Skip to main content

राजकारण

चालू घडामोडी । मे २०२६ । वैशाख अधिक ज्येष्ठ १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी शुक्रवार, 01/05/2026 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

सर्व मिपाकरांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

"जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" असे राज्यगीत असलेल्या आपल्या मराठी राज्याची स्थापना होऊन आज ६६ वर्षे पूर्ण झाली.

आज जागतिक कामगार दिन आहे. पांढरे, निळे, करडे - सर्व प्रकारचे श्रमिक, हे जग निर्माण करण्यासाठी जे कष्ट उपसतात त्यांच्या श्रमाचा हा गौरव दिन.

आज वैशाखी पौर्णिमा आहे. भगवान विष्णूंनी आजच्या दिवशी गौतम बुद्धांच्या रूपाने भूतलावर अवतार घेतला होता. केवळ हिंदूंनाच नाही, अवघ्या मानव जातीला शांतीचा संदेश त्यांनी दिला.

चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी रविवार, 01/03/2026 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
या महिन्यात १९ मार्चला गुढीपाडवा व हिंदू नववर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मिपाकरांना नववर्षाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा. केंद्र सरकार व इतर संस्थांचे वार्षिक अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प विकसित 'भारत@२०४७' च्या ध्येयावर आधारित आहे असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.‌ आखाती प्रदेशात पाच-सात देशांमध्ये युद्धसदृश्य लढाया होत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.‌ हे युद्धाचे प्रकरण कुठवर जाईल याबद्दल काही अंदाज जाणकार मिपाकर व्यक्त करतील का?

चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६

लेखक कांदा लिंबू यांनी रविवार, 01/02/2026 05:04 या दिवशी प्रकाशित केले.
चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६ पाहता पाहता नवीन वर्षाचा पहिला महिना संपला. थर्टीफर्स्टची धुंदी अजून उतरलेली नसतानाच, स्नेहीजणांनी दिलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा अजून मनात असतानाच, त्यांनी दिलेल्या संक्रांतीच्या तिळगुळाचा गोडवा अजून जिभेवर असतानाच येत्या महाशिवरात्रीच्या उपवासाचे वेध लागले आहेत. नवीन वर्षाचा साडेआठ टक्के काळ संपून फेब्रुवारी महिना सुरूही झालाय. काळ कुणासाठी थांबत नाही हेच खरे! मागच्या महिन्यात स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

कुंपण

लेखक रांचो यांनी शुक्रवार, 23/01/2026 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

महापालिका निवडणूक निकालांचे चर्वितचर्वण

लेखक कांदा लिंबू यांनी शुक्रवार, 16/01/2026 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
(उर्फ: “निकाल आले, पण अर्थ कुणाला लागला?”) महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल आज अखेर जाहीर झाले आणि लगेचच राज्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा “आम्ही जिंकलो”, “नैतिक विजय आमचाच”, “जनतेने स्पष्ट कौल दिला” अशा घोषणांची आतषबाजी सुरू झाली. निकाल कोणताही असो, प्रत्येक पक्षाच्या गळ्यात विजयाची माळ, तर पराभवाची माळ मात्र नेहमीच “जनतेच्या चुकीच्या समजुतींनी” किंवा “ईव्हीएमच्या गडबडीने” दुसऱ्याच कुणाच्या गळ्यात पडलेली दिसते. महापालिका निवडणूक म्हणजे खरं तर ड्रेनेज, कचरा, पाणी, रस्ते आणि फुटपाथ यांवरचा लोकशाही उत्सव.

भारतात अनागोंदी माजू शकेल का?

लेखक शाम भागवत यांनी बुधवार, 14/01/2026 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
https://youtu.be/iMSlfNNhYcc?si=FxwPDV18AKiKCfX4&t=1 काल वरचा व्हिडीओ पाहिला. विचार करण्यासारखा वाटला. मग मी सारांश लिहून काढून मग तो मिसळपाववर टाकावा असे ठरवले. अर्घ्यातासाचा व्हिडीओ पहायला फारसा लोकांना वेळ नसतो. पण थोडक्यात कोणी सांगत असेल तर मात्र लोकं तयार असतात. हाच विचार करून हा प्रयोग करून पाहातो आहे. :) ०:०० ते १२:५१ १.पूर्वी आपण नोटा छापायचं काम करण्यासाठी प्रिंटिंग प्लेट्स वापरायचो. विशीष्ट प्रकारचा कागद बाहेरून मागवून तो वापरायचो. या प्रकाराला प्लैट बेड पध्दत म्हटले जायचे.

चालू घडामोडी: जानेवारी २०२६

लेखक कांदा लिंबू यांनी गुरुवार, 01/01/2026 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा! सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना. या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत. तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की.

चालू घडामोडी - डिसेंबर २०२५

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 01/12/2025 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिपावरच्या चालू घडामोडींचा परामर्ष घेता घेता "अ" च्या बाराखडीतले सदस्यनामे घेणारे आयडी सोडून बाकी सगळे आयडी सगळ्ळ्ळे समजून घेतील अशा अपेक्षेने चालू घडामोडींचा हा (माझा) पहिला धागा काढत आहे. चालू घडामोडींच्या धागानिर्मात्यांच्या लिस्टीत "अ" वर्गीय धागालेखक तसेही मायनॉरिटीत असल्याने म्हणले चला उपेक्षितांचा पण आवाज उठवुया.

बिहार निवडणूका २०२५ आणी प्रशांत किशोर

लेखक धर्मराजमुटके यांनी गुरुवार, 06/11/2025 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दिनांक ६ आणी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी बिहार विधानसभेसाठी निवडणूका होत आहेत. निवडणूकीचे निकाल १४ नोव्हेबर २०२५ रोजी येतील. निवडणूक निकालांवर मिपावरील बरेच सदस्य लक्ष ठेऊन असतीलच तर निकालांची कारणीमिमांसा करणारे काही लेख १४ नोव्हेंबर २०२५ नंतर मिपावर येऊ शकतील. मला मुख्यतः महाराष्ट्र विधानसभा आणी राष्ट्रीय स्तरावरील लोकसभेच्या निवडणूकांमधे विशेष रस असतो. मात्र बिहार विधानसभेच्या निवडणूकांबद्दल रस निर्माण झाला ते केवळ एका व्यक्तीमुळॅ ते म्हणजे प्रशांत किशोर पांडे !

आपरेशन सिंदूर : ट्रंप तात्या कोमात

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 21/07/2025 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
ओपेरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही. बहुतेक खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांना कळून चुकले असेल की भविष्यात भारताला ब्लॅक मेल करणे संभव नाही याचा मानसिक धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित. माझा एक मित्र कट्टर मोदी विरोधी आहे, काल त्याने मला फोन करून म्हंटले, पटाईत, ट्रंप तात्या पुन्हा म्हणाले आहे, भारताचे जेट पडले.