Skip to main content

मुक्तक

पूर्वेच्या समुद्रात -- २

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 28/11/2014 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे जहाज संध्याकाळी गोव्याच्या आसपास पोहोचले. अर्थात हे फक्त आम्हाला जी पी एस आणि दीप स्तंभांवरून कळत होते. पावसाळी वातावरणामुळे समुद्रकिनारा दिसत नव्हताच. पण गोव्याच्या आसपास पोहोचल्यावर तेथील तट रक्षक दलाच्या मुख्यालयात संपर्क केला असता पुढचे दोन दिवस गोवा ते कारवार अशी गस्त घालण्याचे आदेश मिळाले. म्हणजे सरळ दक्षिणेकडे कूच करायच्या ऐवजी तिथेच खेटे मारत राहायचे होते. आता हे का करायचे तर पावसाळ्यात मासेमारी बंद असते. हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो त्यामुळे मत्स्यबीज कमी होऊन पुढच्या वर्षभर तुटवडा जाणवू नये म्हणून केलेली बेगमी असते.

सांगा असतो का कधी मी माझा?

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 25/11/2014 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
एका सामान्य माणसाची आत्मकविता- सांगा असतो का कधी मी माझा? ---------------------- नाही नसतोच कधी मी माझा! नाही नसतोच कधी मी माझा! असतो मी शिक्षकांचा, असतो जेव्हा शाळेमध्ये! असतो मी सवंगडी अन भावंडांचा, खेळतो जेव्हा अंगणामध्ये! असतो मी बाॅसचा, असतो जेव्हा आॅफिसमध्ये! असतो मी कस्टमरचा, असतो जेव्हा व्यवसायामध्ये! असतो मी बायको मुलांचा, असतो जेव्हा घरामध्ये! असतो मी आई वडीलांचा, असतो जेव्हा घरामध्ये! असतो मी मित्रांचा, बसतो जेव्हा त्यांचेमध्ये! असतो मी सैतानाचा, करतो जेव्हा पापकृत्ये! असतो मी देवाचा, करतो जेव्हा पुण्यकर्मे! सांगा मग जन्म ते मृत्यू या मध्ये असतो का कधी मी माझा? मृत्यूनंतर

गांधारेश्वर

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 21/11/2014 03:57 या दिवशी प्रकाशित केले.
चिपळूणला गांधरेश्वर नावाच शंकराच देउळ आहे.मूळ शहरापासून जरा बाजूलाच आहे.वाशिष्ठी नदीकिनारी हे वसलय.माझ एक आवडत देउळ.खर तर देउळ साधास आणि छान आहे.पण त्याभोवतीचा परिसर जास्त रम्य आहे. शंकरच देउळ असल्याने सहाजिकच सोमवारी इथे जरा गर्दी असायची आणि श्रावण सोमवार असेल तर जास्तच.नदीकिनारी असल्याने नदीत उतरायला छोटासा घाट आहे.७/८ पायरया असतील जांभया दगडाच्या.तिथून मस्त नदीच रुंद अस पात्र दिसत.पायरया उतरुन नदीत पाय धुवायचे आणि मग देवाच्या दर्शनाला जायच अस आमच ठरलेल असे.देवळात गेल की आधी छान मांडव आणि मग समोर आधी नंदी आहे.त्याला नमस्कार करून पुढ ४ पायरया उतरुन मग गाभारा आहे.आत शंकराची कळिभोर

सीट

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 20/11/2014 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
(कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची माफी मागून) खचाखच भरलेली बस स्टॉपवर उभी राहून पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, पावलांवर झेलून घे बुटांचे मार इवलसं दुःख पिउन टाक बघ माझी आठवण येते का? रिक्षाने उडणारा धुळीचा लोट अंगावर घे, पदर सांभाळ, हात दाखव इतक करुनही तो नाहीच थांबला तर चालत जा, स्टेशनवर ये तिथे गर्दी उसळलेली असेलच, फलाटावर पाय रोवून उभी रहा सारी गर्दी सरकेल एकाच डब्यात, बघ माझी आठवण येते का? मग चालू लाग, नजरेच्या अगणित सुया टोचून घे चालत रहा टॅक्सी मिळेपर्यंत, ती मिळणार नाहीच, ऑफिसला ये केस सेट करु नकोस, घाम पुसू नकोस, पुन्हा त्याच गॅलरीत ये आता तो तारेवर बसलेला कावळा बघ बघ माझी आठव

जडण-घडण 14

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 20/11/2014 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशवाणीच्या वृत्तकक्षात मी छान रमले होते. विद्यार्थी कधीतरी शंका विचारायला यायचे, शुभेच्छापत्रांसाठी कॉपी रायटिंगही सुरू होतं. घरात बहिणीच्या लग्नाची धामधूम सुरू होती. घरातलं पहिलं कार्य. सगळेच उत्साहात होते. ठरल्याप्रमाणे सगळं छान पार पडलं आणि ती आपल्या नव्या घरी रूळली. आमच्या घरी आम्ही अवघे पाच जण. आई-बाबा आणि आम्ही तीन भावंडं. त्यामुळे ताई लग्न करून गेल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस तिचं नसणं खूप प्रकर्षाने जाणवत राहिलं. घरात आम्हा भावंडांमध्ये कॉलेजमध्ये जाणारी ताई पहिली. त्यातून ती कॉलेजच्या तिसऱ्या वर्षापासून अर्धवेळ नोकरी करायची. तिच्याकडे तिच्या रोजच्या अनुभवांचा खजिना असायचा.

कावळ्यांची शाळा

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 20/11/2014 15:40 या दिवशी प्रकाशित केले.

काकशाला

कावळ्यांची शाळा “ओकांना कावळे आवडते दिसतायत....”! … खरे आहे. पुण्यातल्या ओंकारेश्वराच्या आसपास नदीपार जवळून पास होताना सहज जाता जाता नुकतेच आईच्या अंत्यविधीसाठी जमलो असताना निर्माण झालेले दृष्य डोळ्यासमोर तरळले.

आम्ही अस्पृश्याची पोरे

लेखक देवदत्त परुळेकर यांनी गुरुवार, 20/11/2014 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
विठ्ठलाचा पुत्र रुक्मिणीचा बाळ संन्याशाचे पोर म्हणूनी अस्पृश्य   नका दे‌ऊ अन्न नका दे‌ऊ पाणी नका दे‌ऊ थारा पहा हा अस्पृश्य   सावली पडता दूर हो म्हणती शिव्या शाप देती म्हणती अस्पृश्य   दुषणे ठेविली भिक्षा नाही दिली मुंज नाही केली ठेविले अस्पृश्य   ज्ञानराज श्रेष्ठ भक्तराज श्रेष्ठ योगीराज श्रेष्ठ परि तो अस्पृश्य?   गीता उपदेशी बोले ज्ञानदेवी ज्ञान करी मुक्त परि तो अस्पृश्य?   विठोबाचा प्राण विसोबाचा गुरू नामयाचा बाप परि तो अस्पृश्य?   जनीची साजणी दीनांची मा‌उली संतांची सा‌उली तरी ती अस्पृश्य?
काव्यरस

माणुसकी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 19/11/2014 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना आयुष्य म्हणजे काय ते माहीतही नव्हतं आजूबाजूचे सगळे करतील तेच आणि तसंच करायचं कधी कौतुक व्हायचं कधी दटावणी …. रोज खूप वेगवेगळी स्वप्न बघायचो कधी डॉक्टर तर कधी भाजीवाला …. कोण होणार तू? ह्या प्रश्नाला माझं ठरलेलं उत्तर…."कारकून" अंदाज नव्हता तेव्हा त्याच्या अर्थाचा …आवडायचे म्हणून म्हणायचं ! मग म्हणायचे आधी माणूस हो …. वय वाढतच होतं…. आजूबाजूचे तेच पण त्यांच्या अपेक्षा बदलू लागल्या लहान मुलाचं रुपांतर स्पर्धेच्या घोड्यात झालं होतं … पाठीवर दप्तराच खोगीर आणि डोक्यावर लादलेल्या अपेक्षा दबतच गेली सगळी स्वप्न त्याखाली ….रोज….

जडण-घडण १३

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 10/11/2014 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझी रोजची कामं सुरू होतीच. फ्री लान्सींग बरं चाललं होतं. कंपन्यांना आवश्यकतेनुसार मजकूर द्यावा लागायचा. पण कधी तरी एखाद्या शुभेच्छापत्रांच्या दुकानात शब्द ओळखीचे दिसावेत, उत्सुकतेने कार्ड हातात घ्यावं आणि आपणच लिहिलेला तो मजकूर फार सुसंगत नसलेल्या चित्रासह दिसावा, अशी स्थिती झाली की मन खट्टू व्हायचं. कधी कधी तर मजकूर छापल्यानंतर तो तपासलाही गेलेला नसे. चुकीच्या ठिकाणी तोडलेली वाक्यं, व्याकरणाच्या चुका बघून वाईट वाटायचं. या कामासाठी मी वेगळे पैसे नाही घेणार, असं सांगूनही प्रत्येक वेळी ही तसदी घेतली जायचीच, असंही नव्हतं.