डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण.१
२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे.
मिसळपाव
काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पॉर्नवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. ही बंदी लागू होण्याआधीच, निर्णय घेतल्यावर काही दिवसांत तो मागेही घेतला. त्या निमित्ताने पॉर्न म्हणजे नक्की काय, ते कशासाठी, ते चांगलं आहे का वाईट, याबद्दल सोशल मिडियामध्ये चर्चा झालेली दिसली. अनेक मुद्द्यांप्रमाणे या प्रश्नाबद्दलही काळं किंवा पांढरं अशीच भूमिका घेतलेली दिसली. पॉर्न विरोधकांची भूमिका साधारणतः पॉर्नमुळे वेगवेगळ्या प्रकारची आणि प्रचंड हानी होते अशी भूमिका.
उन्हाळा मी म्हणतो आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडल्यावर तहान लागणे अपरिहार्य! मग थंड पाण्याची बाटली, शीतपेय, एनर्जी ड्रिंक यासारखे पेय घेणे विकत घेणे ओघानेच आले. पण यातील किती ग्राहक बाटलीवर छापलेली किंमत पाहून त्यानुसार पैसे देतात? बहुसंख्य ग्राहक विक्रेता मागेल ती किंमत देऊन मोकळे होतात.