अमरबाबा
गावात पोहोचताच बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याजवळच्या मोकळ्या जागेत त्याने गाडी उभी केली. हौद्यातून गुंडाळलेले पोस्टर काढून बाहेर टांगले.
'हिमालयकी अद्भुत चमत्कारी जडीबूटीयो का चमत्कार' अशी अक्षरे असलेल्या त्या फलकावर बर्फाचा डोंगर व त्यात मधूनमधून उगवलेल्या काचेच्या, जडीबुटी भरलेल्या बरण्या असे विचित्र चित्र होते.
काही वेळातच मेगाफोनवर एक टेप लागली.
अमरत्व बहाल करणारी जडीबुटीवाला बाबा गावात आलाय, ही वार्ता लगेचच वाऱ्यासारखी फैलावत सुटली.
बघता बघता गाडीभोवती गर्दी जमली.
बाबानं आपल्या सहकाऱ्याला खूण केली, आणि बाबाचं भाषण सुरू झालं.
मिसळपाव
फोटोत असलेला हा 5 वर्षाचा छोकरा, ओमरान दानीश बुधवारी सिरीयन आर्मी किंवा रशियन एयरफोर्स ने अलेप्पो शहरात एका इमारती वर केलेल्या हवाई हल्ल्यात हा सापडला होता. याला जेव्हा ऍम्ब्युलन्स मध्ये आणण्यात आलं तेव्हा याच्या चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता आणि अंग धुळीने भरलेले होते.