Skip to main content

प्रवास

मुंबई मीटर जाम.

लेखक हैयो हैयैयो यांनी गुरुवार, 12/08/2010 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई मीटर जाम. जे औटोरिक्षा / टैक्सि ने प्रवास करतात अशांसाठी विशेष: आज १२ अगस्ट आहे, आणि आज मीटर जाम चा दिवस आहे. आज आपण लोक औटोरिक्षा / टैक्सि चा उपयोग नाही करणार. आज आपण आपल्या आफिसास बस ने / लोकली ने / चालत चालत येणार. बस ने / लोकली ने / चालत चालत येणेजाणे सफलतापूर्व असो तसेच औटोरिक्षा / टैक्सि वाल्यांस बरी अद्दल घडो ही शुभकामना! बघुया काय मिजाज राहतो येथील जनते चा आणि औटोरिक्षा / टैक्सिवाल्यां चा!! हैयो! हैयैयो!!

विचारी मना . . .

लेखक दत्ता काळे यांनी सोमवार, 09/08/2010 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वींची गोष्ट मी पुण्याहून रत्नागिरीला ९.३० च्या रातराणीने (बसने) चाललो होतो. बसला खूप गर्दी होती. मी अ‍ॅडव्हान्स बुकींग केलं होतं. टू बाय थ्रीची सिटींग अ‍ॅरेजमेंट असलेल्या त्या बसचे मला एका बाकावरचे बाहेरचे तिसरे सीट मिळालेले होते. बसमध्ये कंडक्टर आल्यावर त्याने सगळी तिकिटे चेक करून, ज्यांचे बुकींग (रिझर्वेशन) नव्हते त्यांची तिकीटे फाडली आणि थोड्यावेळात बस सुरु झाली. ड्रायव्हरने बसमधले सगळे लाईटस बंद करून फक्त कंडक्टरच्या वर असलेला निळा लाईट चालू ठेवला. जवळपास सगळेच प्रवासी झोपण्याच्या मूडमध्ये असल्याने बसमध्ये फारसा गोंगाट, बडबड नव्हती.

गोकाकचा धबधबा

लेखक चालु माणुस यांनी शुक्रवार, 06/08/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
गोकाकच्या धबधब्याचे काही फोटो आहेत..... गोकाक हे गाव बेळगाव (कर्नाटक) पासुन ६० कि. मी. वर आहे..... येथील कापड गीरणी प्रसिध्द आहे.... पहिला फोटो.......धबधबा कोसळण्यापुर्वी.... दुसरा फोटो........धबधब्यावरील झुलता पुल........ तीसरा फोटो.......कोसळणारा धबधबा.....

वाट बघतोय रिक्षावाला

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 06/08/2010 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
शालिमारे का भौ? चला सिबीएस, शालिमार... लगेच निघेल... शालिमार? चला बसा... शालिमार... शालिमार... ए संत्या आवाज दे ना भाडखावू? लायनीत उगाच गप उभा का राहतो? सालं पट्टा मारतो अन धंदा ओरडायची लाज वाटते का मग? ओ भाई, आवाज कमी. हे काय सकाळपासून ३ ट्रिपा मारल्या पट्यावर. एक नाशिकरोडचं भाडं होतं म्हणून गेलो अन आपली आज दिवसभराची लेवल झाली. आजचं भाडं सुटलं म्हणून निवांत आहे. तुमी मारा पट्टे. मी पुडी घेवून येतो. सकाळपासून खाल्ली नाही. तुमाला कोणती आणू? विमल? विमल नको बाबा. हिरा आण. लई लागतो डेंजर. हे घे पैसे. आख्खी १० ची माळ आन. आणतो. तुमी भाडं गोळा करा तवर.

मैत्र जीवाचे

लेखक जिप्सी यांनी गुरुवार, 05/08/2010 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणीच शिवचरित्र वाचून भारावून वगैरे गेलो होतो. त्यानंतरच्या काळात शिकारकथा,जंगलकथा ई. प्रकार वाचून तर जंगल,डोंगर दर्यांची जास्तच ओढ वाटायला लागली. कोल्हापुरात राहत असल्यामूळ पन्हाळा भरपूरदा बघितलेला होता,इतर पण डोंगर चढून उतरून झाले होते. पण यालाच ट्रेक म्हणतात हे माहित नव्हतं. पुढ पुण्यात आल्यावर 'ट्रेक' या विषयाची थोडीफार माहिती कळायला लागली,आजूबाजूच्या पोरातली काही पोर शनिवार,नारायण,सदाशिव म्हणावं तसं तोरणा,राजगड,सिंहगड म्हणत होती. मग ह्यांच्यात घूस,त्यांच्या बरोबर जा करत ट्रेकिंगची गोडी लागून गेली.