सन १९१६ ते सन २०१६
(या धाग्यामध्ये केवळ माझ्या मनातले विचार मांडले आहेत. प्रत्येकाचं मत वेगळ असू शकत.)
सन १९१६
"केवळ एकुलती एक लेक आणि तिची इच्छा म्हणून तिला वाड्याबाहेर पडायची आणि घोडा चालवायला शिकायची परवानगी दिली होती आम्ही. पण हे ध्यानात ठेवा की जर तिने शिंद्यांच्या घराण्याची आब्रू वेशीवर टांगायचे ठरवले असेल तर तिच शिर धडावेगळ करून त्याच वेशीवर टांगताना आम्ही एका क्षणाचाही विचार करणार नाही. समजावा आपल्या लेकीला." आप्पासाहेब शिंद्यांनी आपल्या पत्नीला मोठ्या आवाजात समाज दिली.
मिसळपाव