चावडीवरच्या गप्पा – रेडी रेकनर
“नवीन झोपडपट्ट्यांची आणि पर्यायाने व्होटबॅंकेची तजवीज आता सरकारने केली आहे. तेव्हा ह्या नवीन वर्षात झोपडपट्ट्यांचे स्वागत करायला तयार राहा.”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.
“नाहीतर काय? औरंगजेबाचा जिझिया कर काय वेगळा होता ह्याच्याहून?”, घारुअण्णा चिंतोपंतांची बाजू उचलून धरत.
“अहो, पंत आणि अण्णा नेमके काय झाले ते तरी सांगाल का?”, इति नारुतात्या.
“अहो नारुतात्या, वर्तमानात राहतं चला की जरा!”, घारुअण्णा चिडून.
“अहो, सरकारने घर खरेदी करताना द्यावयाच्या मुद्रांक शुल्कासाठी ग्राह्य धरल्या जाणार्या रेडी रेकनर दरात ५ ते ३० टक्क्यांनी वाढ करून टाकली आहे ह्या नवीन वर्षात. नववर्षाची सप्रेम भेट!”, चिंतोपंत तणतणत.
“काय असते हे रेडी रेकनर?”, नारुतात्या बुचकळ्यात पडत.
“नारुतात्या, एखाद्या प्रॉपर्टीची स्टॅम्प ड्यूटी ठरविण्यासाठी शासनाने ठरविलेला दर म्हणजे रेडी रेकनर.”, इति भुजबळकाका.
“अजून जरा इस्कटून सांगा ना, नेमके काय ते कळले नाही.”, नारुतात्या एकदम बावचळून.
“अहो, एखाद्या ठिकाणचा म्हणजे एखाद्या एरियाचा, त्या एरियातल्या प्लॉटच्या सर्वे नंबरप्रमाणे, तेथील सदनिकांचा दर शासन ठरवते, म्हणजे सरकारी दर. त्या दराप्रमाणे प्रॉपर्टीच्या स्टॅम्प ड्यूटीची किंमत ठरते. हा दर बाजारभावापेक्षा वेगळा असू शकतो.”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.
“म्हणजे, जर समजा एखाद्याकडे खूप काळा पैसा आहे आणि त्याने तो प्रॉपर्टीमध्ये गुंतवायचा ठरवला आणि स्टॅम्प ड्यूटी कमी करण्यासाठी सदनिकेचा दर अत्यल्प दाखवून रजिस्ट्रेशन करायचे ठरवले तर स्टॅम्प ड्यूटीची किंमत कमी होऊन सरकारचा महसूल बुडेल ना? तसे सुरुवातीला हे खूप मोठ्या प्रमाणात होत होते. त्यामुळे सरकार ते तसे होऊ नते म्हणून, त्यावर ‘शासन’ म्हणून, एखाद्या ठिकाणचा म्हणजे एखाद्या एरियाचा सरकारी दर ठरवते. त्याप्रमाणे त्या सरकारी दरानुसार स्टॅम्प ड्यूटीची किंमत ठरते.”, भुजबळकाका.
“च्यायला असे आहे होय, किचकटच मामला आहे हा!”, नारुतात्या अचंबित होऊन.
“नारुतात्या, काही किचकट नाहीयेय, समजून घेतले की सगळे कळते. उगाच ह्याचा बाऊ आपण करतो आणि सरकार व बिल्डरांनाही तेच हवे असते.”, इति बारामतीकर.
“पण काय हो बारामतीकर, हे बिल्डर तर तुमच्याच साहेबांचे कच्चे बच्चे आणि फायनांन्सर ना?”, घारुअण्णा उपहासाने.
“घारुअण्णा, उगाच पराचा कावळा करू नका! विषयाला धरून बोला,” इति भुजबळकाका.
“अगदी बरोबर बोललात भुजबळकाका! ५ ते ३० टक्के झालेली ही वाढ ‘कार्पेट’ आणि ‘बिल्ट-अप’ एरिया ह्याच्यात असलेल्या, किंबहुना जाणून बुजून करून ठेवलेल्या घोळामुळे, प्रत्यक्षात ५० टक्के असेल असे ह्या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.”, बारामतीकर शांतपणे.
“बांधकामाच्या वस्तूंचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत, माझ्या मते तर ते जाणून बुजून भिडवले असावेत, त्याने घराच्या किमती आधीच वाढलेल्या, त्यात पुन्हा हा नवा बोजा, मध्यमवर्गाने घरं घ्यायची कशी? ”, चिंतोपंत.
“सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने तो महसूल ह्या मुद्रांकाच्या मार्गाने तिजोरीत भरण्याचा मार्ग शासनाने अवलंबला आहे.”, इति भुजबळकाका.
“तेच तर, माझा मुख्य मुद्दा आणि आक्षेप हाच आहे, तो म्हणजे, हा जो काही जादा महसूल गोळा होणार आहे त्याच्या विनियोगा मध्ये काही पारदर्शकता असणार आहे का? दरवेळी असा जनतेच्या खिशातून ओरबाडलेला हा पैसा, जनकल्याणासाठी वापरला जातो का?”, घारूअण्णा परत रागाने लालेलाल होत.
“च्यायला ही तर मोगलाई झाली, म्हणजे आमच्या खिशातून लागेल तसा पैसा काढायचा आणि त्याला हव्या त्या मार्गाने आपल्याच खिशात किंवा घशात टाकायचा ही राजकारण्यांची ‘शासन’पद्धत अफलातूनच आहे!”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.
“अहो, ते मोगल परकीय तरी होते, ते मुळात बाहेरुन आलेच होते लुटालूट करायला. हे तर हरामखोर सगळे आपलेच भारतीय बांधव ना? ”, घारुअण्णा रागाने तांबडेलाल होत.
“त्यात पुन्हा बिल्डर लॉबी आहेच वेगवेगळ्या पद्धतीने पैसे उकळायला, फ्लोअर इंडेक्स, सुपर बिल्ट अप, वॅट अन् काय काय.”, भुजबळकाका खिन्नतेने.
“अहो त्याच्या जोडीला मेंटेनन्स ही भली मोठी कटकट आहेच. माझ्या एका मुंबैच्या नातेवाइकाच्या मुलाने त्याचा मुंबईतला फ्लॅट विकून टाकला मेंटेनन्स परवडत नव्हता म्हणून. EMI च्या ¼ होत होता म्हणे त्याचा मेंटेनन्स. पुण्यातही हे फॅड बोकाळायला वेळ लागणार नाही.”, घारुअण्णा घुश्शात.
“अहो, मग सर्वसामान्य माणसाने घराचे स्वप्न बघायचेच नाही की काय?”, नारुतात्या हताश होत.
“ऑ! अहो, मग मी काय म्हणत होतो आल्या आल्या?”, चिंतोपंत डोक्यावर हात मारत.
“सोकाजीनाना, म्हणजे आता पुण्यातही एक ‘धारावी’ येऊ घातलीय तर!”, नारुतात्या सोकाजीनानांकडे बघत.
“ही राजकारणी आणि बिल्डरांची अभद्र युती अशीच राहिली तर तसे होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.” इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.
“आधी, काळ्या पैशाचा ओघ थांबवण्यासाठी आणि मुद्रांक शुल्क वसुलीसाठी सुरू केलेला हा 'रेडी रेकनर', पैसा छापण्याची टाकसाळ आहे हे लक्षात यायला राजकारण्यांना जराही वेळ लागला नाही. ज्या पद्धतीने सगळीकडे हे बिल्डिंगांचे पेव फुटले आहे त्यानुसार रोजची रजिस्ट्रेशनांची संख्या बघितली तरी त्यातून मिळणारा महसूल कोणाचेही डोळे फिरवेल. शिवाय रजिस्ट्रेशनच्या वेळी घेतली जाणार्या ‘फी’च्या काळ्या पैशाचा आकडा काढला तर सर्वसामान्य माणसाचे डोळेच पांढरे होतील. त्यातून कोणत्या आधारावर, सर्व्हेवर, ही दरवाढ केली गेली ह्याचाही काही पत्ता नाही. आंधळी-मुकी जनता तिला कसेही हाका! हाच मंत्र झाला आहे आजच्या राजकारणाचा. आणि वर्षाला जवळजवळ २० हजार कोटी इतका महसूल जो गोळा होतो त्याचे नेमके काय होते हे गुलदस्त्यातच राहते. त्यामुळे हालवले की पैसा देणार्या ह्या ‘मागच्या दारातल्या’ पैशाच्या झाडाला काही सरकार पानगळ येऊ देणार नाही. त्याला खतपाणी घालून हिरवेगार ठेवण्याचाच हा एक प्रकार आहे, झालं.”, सोकाजीनाना उद्विग्नपणे.
“सोडा हो, आता आपल्याला घरं घ्यायची नाहीत, ह्याच्यातच मनाचे समाधान मानून घ्या आणि चहा मागवा!”, सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.
सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.In reply to लेख एकांगी वाटला.. by उपास
काळ्याबाजाराला चाप बसवण्याचा प्रयत्न म्हणून रेडी रेकनर वाढवलायकसा ते सांगाल का ?
- (चाप नसलेला) सोकाजीIn reply to लेख एकांगी वाटला.. by उपास
In reply to लेख एकांगी वाटला.. by उपास
In reply to छ्या, कायतरीच काय!! by पिवळा डांबिस
In reply to छ्या, कायतरीच काय!! by पिवळा डांबिस
गरिबाकही धुळीतून चालूंक लागणा नायहा गरिब नेमका कुठे राहतो सांगता का? मीही तिथेच जाऊन राहवे म्हणतो. २-४ लाख देतेवेळी कुचकुच करायचीच नाहीयेय आम्हाला. २-४ काय ५-१० देऊ पण अन्न,वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजांसाठी तरी यातायात करायाला सरकारने लावू नये एवढीच रास्त अपेक्षरास्त, नाय तिकडची रडारड अजिबातच नाहीयेय. - (ढिसमिस) सोकाजी
In reply to ह्म्म्म by सोत्रि
In reply to ह्म्म्म by सोत्रि
चावडीवर असलेल्या कोणाचीही ७०-८० लाखाचे फिलॅट घ्यायची ऐपत नाहीयेय.ह्यां तुमचां तुमीच ठरवल्यांत. माकां तर चावडीवरचे सगळे म्हातारे पोचलेले छुपे श्रीमंत वाटतंत. सगळ्यांची झील्/चेडवां कुठे ना कुठे इंग्लंडातून नाय तर ऑस्ट्रेलियातून (नाय त्या शिंदळीच्या अमेरिकेचां नांव नाय घेणसंय मी!) पैशे धाडत असतंले. जर्मनीची ती मरकेलबाय तर पैशे वाटूकच बसलेली आंसा असो आमचो थंयसर असलेलो रामा मित्र सांगी होतो. रोजची फुकट चहाटळकी करांन वर शेवटी चाय पितंत ता काय उगीच? :)
घरांच्या किमतीवर नियंत्रण (मध्यमवर्गीयांसाठी) ठेवणे तर राहिले लांबच,तां सरकारचा काम नाय. वस्तूची किंमत ही तेंका असलेल्या मागणीवर अवलंबून आसंता. जर 'मी डोईजड कर्ज घेऊन फिलॅट घेंवचंय नाय' आसां प्रत्येकान ठरवलां तर घरांच्यो किंमती कोसळतले का नाय? एकीकडे जितक्या जास्त कर्ज मिळांत तितक्या घेऊन शक्य तितको मोठ्ठो फिलॅट घेतंत आणि मग जरा काय असो आकस्मिक खर्च आयलों की बोंबा मारूक तयार!! जितक्या किंमतीचां घर असांत तेच्या १/६ रक्कम आकस्मिक खर्चासाठी किती लोकां शिल्लक ठेवतंत? आपल्या इथेच नाय पण तिथे (त्या शिंदळीच्या) अमेरिकेत पण काही लोकांनी असो अविचार केलो आणि आतां भोगतसंत त्याची फळां असो आमचो तिकडचो नंदूरामा सांगी होतो!!!
आता सरकारी तिजोरीत खडखडाट का? हे विचारणे चूक आहे का?सरकारची तिजोरी गेल्या साठ वर्षांत कधी भरान वहात होती? इतके थोरले थेरडे झाले तुमचे चावडीकर आणि या प्रश्नाचां उत्तर अजून म्हायती नाय? हे काय लहानपणपासून काय हिमालयातले बालयोगी म्हणान वाढले काय!! छ्या, हयापेक्षा आमी अशिक्षित रामागडी बरे!!!! प्रत्येक सज्ञान माणसांक ह्येचां उत्तर माहिती आसतां...
एक्स्प्रेसवे पासून आमच्या घरापर्यंत जो रस्तो येतो सरकारनेच बांधला आहे. पण त्या रस्त्यांवर गाडीचे टायर सुरक्षित नाहीयेत. गाडीचे सस्पेंशनही सुरक्षित नाहीयेय.हळूहळू (तुमच्या नातवापर्यंत!!) होतलो चांगलो. आता आमी जुनी मान्सां त्या ओल्ड मुंबय-पुणे रस्त्यावर हाडां मोडून घेतंच होतंव तेंव्हा कुठे आता तुमकां गुळगुळीत आणि झुळझुळीत एक्स्प्रेस् वे मिळालो ना, मारूती आणि सुम्मो उडवूंक? घाय कित्यां? तरी बरां तुमकां त्या प्रिमियर पद्मिनी टॅक्शीतून (किंवा त्यापेक्षा जुन्या खिळखिळ्या येष्टीन) जुन्या रस्त्यान खंडाळ्याचो घाट चढूक लागणां नाय!!! उगीच किरकिर करू नकांत!!!
तो रस्ता कुठेही सलग ५०० मि. पर्यंत सपाट आणि हादरे न ब्सवणारा नाहीयेय.आता 'दगडांच्या देशा, खडकांच्या देशा' अशा महाराष्ट्रात रवंल्यानंतर सपाटी खंयसून गावतली? छत्रपतींचे मावळे असांन चढ-उताराक घाबरतांस? मगे तुमी यूपी-बिहारात जावंन रवलेला बरां, सगळी सपाटीच सपाटी!!!!
बाइकने प्रवास करणार्या मध्यमवर्गीयांना याच रस्त्यामुळे पाठीचे आणि मानेचे विकार जडत आहे.आमच्या पुण्यनगरीत बाईकवाले फुटपाथवरून चालणार्या बिचार्या पादचार्यांवर चढतंत. तेंव्हा तेंका असां जर काई झालां तर चालणार्या गरिबांक काय्येक वाईट वाटूचां नाय!!!
हा गरिब नेमका कुठे राहतो सांगता का? मीही तिथेच जाऊन राहवे म्हणतो.आजूबाजूंक बघितल्यात तर नक्की सापडतलो. ह्या जगात कुणाहीपेक्षा जास्त गरीब आणि कुणाहीपेक्षा (बिल गेटस सोडांन) जास्त श्रीमंत माणूस नक्की सापडतां. तेच्यासाठी आणखी दुसरां खंय जावंन रवाक नको!!
अन्न,वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजांसाठी तरी यातायात करायाला सरकारने लावू नये एवढीच...अपेक्षाजीव एकदा जन्माक आयलों की तेकां मरेपर्यंत यातायातच करूचीच लागतां. ह्या विश्व साध्या गांडूळाकही अन्न आणि निवार्यासाठी (तेका वस्त्राचो फारसो प्रॉब्लेम नाय, लकी असां मेलो!!) वळवळ केल्याशिवाय जगू देणां नाय. आता आमी तुमचे रामा म्हणान काम करतोंव, तुम्ही कोणां लोकांचे कॉम्यूटर मोडतांस, पण वळवळ ही आसांच नशिबाक!!! असो. दमलंय मी ह्यां रवळनाथाचां गार्हाणां घालून! आता चाय तरी पाजा कपभर!!!!! :)
In reply to आता मी पडलंय रामा गडी, by पिवळा डांबिस
तां सरकारचा काम नाय.च्यामारी, ह्या सरकारचे नेमके काम ते काय हाच प्रश्न आता पडून राहिला आहे ;) -(झंटलमन) सोकाजी
In reply to आता मी पडलंय रामा गडी, by पिवळा डांबिस
In reply to आता मी पडलंय रामा गडी, by पिवळा डांबिस
In reply to मुद्देसूद by उपास
In reply to मुद्देसुद? by सोत्रि
In reply to आता मी पडलंय रामा गडी, by पिवळा डांबिस
In reply to ह्म्म्म by सोत्रि
In reply to काय बोलणार by स्पा
In reply to काय बोलणार by स्पा
In reply to जेव्हा ३० / ३५ हजार कोटि. ( by अभिजित - १
In reply to विपर्यास by उपास
In reply to काय विपर्यास दिसतो ? जर by अभिजित - १
In reply to Addn to above – I have not by अभिजित - १
हि इष्टापत्ती ठरो