Skip to main content

मौजमजा

एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.

लेखक जॅक डनियल्स यांनी सोमवार, 05/08/2013 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे ! या लेखमालेपासून मी सापांची ओळख करून देतो आहे. विचार केला की, विषारी सापांपासून श्रीगणेशा करू. सापांची पुस्तकी ओळख-त्यांचे निवास स्थान, मादी किती अंडी घालते, रंगाची रेंज, भक्ष इ.

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 03/08/2013 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १) http://www.misalpav.com/node/25292 ------------------------------------------------------------------------------- ४. अभीराणी उवाच : अभीरमन्युशी माझं लग्न झाल्यावर त्यानं माझं आधीचं 'शतगोणी' हे नाव बदलून 'अभीराणी ' ठेवलं.

" चिऊ चिऊ चिडकी - " (बालगीत)

लेखक विदेश यांनी गुरुवार, 25/07/2013 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
बाळ दिसला हळूच हसला "ये ये" म्हणाला खाऊ घे म्हणाला - चिऊ चिऊ चिडकी बंद खिडकी चोच आपट काचेवर टकटक - बाळाने उघडली चिऊ चिऊ आली लाडूचा खाऊ चोचीने घेऊ - बाळाने मुठीत लाडू लपवला बाळ हळूच खुदकन हसला - चिऊ चिऊ चिडली खाऊसाठी रडली खिडकी बाहेर "चिऊचिऊ" ओरडली ! .
काव्यरस

" आरती कंत्राटदाराची - "

लेखक विदेश यांनी गुरुवार, 25/07/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
' जीव जाई, जीव जाई, कंत्राटदारा थैली झटकुन खड्डेदुरुस्ती करा || साटे लोटे तुमचे जमले असेल आगाऊ रक्कम घेतली असेल लाज शर्म थोडी शिल्लक असेल नैतिकता काही ध्यानीमनी धरा || पावसाळ्यात नेमके खड्डे पडावे सगेसोयरे तुमचे त्यात धडपडावे विरोधी प्रतिनिधीनी गृही ओरडावे खाल्लेल्या पैशावर उपकार करा || अपचन अजीर्ण होऊ देऊ नका डोळ्यावर कुणाच्या तुम्ही येऊ नका आयकरवाले पहा घालतील डाका घरच्या लक्ष्मीची आठवण करा || .
काव्यरस

शेंबूड

लेखक मन यांनी रविवार, 21/07/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
खरेतर "जनातलं मनातलं" ह्या ऐअवजी "जनातलं नाकातलं" ह्या सदरात हा धागा टाकण्याचा विचार होता. नाकातून निघणार्‍या चिकट धाग्यांबद्दल हा धागा आहे असे समजा. . शेंबूड हा सर्वत्र आहे, चराचर मॅमलांत तो भरुन राहिलेला आहे. तो नासिकेत आहे, गळी स्थळी आहे. त्याची एखाद्यावर कृपा झाली तर तो कित्येक दिवस तो तिथेच कृपेचा वर्षाव करितो. तो कुठून येतो, कसा येतो हे मानवास पूर्वी ज्ञात नव्हते. तो संपत कसा नाही ह्याचे त्यास कुतूहल होते. तो नको तेव्हाच कसा येतो ह्या प्रश्नाने भल्याभल्यांचे नक चोंदले गेले गेले होते. तो वहायला लागला की पळता भुई गुळगुळित होते.

माझे चाट जीवन २

लेखक देवांग यांनी सोमवार, 15/07/2013 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझे चाट जीवन १ मी कट्ट्यावर जावून तुषार आणि विवेकला जॉईन झालो. मी एक cutting आणि एक मोठी गोल्ड घेतली… गप्पा चालू झाल्या. तुषार "अंड्या कंपनी कशी आहे? आमची eningeering मुळे पार लागली आहे. submission करून जीव जातो आहे कधी अभ्यास करणार? साल्या तुझे बरे आहे" मी "काय घंटा बरे आहे, मरणाचे काम असते . २४ तास पुरत नाहीत." मी पण दिली ठेवून. तसे हि त्यांना काही माहित नव्हते. त्या मुले टाका टाकीला फुल chance होता. विवेक "हो अंड्या म्हणतो ते खरे आहे, माझा मामे भाऊ पण मार्केटिंग मध्ये आहे.

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 14/07/2013 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

माया ही पात्तळ-१"बेशर्त स्वीकृती"

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 13/07/2013 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
ढीश्श....क्लेमर!!! >>> आंम्हास तसे सर्व काही साधे सरळ रुचते,आणी पचतेही! वेळच आली तर,वेडे/वाकडेही पचवू कदाचित.,,, पण... सरळ होणारे पदार्थ मुद्दाम कोणी जड करून खावयास दिले,आणी वरून मी सांगतो तितके वेळाच चाव,आणी मी म्हणतो तसेच गिळ! असे म्हटले तर ते आमच्या लेखी(इथे लिहायच्या नव्हे! ;) ) गिळगिळीतच होइल. म्हणून आंम्हास "त्यानी" जे सुचविले,ते यांना बोधप्रद होवो,अशी "जड" प्रस्तावना करून ही जिल्बी तळायला-सोडत आहे.

माझे चाट जीवन १

लेखक देवांग यांनी शुक्रवार, 12/07/2013 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज बरोबर १४ दिवसांनी कॅफे मध्ये आलो होतो. द्विधा मनस्थिति होति. परत चाट करावे कि बाबांच्या साईट पहाव्यात. पण एक भीती होती कि विज्याला जर कळले कि परत चाट करतो आहे तर तो सगळ्यांना सांगू शकत होता कि मी गे लोकांशी चाट करतो, किंवा माझ्यात काही तरी प्रोब्लेम झाला आहे. मित्रांना एक आयताच विषय मिळाला असता.त्यामुळे बाबांची साईट पाहायचे पक्के केले आणि पुन्हा एकदा कोपर्यातला कॉम्पुटरवर ताबा घेतला. XXXX बाबा.कॉम लावून बसलो. पण मन लागत नव्हते. सारखे वाटत होते कि परत चाट करावे. परत एकदा नशीब आजमावावे. शेवटी न राहाववून १५ मिनटात बाबा बंद करून MIRC लावले. ह्या वेळेस पुणे चाट च्यनेल जोइन केला.