Skip to main content

झक मारते राव तुमची स्कॉच !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 01/10/2010 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षभरात अलिबागच्या ४-५ तरी चकरा नक्की झाल्या असतील. एकदा आई-आण्णा आले होते तेव्हा त्यांना मुरुड जंजीरा बघायचा होता म्हणून, तर एकदा सासु-सासर्‍यांना बघायचा होता म्हणुन. तर एक - दोन वेळा आम्ही दोघे नवरा बायकोच बाईकवरुन फिरून आलेलो. येता जाता अलिबागच्या साधारण १०-१५ किमी अलिकडे 'पळी' गावापाशी एक पाटी बघीतली होती.. "डि. सॅमसन कोल्ड्रिंक्स....!" कोल्ड्रिंक हाऊसच्या पाट्या तशा सगळीकडेच दिसतात, त्यामुळे दुर्लक्षच केले होते. नंतर कुणाकडून तरी ऐकले की ते केवळ कोल्ड्रिंक हाऊस नाही तर कोल्ड्रिंकची विशेषतः सोडा तयार करण्याची फॅक्टरी आहे.