समाज
एक संघ मैदानातला - भाग १३
आम्ही सगळ्याजणी दादा कधी परत येतायत आणि काय सांगतायत ह्याची वाट बघत होतो. आमचं आवरून झालं होत.मेस मध्ये जाऊन जेवण आणि मग रूमवर धतिंग हा अघोषित कार्यक्रम होता. ह्यावेळी 'चद्दर प्रोग्राम'चा बकरा कोण ह्याचा मी आणि योग्या विचार करत होतो. आमच्या डोळ्यांनी चाललेल्या खाणाखुणा दीदीने पहिल्या आणि डोळे वटारले. आम्हीही निर्लज्जासारखं स्माईल दिलं आणि बकरा शोध मोहिमेवर लक्ष केंद्रित केलं. तेवढ्यात डुलत-डुलत दादा आले. "दादा... कशाला आले होते ते ? काय म्हणाले ?" आम्ही दादांवर आँलमोस्ट झडप घातली.
" अरे.. काय आहे हे.. थांबा जरा..
गाढवा समोर वाचली गीता - गोंधळ घालणारा गाढव ?
गाढवा समोर वाचली गीता,
कालचा गोंधळ बरा होता.
हि मऱ्हाटी म्हण कित्येक वेळा वाचली किंवा ऐकली असेल. नेहमीच मनात एक प्रश्न उभा राहतो, गाढवाला मिठाच्या आणि कापूसाच्या गोणीतला फरक कळला नाही. कापूस घेऊन पाण्यात उतरल्या मुळे त्याची कंबर मोडली. गाढवाला अतोनात कष्ट सहन करावे लागले. जर गाढवाला मीठ आणि कापूस यातला फरक माहित असता तर तो कापूसाची गोणी घेऊन नदीत उतरला नसता. गाढव अडाणी होता, पण अडाणी माणसाला गीता किंवा उपदेशातले काही समजले नाही तरीही तो गोंधळ निश्चित घालणार नाही.
मी एकटा आहेच कुठे?, , , , , "खरे सुपरमॅन - आमचे आप्पा" या लेखात नमूद केलेला लेख.
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात मी आप्पांच्या या लेखाचा उल्लेख केला होता आणि तुम्ही मंडळींनी तो लेख इथे टाकावा अशी इच्छा व्यक्त केली होती. तो हा लेखः
माझी पत्नी प्रतिभा सुमारे अडीच वर्षांपूर्वी निधन पावली. त्या वेळेपसून मी एकट्याचे जीवन जगत आहे. सुरवातीला हा एकटेपणा खूप त्रासदायक वाटत असे. विशेषतः ‘या परिस्थितीत आता फरक पडणार नाही’ या जाणीवेने अतिशय त्रास होई. पण मी सतत विचार करीत राहिलो. आता या परिस्थितीत जर फरक पडणार नाही तर त्या परिस्थितीशी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जुळवून घेणं हे श्रेयस्कर नाही का? विचार पटला तरी हे करणं सोपं नसतं आणि सोपं नव्हतंच!
अनेक वेळा खूप वैताग येई.
सापडला पठ्ठ्या एकदाचा!!
एक संघ मैदानातला - भाग १२
केक खाताना दादाचं सेंटी होण उगाच मनात घर करून बसलं होत. बाप आपल्या मुलीचा किती विचार करत असतो ते जाणवलं.
थोड्यावेळाने मँच होती त्या दृष्टीने मानसिक तयारी करण गरजेचं होत पण काही केल्या पुढचा गियर पडत नव्हता. मँचसाठी लागणारा अर्लटनेस, अँग्रेशन मला माझ्यात कुठेच दिसत नव्हत. ह्या टुर्नामेण्टला मी कॅप्टन होते. त्यामुळे माझा मेंदू घोडयापुढे धावण अपेक्षित होत पण इथे तर मन आणि मेंदू कम्फर्ट झोन मधून बाहेर निघत नव्हते. "देवा… आता काय करू? " मी बाथरूमला जाऊन आले. उगाच तोंडावर भरपूर पाणी मारलं. ग्राउंडमध्ये जाऊन अंदाज घेतला तर तिसरी मँच आत्ता सुरु झाली होती.
खरे सुपरमॅन - आमचे आप्पा
नुकतंच माझ्या सासर्यांनी (श्री. गजाननराव गोडबोले - आमचे आप्पा) पंचाण्णव्या वर्षात पदार्पण केलं. असं म्हणतात की आपल्याच माणसाचं चारचौघांसमोर कौतुक करू नये. पण त्यांच्यामध्ये इतकी सकारात्मकता आहे की ज्येष्ठच काय, तरुणांनीदेखील कित्ता गिरवावा अशी त्यांची विचारशैली. त्याबद्दल न लिहिणं हाच गुन्हा होईल.
त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या तारखा आणि तत्सम इतर पायर्या मी गाळूनच टाकते. मात्र ते आम्हाला सुपरमॅन का वाटतात तेच फक्त लिहिते.
ते एकटे स्वतंत्रपणे राहातात. पण डबा मागवणे वगैरे शॉर्टकट अजिबात नाही. स्वयंपाक करायला आणि झाडलोटीला बाई आहे.
एक संघ मैदानातला - भाग ११
सकाळी ११ वाजून गेले तरी आम्हाला कोणालाही जाग आली नव्हती. ११.३० च्या सुमाराला आधी दार वाजल्यासारखे वाटले मग थोड्यावेळातच दादांचा आवाज आला.
"ऐ जागू...दार उघड ना… ते बघ बाहेर बोंबलतायत…" रूपाने जागूला ढोसलं आणि स्वत: कूस बदलून झोपून गेली.
" च्यायला… काय कटकट आहे... ह्यांना आत्ता काय इथे काय करायचं आहे..." बडबड करत जागुने दार उघडले.
" काय झालं दादा... ? "
"अरे मला आत तर येऊ दे...आणि तुम्ही अजून झोपा कसल्या काढताय? चला बाहेर..." बँग घेऊन दादा खोलीत घुसलेच.
" दादा... प्लीज अजून थोडा वेळ झोपू दे हो.. काल अजिबात झोप नाही मिळाली... प्लीज..
मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०७
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964
मी बाई होते म्हणुनी ..
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण..२
ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही.
टीपः वरील भाषण संपादित स्वरुपात आहे.
(स्रोत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६)
मिसळपाव