प्रसंग क्र. १....
खाडकन झोपमोड झाली. घड्याळ बघीतले रात्रीचे पावणे तीन वाजले होते.घाई घाईत खाली गेलो. पार्किंग मधे माझी लाडकी पाढंरी बजाज चेतक दिसली नाही. इकडे तिकडे शोधले पण कुठेच दिसत नव्हती.
चिंताग्रस्त अवस्थेत परत घरात आलो. बिछान्यावर बायको घोरत होती. तीला उठवून विचारण्यात काही अर्थ नव्हता. शेजारील टीपाॅय वरच्या बाटलीतून एक घोट पाणी प्यालो व लगेचच पुन्हा झोप लागली.
________________________________________
प्रसंग क्र-२....
"सापडली,सापडली", झोपेतच जोर जोरात ओरडत उठलो.बायकोची पण झोपमोड झाली होती. बायकोच्या त्रासिक चेहर्यावर, "काय मेलं म्हातारचळ लागलाय याला,दोन घटका निवांत झोपून पण देत नाही".(बादवे,रात्री आकरा वाजल्यापासून घोरासुरांची जुगलबंदी चालू होती.
बायकोने गदगदा हालवत विचारले,"आहो, काय सापडले?".
झोपेतून पुर्ण जागा झालो व साखरझोपेत पडलेले स्वप्न आठवून मनात पुरता खजील झालो होतो.
"अगं,काही नाही,झोप तू ".बायकोने पडत्या फळाची आज्ञा घेतली व लगेचच घोरायला सुरवात केली.
टेबलावरचे घड्याळ बघीतले सकाळचे पावणे पाच वाजले होते. भानावर यायला थोडावेळ लागला. उठून दिवाणखान्यात येवून बसलो.(टु बेडरूम च्या हाॅल ला मराठीत दिवाणखाना च म्हणतात ना!).जागृतावस्थेत आल्यावर सर्व उलगडा झाला. मनसोक्त हसलो.
______________________________________
म्हणजे झालं असं की पहिल्या स्वप्नात स्कूटर पार्किंग मधे न दिसल्याने झोपेतच त्यावर विचार चालू झाले होते. झोपेतच पाणी प्यालो,घड्याळ बघीतले वगैरे,वगैरे....
पुढे स्वप्नातच,नवीन लग्न झाल्यावर पहिली खरेदी स्कूटरचीच,त्याच आठवणी सुप्त मनातून उचंबळत होत्या.मी झोपलो होतो पण अंतर्मन विचार करतच होते. १९९० चे साल.बजाजने कावासाकी नावाचे क्युट मोटारसायकलचे माॅडेल बाजारात आणले होते.(बुलेटची बायको वाटायची) ऑफ शो रूम प्राईस एकवीस हजार रूपये. नुकतेच लग्न झाले होते. मित्राच्या जुन्या १९५६ च्या लॅब्रेंटावर १९९०च्या नव्या कोऱ्या माॅडेलला फिरवताना जीव कानकोंडा होत होता. कावासाकी खुणावत होती पण बजेट तंग होते.
शेवटी फंडातून कर्ज काढले.बजाज शो रूम मधे कावासाकी,चेतक इ. नव्या कोऱ्या गाड्या उभ्या होत्या. कावासाकी चित्रपटातील हिरोईन सारखी अप्राप्य गोष्ट,त्यातल्यात्यात चेतक साईड हिरोईन, बजेट मधली,म्हणून तीच कशी चांगली बायकोला पटवून सांगत होतो. तसेही, बॅचलर्स थरार संपुष्टात आला होतो. लवकरच लेकुरवाळा होणार होतो. बायकोचे काहीच म्हणणे नव्हते. स्वताच्या नव्या गाडीवरून मिरवायला मिळणार म्हणून खुश होती.
पांढर्याशुभ्र रंगाची चेतक आर टी ओ कडून नामकरण करून आमच्या घरात आली.बरेच दिवस सेवा केली. आता वय झाल्यामुळे पार्किंग मधे निवांत पडून होती. आजच तीची चोरी झाल्याचे कळाले.वाईट वाटले. अर्थात हे सर्व झोपेतच.
पोलीस कंम्प्लेंट करायला हवी..रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, वाहन परवाना शोधू लागलो.(त्या वेळेस स्मार्ट कार्ड नव्हते. हिरवट कागदाच्या छापील फार्मवर आर टी ओ सही शिक्कामोर्तब करून देत असत.तो जास्त दिवस टिकावा म्हणून त्याला पांढरे जाळीदार कापड चिकटवलेले व तो कागद निळ्या पुठ्ठ्याच्या डायरी वजा आवरणात बांईंड केलेला असे.) बराच वेळ शोधाशोध केल्यावर,एक लोखंडी तुकडा, कागदात लपेटलेला हातात आला. बघतो तर काय,स्क्रॅप सर्टिफिकेट, महिंद्रा ॲण्ड महिंद्राच्या लेटर हेडवर आणी चेसीस नंबरचा लोखंडी तुकडा होता तो....
आणी तेव्हांच माझी झोपमोड झाली व वर लिहील्या प्रमाणे प्रसंग क्रमांक दोन घडला.
_______________________________________
प्रसंग क्रमांक ३.....
सकळचे पाच वाजले होते.दिवाणखान्यात व घरा बाहेर गुफ्फ अंधार होता पण मनात मात्र हास्याच्या उकळ्या फुटत होत्या. एव्हढ्यात मोबाईल वाजला, बघीतले तर बँकेचा मेसेज होता.
"आपल्या खात्यात मधे शुन्य बॅलन्स आहे. रूपये एक हजार त्वरीत भरा अन्यथा आर बी आय च्या नियमानुसार अर्थिक दंड लागेल".
आता मात्र मी पुर्ण जागा होतो. दोन दिवसापूर्वीच बँकेत खाते बंद करण्यासाठी अर्ज,चेक बुक,डेबिट कार्ड जमा करून आलो होतो. बॅंक कर्मचाऱ्याच्या सुचने प्रमाणे चेक देऊन खात्यावर असलेली उर्वरित रक्कम काढून घेतली होती.
कर्मचारी खाते बंद करायचे विसरला पण संगणकाने मात्र चोख काम बजावले.
हसतच स्वयंपाक घराकडे मोर्चा वळवला. फक्कड चहा बनवला,स्वताच्या कपात दोन चमचे खांडसरी आणी सौभाग्यवतीच्या कपात शुगर फ्री घालून झाकून ठेवला....
काय करणार,वय झालयं ना!!!!
@कंजूस भाऊ यांच्या मागणीनुसार....
मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातास कसा लागावा
-सुधीर मोघे
वाचने
6705
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझाही विश्वास बसेना.
@कंजूस भाऊ यांच्या मागणीनुसार....
In reply to माझाही विश्वास बसेना. by कंजूस
भारी किस्से .....
बाय द वे,
In reply to भारी किस्से ..... by मुक्त विहारि
आहो, सगळी रात्र स्वप्नात गेली.
In reply to बाय द वे, by मुक्त विहारि
असा कायदा मागील सत्तर वर्षांत कुणालाच कसा सुचला नाही नवल वाटते.
In reply to आहो, सगळी रात्र स्वप्नात गेली. by कर्नलतपस्वी
राष्ट्र प्रथम... कुठलं? कारण
In reply to असा कायदा मागील सत्तर वर्षांत कुणालाच कसा सुचला नाही नवल वाटते. by मुक्त विहारि
राष्ट्र प्रथम...कुठलं? कारण काही लोक स्टेट्स ला राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट असे टाकतात नी असतात अरबी मुस्लिमांकडे चाकरी करत नाहीतर हरिते पत्रा साथी अमेरिकन सरकारच्या पाया पडत असतात!तरीही राष्ट्र प्रथमच.
In reply to राष्ट्र प्रथम... कुठलं? कारण by अमरेंद्र बाहुबली
त्यांना आपले म्हणा.....
In reply to तरीही राष्ट्र प्रथमच. by कर्नलतपस्वी
मुद्दा तो नाहीच कर्नल साहेब
In reply to तरीही राष्ट्र प्रथमच. by कर्नलतपस्वी
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मुद्दा तो नाहीच कर्नल साहेब by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to राष्ट्र प्रथम... कुठलं? कारण by अमरेंद्र बाहुबली
रूपये पंधराशे बँकेत जमा केले.
In reply to आहो, सगळी रात्र स्वप्नात गेली. by कर्नलतपस्वी
छान कर्नल साहेब, तरी ते
In reply to रूपये पंधराशे बँकेत जमा केले. by कर्नलतपस्वी
पहिली मारूती आठशे......
In reply to छान कर्नल साहेब, तरी ते by अमरेंद्र बाहुबली
अरे वा! मी आल्टो २ वर्षे
In reply to पहिली मारूती आठशे...... by कर्नलतपस्वी
जुन्या गाड्या, कुठल्याही
In reply to आहो, सगळी रात्र स्वप्नात गेली. by कर्नलतपस्वी
मस्त!
नवीन कायद्याची माहिती अत्यंत
शीर्षक वाचून आधी भलतेच काही
मलाही! :)
In reply to शीर्षक वाचून आधी भलतेच काही by प्रचेतस
@अबा,@प्रचेतस....याला म्हणतात मार्केटिंग.....
टंकाळ्याचा XXचा घो....
... पुढचा टप्पा?
@ वामनराव ..पधरा वर्षांहून अधिक जुनी सगळीच वाहने स्क्रॅप .
In reply to ... पुढचा टप्पा? by वामन देशमुख
धन्स गडकरी सो आणी त्यांचे शिलेदार.
In reply to @ वामनराव ..पधरा वर्षांहून अधिक जुनी सगळीच वाहने स्क्रॅप . by कर्नलतपस्वी
+१
In reply to @ वामनराव ..पधरा वर्षांहून अधिक जुनी सगळीच वाहने स्क्रॅप . by कर्नलतपस्वी
सरकारी फी किती लागली?
In reply to +१ by वामन देशमुख
हा वेगळाच लेखनप्रकार आवडला!
इव्हेंटफुल रात्र ..... ?
सर्वांचे पुनच्छ मनापासून आभार.