Skip to main content

साहित्यिक

दिगंबर - फसलेला संन्याशी अन थकलेला संसारी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 06/03/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.

'स्वामी दया करा.
आता या वयात हे करायला सांगू नकात.
कळत नव्हतं, तेव्हापासून तुमच्या पंखाखाली घेतलंत मला!
चार चांगल्या गोष्टी शिकवल्या!
ब्राह्मण नव्हतो तरी, संध्या शिकावलीत.
येत नव्हतं तरी, घासून पुसून संस्कृत शिकवलेत.
चार घरी अनवाणी पायांनी भिक्षा मागायला शिकवलीत.
प्रसंगी, स्वतः रांधून एकटच जेवायला शिकवलंत.
स्वामी, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंत,
पण आता हे करायला सांगू नकात!

Don't lose out; Work out - पुस्तकाची ओळख

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 04/03/2015 15:44 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार,

नुकतंच एक पुस्तक वाचनात आलं. रुजुता दिवेकर यांचं - डोन्ट लूज आउट; वर्क आउट

प्रत्येक पानागणिक एखादी ऐकलेली, बोललेली, वाटलेली, गोष्ट समोर येत गेली. 'अरे हेच.... अगदी हेच वाटलेलं...' किंवा 'ऐला मीही असंच म्हणतो...' असं मनाशी वाटल्याशिवाय पुस्तकातला एकही धडा संपला नाही. त्यामुळे हे पुस्तक वाचताना विशेष मजा आली.

शीर्षकावरूनच पुस्तकाचा विषय कळतो. वर्काउट, किंवा व्यायामावर भाष्य करणारं हे पुस्तक आहे. व्यायाम महत्वाचा आहे कारण असंख्य जण तो महत्वाचा समजत नाहीत. लेखिकेची या विषयावरील पकड निर्विवाद असून त्याचा प्रत्यय पुस्तकातील मांडणीतून येत रहातो.

मातृभाषेची सेवा

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 02/03/2015 14:19 या दिवशी प्रकाशित केले.

आपल्या मातृभाषेचा आदर आणि अभिमान बाळगण्यासाठी इतर भाषांचा अपमान आणि द्वेष करावा हे सर्वस्वी चूक आहे. इतर भाषांचा अपमान करून मातृभाषेची सेवा होत नसून मातृभाषेत बोलून, लेखन वाचन करून, लेखकांची पुस्तके विकत घेऊन त्यांना दाद प्रोत्साहन देऊन, इतर भाषेतील उत्कृष्ट साहित्य मातृभाषेत आणून तसेच शब्दकोश सतत वृद्धिंगत करून ती सेवा घडत असते आणि मातृभाषा टिकून राहते. खरा मातृभाषेचा पुरस्कर्ता इतर भाषाही तेवढयाच तन्मयतेने शिकतो, वाचतो, बोलतो, लिहितो.

आनंदवन प्रयोगवन

लेखक मनिष यांनी सोमवार, 02/03/2015 10:20 या दिवशी प्रकाशित केले.

'आनंदवन प्रयोगवन' हे डॉ. विकास आमटेंचे पुस्तक नुकतेच वाचले. आनंदवन, बाबा आमटे ह्यांचे कार्य, शिवाय साधनाताईंचे 'समिधा' आणि डॉ. प्रकाश आमटे ह्यांच्या 'प्रकाशवाटा' ह्या पुस्तकांमधून आनंदवन आणि त्यांचे इतर प्रकल्प ह्यांची ओळख आहेच, तरीही गेल्याच महिन्यात आनंदवनला गेलो असतांना तिथले विविध उद्योग आणि आनंदाने आपल्या कामात रमलेली माणसे बघून स्तिमित झालो होतो. प्रत्यक्ष आनंदवनातल्या ह्या उद्योगांविषयी आणि प्रयोगांविषयी मलातरी आधी फारसे माहित नव्हते. तिथल्या परांजपे काकांनी ह्या वेळेस खूप सविस्तर माहिती दिली आणि बरेचसे काम प्रत्यक्षही पाहता आले.

मराठी भाषा दिन लघुकथा स्पर्धा -निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी शनिवार, 28/02/2015 16:02 या दिवशी प्रकाशित केले.

सप्रेम नमस्कार
मराठी भाषा दिनानिमित्त आपण लघुकथा स्पर्धा आयोजित केली होती.तिला सदस्यांचा छान प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यास आनंद होत आहे.
या स्पर्धेसाठी सदस्यांपैकी स्पा,स्वॅप्स,प्रभाकर पेठकर,इनिगोय, स्पार्टाकस आणि संपादकांमधुन पैसा,लीमाउजेट,अजया,विकास यांनी परीक्षण केले.
परीक्षणाचे थोडक्यात निकष(स्वॅप्स यांच्या शब्दात) पुढीलप्रमाणे:

थ्री क्वशन्स- लिओ टॉलस्टॉय

लेखक लाल टोपी यांनी गुरुवार, 26/02/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.

उद्याच्या जागतिक मराठी दिनानिमित्त लिओ टॉलस्टॉय यांच्या 'थ्री क्वशन्स' कथेचा स्वैर अनुवाद...

कथाश्री २०१४

लेखक नाखु यांनी बुधवार, 04/02/2015 10:02 या दिवशी प्रकाशित केले.

कथाश्री २०१४ हा दिवाळी अंक गरज या विषयाला वाहिलेला आहे.
या विषयाला अनुसरून उचित लेख आहेतच्,शिवाय मंगला खाडीलकरांनी घेतलेल्या तीन मुलाखती वाचनीय आहेत.

मराठी दिनानिमित्त लघुकथा स्पर्धा

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 01/02/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.

दि. २७ फेब्रुवारी मराठी दिन. मायमराठीच्या उत्सवाचा सोहळा यथोचित साजरा करण्यासाठी मिसळपावने दोन उपक्रम आयोजले आहेत. एक म्हणजे मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख.
..आणि दुसरा म्हणजे, लघुकथा-स्पर्धा. मराठी दिनानिमित्त, मिसळपाववरील हौशी लेखक आणि सदस्य यांच्यासाठी लघुकथा स्पर्धा जाहीर करत आहोत.
या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे राहतील.
१. मिसळपाव सदस्यांनी आपल्या कथा, शीर्षक व ‘मराठी-दिन लघुकथा स्पर्धा’ या उप-शीर्षकाने आजपासून दि. २५ फेब्रुवारीपर्यंत मिसळपाववरील ‘जनातले-मनातले’ या दालनात स्वत:च प्रकाशित कराव्यात.