Skip to main content

प्रवास

तारकर्ली - कोकण

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 13/07/2010 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
तारकर्लीचा स्वच्छ पांढर्‍या रेतीचा समुद्रकिनारा तारकर्लीचे एमटीडीसी रेसोर्ट

भागीमारी - एका पुरातत्वीय उत्खननाची अनुभवगाथा

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 08/07/2010 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
भागीमारी हे नाव आठवले तरी ते सावनेर तालुका (जि. नागपूर) येथील छोटेसे गाव डोळ्यांसमोर उभे ठाकते. जवळपास सोळा-सतरा वर्षांपूर्वी ह्या गावाशी आणि तेथील परिसराशी एका पुरातत्वीय उत्खननाच्या निमित्ताने संबंध आला आणि एक वेगळाच अनुभव माझ्या पदरी पडला. सर्वात आधी सांगू इच्छिते की आता माझा पुरातत्वशास्त्र इत्यादी विषयांशी फक्त वाचनापुरताच संबंध राहिला आहे. पण कधी काळी एका नामवंत शिक्षणसंस्थेत भारतीय प्राच्यविद्यांचा अभ्यास करताना मला आणि माझ्या तीन सख्यांना पुरातत्वीय उत्खननात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची अनमोल संधी मिळाली आणि त्या संधीचा लाभ घेताना आम्ही त्या प्रात्यक्षिकपूर्ण अनुभवाने बरेच काही शिकलो.

प्रवास

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 07/07/2010 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, रोजचा ऑफिसला येण्याजाण्याचा सोडला तर सर्वांना आवडतो तो म्हणजे प्रवास. लहानगं मुल सुद्धा भुर्र जायचं म्हंटल की आनंदाने उड्या मारायला लागतं. मग हा प्रवास कोणत्याही कारणाने केलेला का असेना, लग्नकार्य, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, सहल, किंवा कामानिमित्त केलेला प्रवास. प्रवासात बरोबर ४ जण असले तर मग विचारायलाच नको, नुसती धमाल, मग बरोबर घरची मंडळी असो किंवा मित्र-मैत्रिणी. आपण केलेला प्रत्येक प्रवास आपल्या मनावर एक कायमचं चित्र कोरुन जातो. कधी कधी एकट्याने सुद्धा प्रवास करावा लागतो आणी माझ्या मते यावेळेत झोपेची वेळ सोडली तर उरलेल्या वेळात आपल्याला विचार करायला खुप सारे विषय मिळतात.

भुलेश्वरच्या शिल्पखजिन्यात

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 06/07/2010 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारी सकाळी लवकर निघालो. पुणे-सोलापूर रस्त्याने जाउन आधी थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेतले आणी परत महामार्गाला जाउन यवतच्या २ किमी अलीकडे असलेल्या टोल नाक्याच्या थोडेसे पुढे भुलेश्वर-सासवड फाट्यावरून उजवीकडे वळालो. इथून साधारण ८ किमी असलेल्या भुलेश्वराच्या मंदीरापाशी घाट चढून पोहोचलो. भुलेश्वर हे अतिशय सुंदर कोरीव काम असलेले १३ व्या शतकातील यादवकालीन शिल्पसमृद्ध शिवमंदीर आहे. इस्लामिक आक्रमणात येथील बर्‍याच शिल्पांची पडझड झाली आहे. तरी जे शिल्लक आहे ते निव्वळ अप्रतिमच.

दाभिळ टोक ते अर्थर-सीट... एक थ्रीलींग अनुभव

लेखक विमुक्त यांनी सोमवार, 05/07/2010 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
चला! सकाळी ६.३० ची स्वारगेट - वेल्हा - घिसर बस मिळाली... आता घिसरला उतरायचं... समोरची डोंगररांग चढून मोहरी आणी मग सिंगापूर... सिंगापूरला मुक्काम करायचा आणि दुसर्‍या दिवशी पहाटे सिंगापूर-नाळेनं खाली कोकणात उतरुन पुण्याला परत... "मास्तर, ३ घिसर द्या..." "पावसात घिसर पर्यंत जात नाही बस..." "कुठ पर्यंत जाते मग?" "विहिर... त्यापुढं नाही जात..." काय करायचं आता?... विहिर पासून चालत घिसरला जायचं म्हणजे १७-१८ कि.मी. चालावं लागणार... त्यात ४ तास तरी जाणार... "सध्या वेल्ह्या पर्यंतच तिकिट द्या..." तिकिटं काढली आणि आता काय करावं ह्यावर आमच्यात विचार सुरु झाले...

पदरगड ऊर्फ कलावंतीणीचा महाल

लेखक बज्जु यांनी शुक्रवार, 02/07/2010 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
पदरगड उर्फ़ कलावंतीणीचा महाल आतापर्यंत भिमाशंकरला १५-१६ वेळा गेलो असेन. एका वर्षीतर एकाच महिन्यात सलग ३ शनिवार-रविवार भिमाशंकरला गेलो होतो घरच्यांना शंका पण यायला लागली हा भिमाशंकरी मुलगी आणतो की काय घरात? असो. पण भिमाशंकरला चिकटुनच असलेल्या पदरगडावर जायचा योग काही आजवर आला नव्ह्ता. गेल्या रविवारीच मी आणि गिरीश साठे कुठे जायच कुठे जायचं असा विचार करत होतो आणि दोघेही एकदम बोललो पदरगड. ठरल तर मग पदरगड फ़ायनल, कोणीही नाही आलं तरी आपण दोघच जाऊ पण तेवढ्यात तात्या आणि पराग भावे सुध्दा येतो बोलले. शनिवारी संध्याकाळीच खाण्याचं सामान घेतलं. रविवारी पहाटे ५.०० ला मारुती ऒम्नीने निघालो.

डोणे दार - आहुपे घाट

लेखक अप्पा जोगळेकर यांनी मंगळवार, 29/06/2010 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वीकेन्ड्ला तिरंगी घाटात गेलो होतो. त्यावेळी यतिन नामजोशी याने काढलेले काही अप्रतिम फोटो टाकत आहे. बाकी तिरंगी घाटाबद्दल बोलण्यासारखे कमी आणि अनुभवण्यासारखेच अधिक आहे. नजर ठरत नाही असे उंच उंच कातळकडे, प्रचंड दमछाक करणारी खडी चढण आणि मढ्ची रामवाडी (कोकण) ते डोणे गाव (घाटमाथा) अशी चार्-साडेचार तासांची शरीराचा, मनाचा कस पाहणारी चाल. गेल्या महिन्यात वल्लींकडून या रुट्ची माहिती घेतली होती. त्यांचे आभार. Disclaimer - हे फोटो अतिशय सुंदर आहेत, अप्रतिम आहेत, लाजवाब आहेत. सगळेच्या सगळे फोटो यतिन नामजोशी याने काढलेले आहेत. मी काढलेले नाहीत.