Skip to main content

शिक्षण

उत्कल दिवस २०१२

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 29/04/2012 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
आय आय टी खडगपूरमध्ये मला देशाच्या विविध भागातील लोकांचा सहवास मिळाला. त्यांच्या चालीरिती, सण वगैरे जवळून बघायला मिळाले. अर्थात अन्य प्रांतात स्थायिक झालेल्या कुणालाही मिळू शकते. गेल्या महिन्यात मला अजुन एक असाच कार्यक्रम बघायला मिळाला, तो म्हणजे उत्कल दिबस (हो, पूर्व भारतात (बंगाल, ओडिशा, बिहार इ.) व चा उच्चार ब/भ असाच केला जातो) एका रुढार्थाने मागास राज्याचा स्थापना दिवस म्हणजे नक्की असणार तरी काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे; पण या कार्यक्रमाचा आयोजक माझा मित्रच असल्याने थोडेफ़ारतरी भव्य-दिव्य असणार याची कल्पना आधीच मिळाली होती.

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 22/04/2012 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही.

दोन दुर्मिळ पुस्तके परत.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 19/04/2012 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, ज्यांना या विषयात रस आहे त्यांनी ही पुस्तके जरूर घ्यावीत. (मी नाव नोंदवणार आहे.) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी स्थापन केलेले भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे आपली १०१ वर्षांची वाटचाल पूर्ण केली. या कालावधीत मंडळाने अनेक् मान्यवरांची अनेक विषयांवरील पुस्तके, विविध शोधनिबंध त्रैमासिकांतून् इतिहास अभ्यासकांसाठी प्रकाशित केलेले आहेत. डॉ.ग.ह.खरे हे प्रदीर्घ् कालावधीसाठी मंडळात कार्यरत होते. त्यांचा बहुविध अभ्यास सर्वांच्याच परिचयाचा आहे. नाणी, ताम्रपट्, शिलालेख तसेच फर्माने व कागदपत्रे इ.चे वाचन डॉ.खरे कित्येक वर्षे करीत होते.

डुप्लिकेट आयडी : एक मार्गदर्शन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 19/04/2012 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
ढिस्क्लेमर :- १) हा धागा निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने काढला असून, कोणत्याही गैरकृत्याला उत्तेजन देण्याचा हेतू नाही. २) धाग्यातील युक्त्या वापरून देखील आपण तोंडावरती पडल्यास लेखक जबाबदार नाही. मित्र हो, काल आमचे मित्र श्री. मृत्युंजय ह्यांची एक प्रतिक्रिया वाचून आम्हाला फारच दु:ख झाले. येवढी वर्षे आंतरजालावरती काढून देखील अजून बर्‍याच सदस्यांना डुप्लिकेट आयडी बद्दलचा अभ्यास कमी पडतो आहे हे पाहून आता ह्यावरती मार्गदर्शन केलेच पाहिजे हे आम्ही जाणले.

पारंपारीक ज्ञानाचे जालीय ग्रंथालय

लेखक विकास यांनी गुरुवार, 19/04/2012 06:21 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपिठीका: "पौराणिक विमाने" या चर्चेच्या निमित्ताने येथे माशेलकरांच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला होता. त्यातील माझ्या लेखी महत्वाचा आणि व्यावहारीक भाग पेटंट्सच्या संद्रर्भात होता. त्याला मी जरी हा प्रतिसाद दिला होता, त्यातील माशेलकरांसंदर्भातील भागः
विकीवरील माहितीप्रमाणे, ‘Managing Intellectual Property’ च्या २००३ - २००५ च्या जागतीक सर्वेक्षणानुसार माशेलकर हे पेटंटक्षेत्रातील जगातील पन्नास दिग्गजांपैकी एक आहेत.

आय आय टी रामैय्या

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी मंगळवार, 17/04/2012 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
पंचवीस-सव्वीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे आपल्या जवळच्याच आंध्रप्रदेशातली. तेलंगणातल्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना गणित शिकवत आयुष्य घालवलेला चुक्का रामैय्या नावाचा एक हाडाचा शिक्षक होता. शिक्षकी पेशा एक व्रत म्हणुन स्विकारण्यापुर्वी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेला, गांधींजींच्या सत्याग्रह आंदोलनात तुरूंगवास भोगलेला एक देशभक्त! वारंगळमधल्या आपल्या गुडुर या मुळगावी अस्पृश्यता विरोधी चळवळ चालवून आपल्याच ब्राम्हण समाजातून वाळीत टाकल्या गेलेला एक पुरोगामी विचाराचा माणुस.

सॅम पित्रोडा नवे राष्ट्रपती?

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 08/04/2012 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
फोन ही हल्ली अन्न, वस्त्र, निवारा आणि विज यानंतरची पाचवी मुलभुत गरज बनली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुरध्वनी जर कुठे उपलब्ध असेल, तर तो भारतात असं म्हणतात. अवघ्या काही वर्षांपुर्वी मात्र हे असं मुळीच नव्हतं. आपल्यापैकी अनेकांना ट्रंक कॉल लावून तासनतास वाट बघत बसण्याचे दिवस चांगलेच आठवत असतील. ट्रींग ट्रींग करणारा काळा फोनही अनेकांच्या अगदी स्पष्ट स्मरणात असेल. तारेपासुन ते ब्रॉडबॅण्डपर्यंत दुरसंचार क्षेत्रात अगदी तासातासागणीक होणा-या या प्रगतीला सत्यनारायण गंगाराम पांचाल नावाचा एक माणुस जबाबदार आहे, असं सांगीतलं तर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही.