Skip to main content

साहित्यिक

झुंज - अंधाराच्या राक्षसांशी

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 06/12/2014 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर महिना सुरु झालेला आहे, सूर्यास्त लवकर होऊ लागला आहे, चार्टर बस मधून घरी परतताना, अस्तांचल जाताना सूर्य दमलेला, ओजहीन दिसत होता. सूर्य अस्त होताच, थंड गार वारे अंगाला झोंबू लागले. बसची खिडकी बंद केली. काळजात धस्स झाले. चित्र-विचित्र निराशेने भरलेले विचार मनात येऊ लागले. खरं म्हणाल तर मला हिवाळ्याची भीतीच वाटते. जिथे साक्षात सूर्यदेव शक्तीहीन झाले तिथे सामान्य माणसांचे काय. हिवाळा म्हणजे छोटे दिवस आणि मोठ्या रात्री. सूर्याची भीती नाहीशी झाल्याने मानवाला त्रास देणाऱ्या अंधाराच्या राक्षसांचे बळ वाढते. दुसऱ्या शब्दांत हिवाळा म्हणजे अंधाराच्या राक्षसांचे राज्य.

छावणी - ३

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 22/11/2014 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/29500 http://www.misalpav.com/node/29514 ******************** व्हाईसरॉय माऊंटबॅटन यांनी दिल्ली आकाशवाणीवरुन घोषणा केली आणि पाकीस्तान अस्तित्वात येणार हे पक्कं झालं! हिंदूंचे हिंदुस्तान आणि मुसलमानांचा पाकीस्तान अशी सर्वसामान्य जनतेची धारणा झाली होती. पाकीस्तानातील मुसलमानांनी हिंदूंच्या अस्तित्वाबद्द्ल प्रश्न केल्याबरोबर हिंदूस्तानात मुसलमानांचे काम काय असा प्रश्न साहजिकच पुढे आला.

घटकाभरचं झुरणं..

लेखक Targat Porga यांनी गुरुवार, 20/11/2014 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम! हा शब्द तुम्ही फक्त ऐकलेला,वाचलेला असतो.त्या बाबतीत तुम्ही जास्त विचारही केलेला नसतो ती केवळ एक रम्य कल्पनाच आहे अशीच तुमची समजूत असते.ह्या गोष्टीची तुम्हालाही अनुभूती मिळावी ही कल्पना तुम्हाला कधी कधी शिवून जाते पण तुम्ही मात्र 'श्या !आपलं काम नाही हे प्रेम बीम ' अस मनातच म्हणून ती कल्पना करणं सोडून देतात.त्याचे फक्त वाईटच परिणाम असतात असं म्हणून तुम्ही स्वतःला समजावतात.

कन्फ्यूजन /कम्युनिकेशन/कन्व्हिक्शन

लेखक विनायक पाचलग यांनी मंगळवार, 18/11/2014 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, बर्‍याच दिवसाने मिसळ्पाव वर लिहितोय.. आणि सांगायची गोष्टही तशीच आहे.. साधारण ६ वर्षापुर्वी हा प्रवास सुरु झाला, आधी कोल्हापुरी दादा या टोपणनावाने आणि मग स्वतःच्या नावाने इथे लिहु लागलो. अनेकदा बालिश आणि क्वचित बरे असे त्या लिखाणाचे स्वरुप होते. पण या कालावधीत बर्‍याच मिपाकरांनी मला मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले. कित्येकदा चेष्टाही केली, पण या सार्‍यातुन खुप काही शिकायला मिळाले. महत्वाचे म्हणजे लिखाणाची उर्मी कायम राहिली. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे आता हा माझ्या लिहिण्याचा प्रवास एका महत्वाच्या टप्प्यावर आलेला आहे .

एक लक्ष वाचक - एक प्रवास

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 03/11/2014 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज ३ नोव्हेंबर, सायंकाळी ८ वाजता कॉम्पुटर चालू केला, सहज लक्ष गेल ब्लॉगला वाचक संख्या एक लक्षाच्या वर गेलेली होती. जेंव्हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती, आपला ब्लॉग कुणी वाचेल याची कल्पना ही केली नव्हती. चिरंजीवाना शिक्षणात मदत होईल या हेतूने कॉम्पुटर (लेपटाॅप) घरात आला. अर्थातच मला ही तो वापरायला मिळालाच. उत्सुकता म्हणून कुठे मराठी वाचायला मिळेल या उद्देश्याने अंतर्जालावर शोध घेऊ लागलो. सर्व प्रथम मराठी सृष्टी ही वेबसाईट दिसली. वेबसाईट वर मराठीत लिहा, आपल्यातील लेखकाला जागवा. असे आव्हान होते.

ज्याचे त्याला कळले

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 19/10/2014 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
शिलेदार धारातीर्थी बालेकिल्ले ढळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले तरातरा निघालेले पुन्हा मागे वळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले बेघर होतील आता जे पंधरा वर्ष रुळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले पीळ बघूया जाईल का सुंभ मात्र जळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले शुभ्र कपड्यांमागचे रंग खरे उजळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले आहे नव्याची आशा संकट परी ना टळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले मतदाराचे कौतुक की कर्तव्य त्याला कळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले - अ ज ओक

मला न आवडलेली पुस्तके: आत्मचरित्रे/चरित्रे

लेखक पुस्तकमित्र यांनी बुधवार, 15/10/2014 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 http://www.misalpav.com/node/29133 ------------------------------------------------------------------------------- या आधीच्या ३ धाग्यांप्रमाणेच या धाग्यात लिहूया मला न आवडलेल्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल. चरित्रे/आत्मचरित्रे न आवडण्याची कारणे काही अशी सांगता येतील की त्या पुस्तकात सत्याचा विपर्यास झालेला कधी कधी दिसतो. तर कधी आत्मप्रौढीचा वास येतो.

पुनःप्रकाशितः गुणामामा

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 13/10/2014 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
(डिस्क्लेमर: काही काळापूर्वी अन्य एक संकेतस्थळ नवीनच जन्माला आलं असतांना त्या स्थळाला शुभेच्छा म्हणून हे व्यक्तिचित्र तिथे प्रसिद्ध केलं होतं. पण त्या स्थळाला दुर्दैवाने म्ह्णावी तितकी लोकप्रियता लाभली नाही. मध्ये बराच काळ ते स्थळ बंदच होतं, आता सुरू झालंय. पण मला तिथे जुन्या पानांत हे व्यक्तिचित्र आढळलं नाही, कदाचित डीलीट केलं गेलं असावं. त्यावर कडी म्हणजे मला आता त्या स्थळावर लॉग-इन देखील करता येत नाही. दुर्दैव! मुद्दा असा की हे व्यक्तिचित्र तिथे प्रकाशित केलं होतं.

चावडीवरच्या गप्पा - अफझलखानाचे सै(दै)न्य

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 08/10/2014 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत. “काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात. “अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे. “हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे. “अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला?