साहित्यः
जुना बासमती तांदूळ - २ वाट्या
लालबुंद टोमॅटो - ५-६ नग
आलं - १ इंच
कढी लिंब - २ काड्या
काश्मिरी मिरची पावडर - १ टी स्पून (अथवा तिखट रंगहीन असेल तर किंचीत लाल रंग)
मीठ - चवीनुसार.
साखर - चवीनुसार.
तेल - ३ टेबल स्पून
जिरं - १ टी स्पून
बारीक चिरलेली कोथिबीर - सजावटीसाठी.
तयारी:
तांदूळ २०-२५ मिनिटे भिजत टाकावेत.
गॅस वर पाणी उकळवून त्यात टोमॅटो टाकावेत. २-३ मिनिटे उकळवून ते उकळत्या पाण्यातून काढून बर्फाच्या (किंवा साध्या) पाण्यात टाकावेत.
सहित्यः
चिकन ब्रेस्ट - अर्धा किलो (बोनलेस)
हिरव्या मिरच्या - ८
जिरं - १ टी स्पून
हळद - १/२ टी स्पून
अख्खी काळी मिरी - १/२ टी स्पून
आलं - १ इंच
लसूण - १० पाकळ्या
लवंग - ८ नग
दालचिनी - २ इंच
कोथिंबीर - मुठभर
पुदीना - ५ काड्यांची पाने
लिंबे - २ मोठी
साखर २ चमचे
तेल - चिकन फ्राय करण्यासाठी
कांदा - १ मध्यम
टोमॅटॉ - २ मध्यम
कोथिंबीर - सजावटीसाठी.
कृती:
चिकनचे मोठाले तुकडे करून घ्यावेत.
कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून १ इंचाचे तुकडे करावेत.
साहित्यः
कोलंबी - १/२ किलो
कांदे - २ मध्यम
काश्मिरी मिरच्या - १२-१५ किंवा काश्मिरी मिरची पावडर २ टेबल स्पून किंवा कुठलेही भडक रंगाचे तिखट आपल्या अंदाजानुसार
जिरं - १ टी स्पून
अख्खी काळी मिरी - १ टी स्पून
हळद - १ टी स्पून
मीठ - चवीनुसार
साखर - २ टीस्पून
व्हिनेगर - १-१/२ (दिड) कप
आलं - १ इंच
लसूण - ३ कांदे
कढीपत्ता - २ काड्या
तेल - १ कप
कृती:
कोलंबी सोलून साफ करून घ्या.
कांदे बारीक चिरून घ्या.
आलं - लसूण एकदम बारीक चॉप करून घ्या.
मिरच्या (किंवा तिखट) + जिरं + काळी मिरी + हळ
२५० ग्राम बोनलेस चिकन बारीक़ बारीक़ तूकडे करून घ्यावे.
त्यात दोन चमचे तान्दुळ पीठ, एक चमचा डाळीचे पीठ, चमचाभर तिखट, चवीपुरते मीठ, कोथिम्बिर, ओवा आणि लिम्बू पिळावा.
कढीपत्याची १५/२० पाने कुरकुरीत तळून घ्यावीत.
ही तळलेली पानं बारीक़ कुस्करून चिकन मधे टाकावीत.
सर्वात शेवटी एक अंडे फेटून टाकावे.
सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून अर्धा तास ठेवा.
कढईत तेल गरम करायला ठेवून चिकनचा एक एक तुकडा हळू हळू तेलात सोडा व मंद आचेवर लालसर तळा.
मंद आचेवर तळल्याने चिकन छान शिजते.
मिपावरचा व्हेज मांचुरियन आणि शेजवान फ्राईड राईसचा भाग्यश्रीने पाठवलेला फोटो पाहून ह्या लेखाला प्रेरणा मिळाली.
चीनच्या उत्तरेकडला एक पदार्थ तर एक दक्षिणेकडचा.
म्हणजे दिल्ली राईस आणि सांबार यासारखा.
मंगोलिया हा चीनचा उत्तरेकडला भाग.मुख्यत्वे Noprth East side.मांचू हे तिथले रहिवाशी.
त्यांच्याशी संबंधित म्हणजे मांचुरिअन.म्हणजे मांचुरियन फूड ,कपडे ,कार्पेट्स्,बूट ,टोप्या वगैरे.
मांचुरियन झाले विशेषण.`इंडिअन` सारखे.
फार उत्तरेकडला भाग हा.तिथे हिवाळ्यात खूप खूप थंडी असते .त्यामुळे थंडीचा बचाव करण्यासाठी कच्च्या मांसाचे अन्न खाल्ले जाते.मांस कमी शिजवून क्रंची ठेवलेले असते .तसेच भाज्या ,फळे या
राम राम मंडळी,
अहो आम्ही हलकट कोकणी माणसं! स्वत:च्या वाडीतला आंबा मुंबईला किंवा अमेरीकेत पाठवायचा आणि शेजारच्या वाडीतल्या कैर्या चोरून त्याची मोहरवणी करायची आणि त्याच्यासोबत गरमागरम भात जेवायचा, याचंच तिच्यायला आम्हाला कवतिक!
मोहरवणी हा खास कोकणातला पदार्थ. आज मी तुम्हाला मोहरवणीची पाकृ शिकवणार आहे. सध्या कैर्याआंब्यांचे दिवस आहेत, तेव्हा कैर्यांची मस्तपैकी मोहरवणी करून पाहा आणि तिच्यासोबत गरमागरम भात जेऊन झोपा दोन तास निवांत! म्हणजे मग पुन्हा संध्याकाळी देवगडात हलकटपणे गजाली करत हिंडायला मोकळे!
मित्रांनो आणि मैत्रिणींनो
काल पॅराडाईज (हैद्राबाद) मध्ये हैद्राबादी मटण बिर्याणी खाल्ली! काय चव होती सांगू... काही केल्या डोक्यातून जात नाहीये.
मस्त गरम गरम बिर्याणी... त्यावर अंड्यांचे काप... आत लुसलुशीत चमचमीत लज्जतदार मटण... जोडीला रायते... वा वा वा!
माझ्या नॉनव्हेजीटेरिअन मित्र-मैत्रिणींसाठी खास पाककृती देत आहे... नक्की करून बघा.
साहित्य :
मटण (मध्यम तुकडे केलेले) - १/२ कि.
बासमती तांदुळ (१/२ तास पाण्यात भिजवून) - १/२ कि.
कांदा (उभा चिरून) - १५० ग्रॅ.
मंडळी उकडीचे मोदक खायचे आहेत का? चला तर मग ते कसे बनवतात ते पाहु.
साहित्य
४ वाट्या किसलेला ओला नारळ
२ वाट्या कुटलेला अथवा किसलेला गुळ
१/२ चमचा वेलदोडे पुड अथवा जायफळ पुड
३ वाट्या तांदुळाचे पीठ
३ कप पाणी
३ चमचे लोणी
१/२ चमचा मीठ
कृती
एका भांड्यात खोवलेला ओला नारळ, गुळ, वेलदोडे पुड अथवा जायफळ पुड एकत्र करा व ते मिश्रण बर्यापैकी कोरडे व मोकळे होई पर्यंत गरम करा व नंतर बाजुला ठेवा.
हे मिश्रण गरम होई पर्यंत , दुसर्या बाजुला एका भांड्यात पाणी गरम करा. त्या पाण्यात चिमुटभर मीठ आणी थोडेसे लोणी टाका. हळुहळू त्या पाण्यात तांदुळाचे पीठ सोडा व ढवळत रहा.
साहित्य :
मध्यम आकाराचे बीट - २
मध्यम आकाराचा बटाटा - १
दाण्याचा कूट - १ चमचा (optional)
दही - ८-१० चमचे
साखर - १/२ चमचा
कोथिंबीर
मीठ
फोडणीसाठी -
तूप - २-3 चमचे
जिरे - १/२ चमचा
हिरवी मिरची - १ बारीक चिरून
कृती :
(१) बीट आणि बटाटा कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. साले काढून एकत्र कुस्करावे.
(२) त्यात दाण्याचा कूट, दही, कोथिंबीर, साखर आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण एकसारखे करावे.
(३) दुसरीकडे कढईत तूप, जिरे, हिरवी मिरची यांची फोडणी करावी.
(४) फोडणी थोडी थंड झाली की मिश्रणावर ओतून मिश्रण परत एकसारखे करावे.
मनस्वी