Skip to main content

राजकारण

विनील, नक्षलवादा विषयी महत्त्वाचे

लेखक आळश्यांचा राजा यांनी सोमवार, 21/02/2011 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ लक्ष वेधण्यासाठी नवीन धागा आहे. हेच मी श्रामोंच्या धाग्यावरील प्रतिसादात दिलेले आहे. http://www.youtube.com/watch?v=_11_ufkDP4o इथे मलकनगिरीतील आदिवासी स्वयंस्फूर्तीने विनीलला नक्षल्यांच्या तावडीतून सोडवण्याचा निर्धार करीत असलेले दिसेल.हा त्याच कट ऑफ भागातील व्हिडीओ आहे. मध्यमवयीन आदिवासी स्त्री तीस वर्षांच्या विनीलचा उल्लेख "मोर बापा" - माझा बाप असा करतेय. बघा. जो जनतेचे रक्षण करतो पोषण करतो धारण करतो तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ हे त्या बाईने कुठे वाचलेले नाही. तरीही तिला हे वाटले.

विरंगुळा - ऑनलाईन चित्रपट

लेखक सहज यांनी शनिवार, 19/02/2011 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ - इतिहास, संस्थळचर्चा इ इ एक चित्रपट अधुन मधुन वेगवेगळ्या चॅनेल्सवर लागतो आजकाल. म्हणले तर जुना म्हणले तर नवा आहे. नाव बहुतेक 'अभी तक पचपन्न' का कायसेसे आहे. त्याची कथा तुम्हाला ऐकवतो. चित्रपट व कथा काल्पनिक आहे संबध लावायला गेलात तर चक्रवाल! एन्जॉय करा. सिनेमाची सुरवात दाखवली आहे साल १९४७. मुद्दाम ब्लॅक एन्ड व्हाईट दृश्य आहे. सेठ मोहनदासजी एक मोठ्या बिझनेस सामाज्याचे मालक आहेत. पण त्यांनी आता धंद्यात लक्ष कमी केले आहे.

पापाची भागीदारी

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 16/02/2011 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय ग्राहक मित्रहो, यंदा कांद्याचा भाव आणि कांद्याचे भावाचे राजकारण चांगलेच गाजले. हे आपण जाणताच. यावर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे उत्पादन प्रतिएकरी कमी आले मात्र प्रति एकरी उत्पादनखर्च एकतर दरवर्षीएवढाच किंवा त्यापेक्षा जास्त आला. उत्पादनखर्च वाढीची कारणे: १) वाढलेले डिझेलचे भाव २) सेंद्रीय /रा. खताच्या वाढलेल्या किमती ३) दुपटी-तिपटीने अचानक वाढलेले शेतमजूरीचे दर. ४) अतिपावसामुळे वाढलेला मशागतीचा खर्च. खर्च वाढलेत पण उत्पादन मात्र कमी आलेत, त्यामुळे कांदा उत्पादकाला यावर्षी कांदा पिकवायला प्रतिकिलो रू.

सोशल नेटवर्किंगची कमाल!

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 14/02/2011 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी २००६ ते जून २००९ या जवळपास साडेतीन वर्षांच्या कालावद्यीत ट्युनिशियामधील अमेरिकेच्या दूतावासाने वॉशिंग्टनला काही गुप्त संदेश पुरवले. असंख्य गुपिते फोडून जगभरातील सत्ताद्यीशांना घाम फोडणा-या आणि अनेक मुखवट्यांआडचे खरे चेहरे जगासमोर आणणार्‍या विकीलिक्सच्या हाती या संदेशांच्या दहा फाईल्स सापडल्या, आणि गेल्या नोव्हेंबरच्या आसपास ट्यूनिशियातील अराजकाच्या परिस्थितीची भयानक जाणीव तेथील जनतेला झाली.

इजिप्त आणि असहकार

लेखक नितिन थत्ते यांनी शुक्रवार, 11/02/2011 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या इजिप्तमध्ये घडत असलेल्या घटनांची जी काही माहिती आपल्यापर्यंत पोचत आहे त्यानुसार इजिप्तच्या जनतेने अभूतपूर्व एकजुटीने उठाव करून अध्यक्ष मुबारक यांना पायउतार होण्यास भाग पाडले आहे. मुबारक यांनी उपाध्यक्षांकडे सत्ता सोपविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सदर घटनाक्रमात इजिप्तच्या लष्कराची भूमिका महत्त्वाची ठरली. निदर्शने करणार्‍या लोकांवर शस्त्र चालवण्यास सैन्याने नकार दिला. त्यामुळे मुबारक यांना पर्यायच उरला नाही. या निमित्ताने (अहिंसक) असहकाराच्या तत्त्वाचे प्रात्यक्षिकच तेथे दिसून आले. एखादे जुलमी सरकार अन्यायाने देशाच्या जनतेवर राज्य करते.