२. समाजाभिमुखता (सामाजिक उद्दिष्ट )
माणूस हा समुहात रमणारा प्राणी असल्यामुळे लहानपणापासून त्याचे सामाजिक शिक्षण सुरु झालेलेच असते. सामाजिक शिक्षण घेण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे समाजात मिसळणे, अधिकाधिक लोकांच्या संपर्कात येणे आणि लहान वयात हे शाळेत सगळ्यात उत्तम तऱ्हेने होते. शाळेतल्या वर्गात काय शिकवतात! हा वादाचा मुद्दा असू शकतो पण तिथे ४०-५० मुलांमध्ये, सदासर्वकाळ आपल्या पाठीशी असणाऱ्या आई वडिलांच्या छत्रछायेशिवाय स्वतःच्या हिम्मतीवर एखादे मूल इतर मुलांशी कसे वागायचे, बोलायचे हे स्वत: ठरवते, शिकते..