पांडुरंग पांडुरंग

कौस्तुभ आपटे जे न देखे रवी...
पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे कधीचे प्राण माझे नयनी उभे रे ॥धृ॥ नाण्यावरी ठसा जसा, दिवा मंदिरात तसा तूच सामावला माझ्या अंतरात वितळू दे काया, तुझ्या मुर्तीत घे रे ॥१॥ पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे... जन म्हणे विठोबाच्या नादी खुळावला दृष्टाळला जन्म सारा, संसार नासला उत्तराया तुच नाथा, प्रकटोनी ये रे ॥३॥ पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे... तुझ्या कल्पनेने जीव उताविळ होतो दश इंद्रियांनी देह मोहरून गातो "पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग" विनवितो तुला तुझ्या चाकरीत घे रे॥२॥ पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे... भक्तिगीत --कौस्तुभ http://www.facebook.com/AseSphuraveGeet
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

10 टिप्पण्या 2,027 दृश्ये

Comments

श्री गावसेना प्रमुख नवीन

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मा साहेब कवीता नाही ती भक्तीगीत आहे, एव्हढे घाइ करुनशान कुठ निघाले व्हय.

हारुन शेख नवीन

भक्तीगीत छान लिहिलंय. वृत्तात बसते कि नाही काय माहित पण ' पांडुरंग ' मधल्या 'ग' ला काना देऊन 'गा' केले की तो अजून जवळ आल्यासारखे वाटते. बाकी तो विठोबा आपणावर लवकर प्रसन्न होऊन आपल्यास दर्शन देवो ही प्रार्थना.

कौस्तुभ आपटे नवीन

धन्यवाद! पांडुरंग च्या ग वर जर जोर दिला तर ते व्यवस्थीत वाटत. अभिप्राया वद्द्ल मनापासून धन्यवाद!