Skip to main content

प्रवास

मरणघाई (लोकल गोष्टी)

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 30/07/2010 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
मरणघाई ============================================= मी राजसला शाळेत सोडून पार्ला स्टेशनवर ट्रेनमध्ये चढायचे तेव्हाची गोष्ट आहे. स्टेशनवर एक जिंगल सतत वाजत असायची.. आणि शेवटच्या एका ओळी व्यतिरिक्त काहीच मला समजायचं नाही. बरं तिच्याकडे दुर्लक्ष करावं.. तर ती इतक्यांदा वाजत राहायची की एखादा तरी शब्द डोक्यात घुसायचाच. मी पाच ते दहा मिनिटं तरी स्टेशन वर असायचे त्या तेवढ्या वेळेत किमान सात-आठ वेळा तरी ती जिंगल मला ऐकावी लागायची. मग एकदा कधीतरी मी ती जिंगल नीट लक्ष देऊन ऐकायचं ठरवलं. आणि ट्रेन येत असल्याच्या, विलंब होत असल्याच्या, स्वच्छतेच्या..

लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी (लोकल गोष्टी )

लेखक स्वाती फडणीस यांनी गुरुवार, 29/07/2010 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी ============================================ फेरीवाले आणि भिकारी यांचा सगळ्यात जास्त सुळसुळाट लेडीज डब्यातच असावा.. त्यात पुरूष फेरीवाले आणि भिकारी ही आलेच. आंधळ्या भिकाऱ्यांना तर लेडीज डबे अगदी अचूकपणे ओळखता येतात.. कधीही न चुकता ते या डब्यांमधून सहज चढ-उतर करतात.. डब्यात चढल्यावर मात्र त्यांना समोर उभ्या असलेल्या बायका दिसत नाहीत. कोणत्याही टीसीने आजवर भिकाऱ्यांना हटकलेलं मी पाहिलेलं नाही.. फेरीवाल्यांना मात्र कधी कधी डब्यातून उतरवलं जातं. नेहमीच दंड किंवा शिक्षा केली जाते असं नाही. ते एका डब्यातून उतरून दुसऱ्या डब्यात चढतात.. पाळली जात नसली तरी..

मळ्यातली सहल

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 29/07/2010 06:25 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात मी माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो. संध्याकाळचे ४:३० वाजून गेले होते. पावसाळ्याचे वातावरण अन मला घरी पोहोचण्यासाठी २ तासाचा हायवे वरचा प्रवास असल्याने मी लवकर निघण्याची घाई करत होतो. मामा गेल्यानंतर मळ्याचा कारभार मामींनीच हातात घेतला होता.मीही बर्‍याच दिवसात मळ्यात गेलेलो नव्हतो म्हणून मामींनी फारच आग्रह केल्याने मी त्यांच्या मळ्यात जाण्याचे ठरवले.

भिकारी पोट्टा (लोकल गोष्टी )

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 28/07/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
भिकारी पोट्टा =============================== . . लोकलमध्ये नेहमीच बऱ्याच किरकोळ घटना घडत असतात.. इतक्या सर्रास दिसणाऱ्या सामान्य.. की आपल्या लक्षातही येत नाहीत. मग त्यांत लक्ष घालणं.. त्यांना लक्षात ठेवणं या तर फार दूरच्या गोष्टी..! पण रोजच्याच प्रवासात रोजच्या प्रवाशांपैकी कोणी कधी रोजची अनास्था दूर सारून नेहमी पेक्षा वेगळं वागताना दिसतं.. आज तसंच झालं. ऑफिसमधून घरी येताना.. नेहमीप्रमाणे एक मुलगा डब्यात झाडू मारायचं निमित्त करून भीक मागायला आला.

चढाई 'पेद्रो दि गावा'ची..

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 27/07/2010 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च २०१० ला जेव्हा मी रिओ ऑफिस मध्ये पाय ठेवला तेव्हा दरवाज्यातून समोरच्या खिडकीबाहेर दिसणारे दृश्य पाहून मी दोन मिनिटे स्तब्ध झालो.. एक प्रचंड मोठी दगडी भिंत, एक सुळका आणि घनदाट जंगल.. DSCN0424 DSCN0428

दहशत (लोकल गोष्टी-८)

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 27/07/2010 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
दहशत ====================================== मुंबईत राहणाऱ्या.. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाजवळ अशा प्रकारचे भरपूर अनुभव असतील.. मी लिहिलेल्या प्रसंगांपेक्षा जास्त मजेशीर.. खिळवून ठेवणारे.. विचार करायला लावणारे.. हेलावून सोडणारे.. किंवा सुन्न करून टाकणाऱ्या या अशाच अनुभवांनी मुंबईकरांना, एका सूत्रात गुंफले आहे. लोकल प्रवास मुंबई करांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.. आणि तितकाच जिव्हाळ्याचाही. मुंबईतली गर्दी, धावपळ, गतिमानता.. लोकल्सच्या वेळा, ऑफिस, घर ऑफिसातल कामकाज.. त्यातूनच शोधून उपभोगलेले.. धरून ठेवलेले उत्सवी क्षण या सगळ्याची नशा मुंबईकरांच्या नसानसांतून वाहताना दिसते.

मैत्री एक्सप्रेस (लोकल गोष्टी-८)

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 26/07/2010 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री एक्सप्रेस ====================================== एखाद्या दिवशी लोकलने जाता जाता.. शाळा कॉलेजमधली एखादी मैत्रीण भेटते आणि मग जुळलेल्या सुरांच्या मैफिलीला पुन्हा एकदा रंगत चढते. आनंदाच्या चित्कार पाठोपाठ उत्सुकतेपोटी लांबलेली प्रश्नावली.. गहिवरून टाकते.. तुझी माझी ख्यालीखुशाली विचारत विचारत शब्दांची पाखरं चिवचिवत पुन्हा जुन्या दिवसांमध्ये हलकेच घेऊन जातात.. आणि मग तू, मी भोवती फिरणारे संवाद त्या त्या दिवसांच्या उजळणीत विरतात. तेव्हाच्या आठवतील तितक्या नावांच्या हजेरीने दोघी वा तिघीच समोर असताना अनुबंधांच रजिस्टर पूर्ण भरलं जात. कोण कुठे आहे.. काय करतंय.. कोण किती कुठे शिकतंय..