Skip to main content

मौजमजा

श्यायडी...! :)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 08/05/2013 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या लालबाग-परळचे चाकरमानी C I D ला नेहमीच 'श्यायडी' असं म्हणतात..त्यामुळे तेच शीर्षक योग्य वाटलं.. तर ही C I D नामक एक अत्यंत टंपड परंतु तशी टाईमपास मालिका गेली १५ वर्ष सोनीटीव्ही वर सुरू आहे.. मराठी रंगभूमीवरचा मूळचा अत्यंत गुणी आणि संवेदनशील रंगकर्मी शिवाजी साटम, नानाविध गुन्हेगारांवर वसावसा ओरडण्यापलिकडे फारसं काही करताना गेल्या १५ वर्षात तरी दिसला नाही... ज्युरिस्डिक्शन नावाचा प्रकार नाही. लोकल पोलिस स्टेशन नावाचा प्रकार नाही.

अंधेरी ते वसई..एक छोटेखानी प्रकटन.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 07/05/2013 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
काही स्थानकं आणि काही आठवणी.. आज जरा अंधेरी ते वसई हा पश्चिम रेल्वेचा पट्टा आला डोळ्यासमोर.. अंधेरीची माधुरी दीक्षित..योगीनगर, अंधेरी पूर्व. अगदी योगीनगरच्या गणेशोत्सव मंडळातला माधुरीचा नाचदेखील आम्ही प्रचंड गर्दीत जाऊन पाहिला.. पुढे ती एकदा अंधेरीच्या विजयनगरीतल्या नेहमी चट्टेरेपट्टेरी हाफ प्यँन्ट घालून सा-या विजयनगरीत वावरणा-या गोखल्यांकडे आली होती. सौ गोखले आणि माधुरीची आई म्हणे काहीतरी चुलत की मावस बहिणी-बहिणी.. पुढे माधुरी जाम फेमस झाली आणि मग तिचं गोखल्यांकडे येणंही बंद झालं.. गोखले वारले तेव्हा फक्त ५ मिनिटं कारमधून येऊन चटईवर निजलेल्या गोखल्यांना बघून गेली म्हणे.. माधुरी ६८ सालची.

अंड्याचे फंडे ७ - खादाडी

लेखक साळसकर यांनी मंगळवार, 07/05/2013 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
नाक्यावरच्या भटकंतीची ठरलेली वेळ, संध्याकाळच्याच आसपासची. तोच रस्ता, तीच दुकाने, आजूबाजुला भटकणारी तीच ती माणसं. पण आज संध्याकाळी मात्र एका मुलीला पाणीपुरी खाताना बघत होतो. तुम्ही तर रोजच बघत असाल नाही, पण राव ऐका तर पुढे. भैय्याने पाणीपुरी वाटपासाठी एक प्लेट तिच्या हातात धरताच तिने त्याच्याकडून एक चमचा मागून घेतला. आता त्या पाणीपुरीच्या गाडी कम स्टॉलवर "विठ्ठल शिंदे पाणीपुरीवाला, आमची कुठेही शाखा नाही" असे शुद्ध मराठीत लिहिले असले तरी विठठल भाऊंनी पाणीपुरीवाटप करायला हाताखाली एक भैय्याच ठेवला होता. कारण आपल्याकडे भैय्याचा हात लागल्याशिवाय पाणीपुरीतला खारटपणा जाणवत नाही ना..

कबुतरांची सभा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 06/05/2013 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
पर्वा एका सरकारी हापिसात कामासाठी गेलो होतो आणी नेहमी प्रमाणे वाट बघत ताटकळत उभा होतो. कडेला वाटलं माणसं बोलताहेत पण कबुतरं बोलत होती कालच्या दिवसात काय काय झालं? याचे हिशेब तोलत होती पहिलं दुसर्‍याकडे पाहुन मिष्किलपणे हसत होतं आणी त्यांच्या गमती पाहुन तिसरं मधिच घुसत होतं काल म्हणे पहिल्याला आख्खं कणिस मिळलं पण दुसर्‍यानं धक्का दिला आणी ते हवेतच गळलं थोड्याच वेळात कबुतरांची भली मोठ्ठी सभा भरली आणी आज चरायला कुठं जायचं? यावरच पहिली चर्चा ठरली कुणी म्हणलं किराणा दुकान आजचा पहिला ठराव आहे धान्यात दगडं-खायचा तिथं चांगला सराव आहे. दुसरा म्हणे सरकारि गोडाऊन कशाला मोकळं सोडायचं? पण त्या बेन्
काव्यरस

सांग सांग भोलानाथ.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/05/2013 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
सांग सांग भोलानाथ सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? परवाच कुठेतरी हे गाणं ऐकलं आणि मी एकदम १९७६/७७ सालात पोहोचलो. असेन काहीतरी तिसरी किंवा चवथीत.. तसे आम्ही पयल्यापासनंच आळशी.. निसर्गत:च शाळा-अभ्यासाचा जो कंटाळा येतो तसा तो मलाही यायचा.. नुसती मजा करावी.. आईकडून फक्त छान छान लाड करून घ्यावेत, यथेच्छ खेळा-बागडावं, खाऊ खावा असंच आम्हालाही वाटायचं. म्हणजे एका अर्थी एका नॉर्मल मुलाची जी लक्षणं असतात तीच सगळी माझ्यात होती. मग ही शाळेची भानगड कशाला पायजेल?!..

ओ सजना बरखा बहार आणि एक कुंद दुपार..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/05/2013 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं नांव..? ते जाऊ दे...!. ती वर्गात होती माझ्या. वाणिज्य शाखा तृतीय वर्ष.. आमची वयं असतील विशीच्या घरातली.. वय वर्ष १९-२०..! सालं काय वर्णन करावं त्या वयातल्या तारुण्याचं..? शब्दशः: मंतरलेली वर्ष..! त्या वयात कुठल्या जादुई दुनियेत मन वावरत असतं काय समजत नाय बा.. अशातच ती आली माझ्या त्या स्वप्नांच्या दुनियेत.. स्वप्नांचं त्या वयातलं ते बेधुंद राज्य अन मी त्याचा अभिषिक्त सम्राट..! पण त्या राज्याच्या राणीचं सिंहासन मोकळंच होतं.. वर्गातल्या वर्गात आमच्या नजरा जुळल्या.. 'दिल में कुछ कुछ होता है..

सूरज का सातवाँ घोडा

लेखक मस्त कलंदर यांनी बुधवार, 01/05/2013 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
'सूरज का सातवाँ घोडा' ही धर्मवीर भारती यांची कादंबरी. संकल्पना अशी की, सूर्याच्या रथाला सात घोडे असतात. सहा घोडे चाकोरीबद्ध मार्गाने धावतात. पण सातवा घोडा सर्वात लहान आहे आणि त्यामुळे इतरांच्या गतीने धावू शकत नाही. कदाचित लहान असल्याने अवखळपणे आखलेला मार्ग सोडून धावायची त्याला मुभा आहे. त्यामुळे रथाच्या धावण्याची गती-मार्ग-ध्येय त्याच्यावर अवलंबून आहे. आपापली आयुष्य जगताना कदाचित आपणही असेच सूर्याच्या रथाचे घोडे असू. पण तो सातवा घोडा बनण्याची इच्छा आणि धमक किती जणांत असते?

एकलम खाजा, धोबी राजा.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 30/04/2013 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली च्यामारी गोटे कुठेच मिळत नाहीत.. आमच्या लहानपणी गोटे मिळायचे.. गोट्या नव्हेत.. गोटे. छानसे सिमेन्टने बनवलेले गोल, गु़ळगुळीत गोटे..त्यांना 'ढप' असेही म्हणत..आम्ही सताठ जण मग रोज गोटे खेळायचो.. मातीतच गोट्याच्या आकाराची आणि तेवढीच खोल अशी लहानशी गोलाकार खळी खणायची. त्याला गल किंवा गली म्हणत.. मग सर्वांनी एका ठराविक अंतरावरून त्या गलीच्या दिशेने चकायचं.. ज्याचा गोटा गलीच्या जास्ती जवळ जाईल त्याची पहिली पाळी.. सुरवातीची एकलम खाजाची गल कंपलसरी.. एकलम करण्यापूर्वी वीतेला परवानगी नाही..एकलम झाल्यानंतर मग वीत घेऊन गोटा मारायला परवानगी.. त्यातदेखील वीत ढापणं हा प्रकार असे.

गुंजे बनकर देश राग...

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 26/04/2013 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमची माती आमची माणसं, साप्ताहिकी, अमृतमंथन, प्रतिभा आणि प्रतिमा, छायागीत, गजरा, फक्त शनिवारी आणि रविवारी दाखवले जाणारे मराठी-हिंदी चित्रपट, सुहासिनी मुळगावकर, विनायक चासकर, विनय आपटे, सई परांजपे, अरुण जोगळेकर, अनंत भावे, प्रदिप भिडे अशी अन अनेक गुणी माणसं... वर्ल्ड धीस वीक, चाळ नावाची वाचाळ वस्ती, शोटाइम, हमलोग, नुक्कड, उडान, ये जो है जिंदगी, एक कहानी, सुरभि, बुनियाद, तमस, 'मिले सूर मेरा तुम्हारा', 'बजे सरगम....देश राग', या अवघ्या दोन गाण्यांनी जागवलेली राष्ट्रीय भावना, अशोक चक्रधर संचालित खास होळीनिमित्तचं हिंदी हास्यकविसंमेलन....आणि असे कितीतरी अनेक उत्तम कार्यक्रम....!

(७२ मिनिटांचा हिशोब - पुरूषही काही कमी नाहित)

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 25/04/2013 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारची सकाळ. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. कुठेतरी खोलवर आतवर अंतकरणात दडलेला पुरुषी अहंकार दुखावला गेला होता. तर मित्रांनो काय होती ती बातमी जी आपल्या पुरुषांच्या प्रधानगिरीला आव्हान देणार होती हे ऐकायची तुम्हाला उत्सुकता नक्कीच लागून राहिली असणार. तर ऐका, आपले वाचा, " भारतीय महिला ७२ मिनिटे जास्त काम करतात.