Skip to main content

प्रवास

भर पावसात खंडाळ्याच्या घाटात...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 06/09/2010 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्रीपासुन पावसाने धुमाकुळ घातलेला. खरेतर कालच म्हणजे शनीवारीच कुठेतरी छान कोकणसाईडला बाईक काढायची आणि मनसोक्त भटकायचे असा आमचा बेत होता. पण अस्मादिक नुकतेच मलेरियाच्या भेटीला जावुन आल्याने सौभाग्यवती भर पावसात बाहेर पडायला तयार नव्हत्या. शनिवारची संध्याकाळ त्या वादावादीतच गेली आणि रवीवारी सकाळी ... "ठिक आहे, चल जावूया कुठेतरी! पण पावसात फार भिजायचे नाही, रेनकोट घालूनच निघायचे!" अशा सशर्त सहमतीनंतर रवीवारी दुपारी ११.३० च्या दरम्यान आम्ही घर सोडले. पाऊस जवळ जवळ नव्हताच, त्यामुळे रेनकोट (विंडशिटर) बॅगेतच होते. बाईक काढली आणि पनवेलच्या मार्गाला लागलो.

ठोसेघर धबधबा

लेखक उपेन्द्र यांनी रविवार, 05/09/2010 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज संध्याकाळीच सातार्‍याजवळच्या ठोसेघर धबधब्याला भेट देऊन आलो. पूर्वी एकदा गेलो होतो तेव्हा रस्ता खूप खराब होता. पण आता चांगला आहे.

ठोसेघर धबधबा

लेखक उपेन्द्र यांनी रविवार, 05/09/2010 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज संध्याकाळीच सातार्‍याजवळच्या ठोसेघर धबधब्याला भेट देऊन आलो. पूर्वी एकदा गेलो होतो तेव्हा रस्ता खूप खराब होता. पण आता चांगला आहे.

दुबई ला जाताय..जरा जपून

लेखक अशक्त यांनी शुक्रवार, 03/09/2010 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
काल एक ढकलपत्रातून अस कळल की कोणाच्या तरि मित्राला खसखस बाळगल्या बद्दल दुबई मध्ये २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. लहानपणी आम्ही चार आण्याची खसखस...................फसफस...अस काहितरी गाण म्हणायचो. खसखस अनारश्यात खाल्ल्याचे आठवते. म्हणजे आता दिवाळी ला फराळ करुन प्रवास केला तर तुरुंगाची हवा खावी लागेल. ही बातमी बघा http://www.boddunan.com/forums/11-general-discussions/70531-a-very-very… थोड गुगल करुन पाहील, बातमी मध्ये तथ्य आहे असे वाटते.