Skip to main content

(देवाने मिपाकरांना अस का बनवल ?)

लेखक दशानन यांनी शनिवार, 28/03/2009 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा ******************* देवाने मिपाकरांना कंपुबाज का बनवल? माझे लेख बघताच प्रत्येकजण माझ्यावर चिडायच सगळ्यांनाच लेख नकोनकोसे वाटायचे मग ५० प्रतिसाद भलत्याच कोणा एकाच्याच लेखाला का पडायचे? कोणाचे सहमत, तर कोणाचे पुलेशु प्रत्येकीची काहीतरी वेगळीच गुणगुण दरीद्री मेली मलाच प्रतिक्रीया देत नाही पाहताच वाजु लागते कामत असल्याची धुन कोणी विडंबुन नकोस करत कोणी बोंबलत खवत शिरत प्रत्येकीची खरड निराळीच असते मग आपली इज्जत कुठे आपल्याजवळ उरते कोणी खरडून गार करत कोणी स्कॅन करुन वार करत किती अदा त्रासवण्याच्या असतात मन हे वेडे प्रत्येक प्रतिसादाला फसत

ताई आणी दादा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 28/03/2009 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
दादा :- या या या , या ताई... ताई :- नमस्कार दादा. कसा आहेस ? दादा :- मी अगदी मनसे मजेत आहे, तु कशी आहेस ? आज अचानक इकडे कसे काय येणे केलेस ? ताई :- अरे दादा, आज गुढीपाडवा, तुला आणी तुझ्या पक्षाला सुयश आणी किर्ती मिळो आणी तुझा पक्ष खुप मोठा होवो अशा शुभेच्छा द्यायला आलिये मी. दादा :- खरच गहिवरुन आले बघ, तुमच्या सारख्यांचे पाठबळ खुप मोलाचे वाटते. ताई :- अरे वरचेवर भेटत नसलो आणी तु आता घर सोडून गेलास म्हणुन काय झाले ? मी मनानी कायम तुझ्याच मागे उभे होते.

माझं कोल्हापुर - भाग १

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 27/03/2009 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
एन एच ४, शिरोळ- सांगली नाक्यावरुन दोन-तीन किलोमिटर दुरवर पंचगंगेच्या ब्रीज नंतर एक उजव्या बाजुला एक कट आहे, तेथेच कोप-यावर तावडे हॊटेल कधी काळी हे टपरी वजा हॊटेल एनएच ४ वरील एक प्रसिध्द जागा. तेथून वळण घेतल्यावर जरा पुढे गेले की आता कमान आहे जी सध्याच म्हणजे आठ-नऊ वर्ष झाली उभी करुन जी महापालिकेने उभारली आहे, लोकमत, पुढारी किंवा तस्म कुठलातरी वर्तमानपत्राची अथवा कंपनीची जाहिरात तुमचे स्वागत करेल, आजूबाजुला शेती व थोडे पुढे गेले तर कोल्हापुर जकात नाका व तुमचा प्रवेश करवीर नगरी, महालक्ष्मीचे निवास स्थान, पैहलवानांची नगरी, कलानगरी कोल्हापुरमध्ये प्रवेश.

*सहल*

लेखक बाकरवडी यांनी गुरुवार, 26/03/2009 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
सहल :- नेहमी मिपा कट्टे केले जातात, सर्व जण आनंदाने त्यात सहभागी होतात. पण त्यापेक्षा वेगळे काहीतरी म्हणून ह्यावेळी मिपाकरांची सहल काढूया का? एक दिवसाची सहल. तुम्हाला काय वाटते ? कोण कोण येणार ? आणि कुठे जायचे ते ठिकाणही सुचवा. मज्जा करूयात.चला तर मग.

"पैज"

लेखक शितल यांनी बुधवार, 25/03/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात एकदाही एखादी ही "पैज" लावली नसेल असा मनुष्य प्राणी शोधुनही सापडणार नाही. काय म्हणता? पटलं नाही? अहो खरंय हे, लावता का पैज ? तर अशा पैजा लावण्यात काही लोक पटाईत असतात, कोणी जिंकण्यात सातत्य दाखवतात तर कोणी हरण्यात पीएचडी करतात. पण खोड काही जात नाही. लहानपणी आम्ही मुलं खेळून झाल्यावर एका कट्यावर बसत असू जिथून ३-४ रस्ते जाताना दिसत असत. बरीच माणसं चालत, गाडीवरून वगैरे जाताना दिसायची. मग तो / ती कोणत्या रस्त्याकडे वळेल यावरून आमच्यात पैजा लागायच्या.

वक्तृत्वाचे कथन..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 25/03/2009 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रमोद काकांच्या कडून प्रेरणा घेऊन.. नमस्कार मंडळी, सगळे जण बालपणीच्या आठवणी सांगताहेत. जुने दिवस सांगताहेत. मग आम्हीही होतोच की लहान.. आम्ही ही बालपण अनुभवलेलं आहेच. भलेही ते व्हेळ्यातल्या दिवसांइतकं थ्रिलिंग नसेल किंवा प्रमोद काकांच्या गीतापठणा इतकं सुरेल आणि खणखणीत नसेल.. पण म्हणून काय आम्ही आमच्या बालपणाच्या आठवणी सांगूच नये की काय्..(पु.लंच्या असामी असामी तल्या "आत्मचरित्र लिहूच नये की काय" च्या चालीत) असो.. !!! तर मंडळी मी एकदा लहान होते.. म्हणजे लहान होते तेव्हा मी नेहमी शाळा-शाळा खेळताना शिक्षिका असायचे आणि बाकी मित्र मंडळ विद्यार्थी. म्हणजे तसा तो अलिखित्(मीच केलेला) नियमच होता.

माझे महान प्रयोग - २

लेखक दशानन यांनी मंगळवार, 24/03/2009 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
माझे महान प्रयोग - १ मागील भाग. सकाळ : ७.१५ मिनिटे नंतर टाईम आसपास ग्रहीत धरा. सतबीरला काल सुट्टी घे म्हणून सांगतले होतेच, त्यानुसार तो सकाळ पासूनच गायब होता + फ्रिज मधील बियर चे कॅन पण. चहाची तलफ होती, त्यामुळे उठल्या उठल्या सरळ किचन मध्ये प्रवेश केला, वरुन कोणीतरी फुले टाकत आहे.. दुरवर कुठे तरी जय हो जय हो चा घोष चालू आहे, कोणी तरी सुगंधी द्रव्य शिपंडत आहे असा काही तरी भास मला जेव्हा मी प्रथम काहीतरी निर्माण करण्यासाठी किचन मध्ये प्रवेश करताना झाला ! माझ्या मते चहा ही एक सोपी कृती आहे, चहा पावडर, साखर व दुध !

माझे महान प्रयोग - १

लेखक दशानन यांनी सोमवार, 23/03/2009 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मागील आठवडा असाच झोपून घालवला, खुप कंटाळा येतो नाही असं बेड वर पडून राहणे, पण ह्या रविवारची सकाळ जरा वेगळीच होती मस्त पैकी अंगात तरतरी जाणवत होती व शक्ती आली आहे असे वाटत होते, त्यामुळे विचार केला चला आज जरा बाहेर पडू, थोडा वेळ बागेत फिरलो, हिरवळीचा आनंद घेतला. रविवार होता त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद होता, , युवक-युवती मस्त पैकी सकाळाच्या कोवळ्या उन्हात गप्पा मारत होते, दोनचार आजोबा टाईप व्यक्तीमहत्वे त्यांच्या कडे चोरून चोरुन पाहत गप्पा मारत होते...

माझं थोबाड... भाग- ०

लेखक दशानन यांनी शनिवार, 21/03/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
" एकदम आपल्या आजोबांवर गेलं आहे नाही बाळ, त्यांच्या सारखच नाक, त्याच्या सारखेच डोळे" - मावशी म्हणाली, मी जेव्हा जन्मलो तेव्हा. (हे परवा परवा मावशीने सांगितले व खालील मामाचा पण संवाद.) " कार्ट, एकदम बाबाच्या वळणावर गेलं आहे, केसं बघ कशी आहेत ह्याची उंदरा सारखी, वसावसा अंगावर येतो, नाही जमनार, ह्याचं व माझं नाही जमणार कधी " मामा.