला जातो .
प्रत्येक जण यथाशक्ती सहभाग घेतो ...
देण्याच्या वृत्तीचे अनमोल, दैवी मूल्य आहे. सर्व धर्मग्रंथ ह्या वृत्तीला, कृत्याला अव्वल दर्जा देतात. हा एक मोठ्यातला मोठा संस्कार जोपासला गेला पाहिजे. निसर्गाकडून हीच शिकवण आपल्याला मिळते. ही देण्याची वृत्ती मात्र सहजपणे आढळत नाही. देणं म्हणजे केवळ आर्थिक दान असा गैरसमज नसावा. आर्थिक दानाखेरीजही अनेक गोष्टी आपण देऊ शकतो; वाटू शकतो. वेळ, ज्ञान, शारीरिक कष्ट, सकारात्मक, भावना, प्रेम अशा अनेक मार्गांनी हे आपल्याला साधता येतं.
आपणही आपल्या पातळीवर हा उत्सव साजरा करू शकतो ,
एखाद्या अनाथाश्रमाला आर्थिक मदत करू शकतो ,आपल्या घरात काम करणाऱ्या मोलकरणी ,ड्रायव्हर यांच्या मुलांसाठी काही करू शकतो ,
आपल्या बिझी शेड्युल मधून थोडासा वेळ काढून तो आपल्या आई वडिलांसाठी देऊ शकतो
ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे
आभाळा एवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे.
- दत्ता हलसगिकर
ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे
आभाळा एवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे.
- दत्ता हलसगिकर
वाचने
4137
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
माणूस देणं विसरलाय....
अरेरे
अगदी बरोबर
In reply to अरेरे by सर्वसाक्षी
मत दान
आयला..