Skip to main content

मुक्तक

माझा मिपाविश्व प्रवेश

लेखक संत घोडेकर यांनी रविवार, 17/07/2016 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण ७-८ वर्ष झाली असतील, ऑफिसमध्ये काम करीत होतो. कंटाळा आला म्हणून शेजारी बसलेल्या सहकाऱ्याशी गप्पा माराव्या म्हणून त्याच्या डेस्क जवळ गेलो. तो हि बहुतेक कंटाळला असावा कारण त्याच्या संगणक पडद्यावर तो एक pdf उघडून कुठली तरी कथा वाचत बसला होता. “ काय रे, हे काय?”, मी विचारले. “अरे छान कथा आहे, अगदी उत्कंठावर्धक. तुला पाठवतो वाचून सांग कशी आहे ते”. त्याने उत्तर दिले. ठीक आहे म्हणून त्याने पाठविलेल्या कथा वाचनात मी गुंग झालो. खरोखरच उत्तम अशी ती कथा होती. “कुठून मिळाली रे कथा, खरेच छान आहे की”. दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये मी त्याला विचारले.

जन का म्हणतिल, 'हाय हाय !'????

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 16/07/2016 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
जन का म्हणतिल, 'हाय हाय !'???? केलेच नाही तर राहिल कार्य काय ? . पोस्टा तळपतिल, फोटु झळकतिल; फेसबुके अपुला क्रम आचरतिल, असेच वाद संवाद पुढे चालतिल, नसशी तु फरक पडेल का? . वाद वर्षतिल, डोके पिकतिल, गेट टुगेदर हे जोरात चालतिल कुणा काळजी की न तळतिल, पुन्हा जिलब्यांचे हे घाणे? . सखेसोयरे डोळे पुसतिल, पुन्हा लेख कविता लिहितिल उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल तु सोडले फेसबुक त्यांचे काय जाय ? . अभासी जगास्तव काय कुढावे ! मोहिं लाईक्स च्या का गुंतावे ? डोके पिकवुनी का विन्मुख व्हावे ? ख-या जगतातील आनंदास???

झोका...

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 06/07/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
कभिन्न अंधार विक्राळ दरीत... विहरतो सूर गंधाराचा... पानाआड कुणी बसले लपून वाराही जपून झोका देई!!.. हासते कुणी ते आडून पानांच्या... अवघा रानांच्या मोहोर मनाला !! अंगावर माझ्या पावसाच्या धारा... लपेटला वारा काळा कुट्ट!!

हायकू (?)

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 03/07/2016 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
दूर डोंगराच्या माथी आले उतरू आभाळ ... झाडावर पानगळ दूर क्षितिजरेषेला फुटे प्रकाशाचा पंख .... मनावर काळा डंख निळ्याशार तळ्याकाठी गूज प्रेमाचे वाजते चैत्रचांदणी लाजते... झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा सूर्यरंग ... ओथंबले ओले अंग

माझ्या मना....

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 02/07/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मना हास जरा कालच्यापेक्षा आज बरा हाही दिवस संपून जाईल नवा उद्या घेऊन येईल आठवणींचे डोस कडू गिळत कुढत नको रडू नवा दिवस साजरा कर आयुष्यात आनंद भर डोळे उघड पहा नीट झटकून टाक सगळा वीट पुसून टाक रात्रीचे भास मोकळा कर दबलेला श्वास कानावरचे काढ हात आतल्या सुराला दे साथ आतला आवाज हाच खरा माझ्या मना हास जरा ऐक आता गाणीच गाणी गालावरचे पूस पाणी अन्यायाची सारी भुते जातील पळून कुठल्या कुठे नवी वेळ अशी येईल खतातून सोने होईल या उद्याचा विचार करा माझ्या मना हास जरा.

आरास...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 02/07/2016 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
ती दुरून दिसली जेव्हा वठलेल्या झाडाखाली मातीच्या गालावरती उमटली लाजिरी लाली... ती थोडी जवळी येता हलकेच हासला वारा गाभाऱ्यात मनाच्या सजविला सुवक देव्हारा... गुंफिली महिरपी ओठी शतताऱ्यांची आरास बरसुनी अंगणी गेली चंद्रचांदण्यांची रास..

परत स्मार्टफोन!

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 01/07/2016 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
(अडीच वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'माझा पहिला स्मार्टफोन' या लेखाचा दुसरा भाग) आधीच्या लेखाचा दुवा खालीलप्रमाणे http://www.misalpav.com/node/27462 कलीयुगातले हजार वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाच्या घड्याळातला एक सेकंद असतो असं म्हणतात. यासारखंच एक नवीन समीकरण आता रुजू झालंय. आपल्या आयुष्यातल्या एका वर्षात तंत्रज्ञान एका युगाने समोर जातंय. या अनुषंगाने मोबाईल क्रांती विषयी बोलायचे झाल्यास, फक्त सहा महिन्यापूर्वी घेतलेला लेटेस्ट स्मार्टफोन तुम्ही अश्मयुगात असल्याची ग्वाही देतो.

सुरज (हिंदी-उर्दू रचना आणि तिचा अनुवाद)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 28/06/2016 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
न जाने क्या है वहाँ जो सुरज रोज सुबह उठकर बिना थके दिन के चारो पहर की सारी सीढीया चढ के ऊपर चला जाता है --- फिर कुछ देर दुनिया की जानिब घूरता रहता है मानो कोई जंग जित ली हो --- कभी कभी लगता है अपने परछाई को हराने का जूनून सवार है उसपे --- ओ सुरज, तुम बडे कब होगे? |-मिसळलेला काव्यप्रेमी-| (२७/०६/२०१६) जानिब = दिशा ---------------------------------------------------------------------- (अनुवाद) असं काय ठेवलंय त्या तिथं, की हा सूर्य रोज म्हणजे अगदी रोज सकाळीसकाळी उठून जराही न थांबता, दिवसाच्या चारी प्रहरांचे जिने चढून हा असा जाऊन बसतो वरती. --- आणि मग थोडा वेळ बघत बसतो एकटक दुनियेच्या पसार्‍या
काव्यरस

पाऊसगाणे...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 26/06/2016 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अंगणात आज वाजे पावसाचा ताशा सोहळ्यात पर्जन्याच्या रुजे उद्याची रे आशा.. माझे घर झाले आज आनंदाने ओलेचिंब दिसे प्रवाही पाण्यात भविष्याचे प्रतिबिंब... माझ्या घरात नाचते पावसाचे स्वैरगाणे आणि त्याच्या तालावर मन विभोर उधाणे... माझ्या मनात गुजते जुन्या पावसाची गाज गेल्या ओल्या दिवसाची सल छळते रे आज...

वाट!

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 26/06/2016 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या पावसात एक फांदी तुटली आपटलीच मग झाडंच कोसळलं धप्पदिशी अजस्त्र सांगाडा जमीनीवर पसरला. कधीकाळी त्यावर किलबिल पक्षी बसायचे आजकाल फक्त कावळेच शतकानुशतके झाड उभं होतं गुण्यागोविंदाने जगत होतं संसार करावा तर झाडासारखा पण एकाएकी खंगूनच गेलं उन्मळून पडावं असं काही राहीलंच नव्हतं तरीही पडलं दु:ख त्याचं नाहीच पण खाली एक कुत्रं बसलं होतं गेलं बिचारं :(
काव्यरस