Skip to main content

मौजमजा

(बोल)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 07/03/2009 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
काहीच का गं कळत नाही तुला माझ्या पोटातलं? नेहमीच तो मोबाइल घेऊन तासन् तास बसायचं! मैत्रिणींना सांगायची ती दुसर्‍यांची लफडी नी कथा जाणशील तरी कधी तु माझ्या पोटातली व्यथा? मला म्हणे फोनवर बोलता येत नाही कधी केला असाच लाडाने तर एक 'हॅलो' पण येत नाही? म्हणे सांगायला कशाला हवं? समजायचं असत ते! काय समजू मी की मेली तुझी भुक आहे? अकलेचे तारे तोडायचं नको बोलू ते सर्व माहीतच आहे पण 'लगेच ठेवुन पोळ्या करते' हे वाक्य काय अवघड आहे ? प्रेरणा: जागुताईंचे बोल

(पाहिजे वीकांत मोठा)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 07/03/2009 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिजे वीकांत मोठा पाहिजे सोडा, टकीला पाहिजे वोडका थोडी पाहिजे पोकर, पसारा होउ दे मग रात्र कितिहि डाव हा खेळून जाउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ मिटुनि तू डोळे तुझे रे पापडी भरपूर खाशी सोबतीला श्रिम्प थोडे तू बशा घेऊन बससी छेडुनी कोणा सखीला हास्यकल्लोळात बुडवु विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ तृप्तता नरड्यात थोडी तृप्तता लीवर् मधेही शांतता विश्वात सार्‍या शांतता खोलीमधेही सटकताना रामप्रहरी काहिशी चलबिचल व्हावी झोपलेल्या बांधवांची थोडिशी चुळबूळ व्हावी सोमवारी ब्याद परते शुक्रवारी चाट देउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ प्रेरणा: मित्रमंडळींचे शुक्रवार-शनिवार-रवि

कंपूबाजी

लेखक घाटावरचे भट यांनी शुक्रवार, 06/03/2009 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूचना : हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील.

माझी खाद्ययात्रा..

लेखक भाग्यश्री यांनी शुक्रवार, 06/03/2009 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
आपण देशाबाहेर, आपल्या गावाबाहेर पडलो की नेहेमीच तिथल्या खादाडीची आठवण काढत असतो! मलाही इथे राहून सतत वैशाली, श्रेयस, अभिषेक,गार्डन कोर्ट..... जाऊदे सगळी लिस्ट नाही लिहीत इथे.. पण या सगळ्यांची सतत आठवण होत असते.. पण इथेही काही खायला मिळत नाही असं थोडीच आहे? इथेही अशी अनेक ठीकाणं आहेत, काही स्पेशल डिशेस आहेत ज्या मला खूप आवडतात.. त्यांची ही कथा! (अमेरिकेत नसणार्‍यांना हा लेख असंबद्ध वाटेल, कारण सगळे इथले लोकल रेफरन्सेस आहेत या लेखात.. मात्र पक्क्या खवैय्यला या गोष्टिने काही फरक पडणार नाही असे वाटते.. आणि इथे नक्कीच खवैय्ये आहेत असं माझं मत असल्याने हा लंबाचौडा लेख तुमच्या भेटीला!! ...

खेळ दोन ओळींचा - ४

लेखक राघव यांनी गुरुवार, 05/03/2009 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मागल्यावेळी सारखाच. फक्त यावेळेस दुसरी ओळ दिलेली आहे अन् पहिली जमवायची आहे! ..... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या ओळीशी निगडीत अशीच पहिली ओळ असायला हवी! शुभेच्छा!! मुमुक्षु

(उगिच भेटली घाटावर ती)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 05/03/2009 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर ओळख सारी धुवून गेली बर्‍याच दिवसांनंतर फेस धवल तोंडाला आला धुके दाटले डोळीं लालकेशरी चार शलाका फुलून आल्या गाली चपलेचाही प्रसाद आला शिवीआरतीनंतर उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर पेकाटाची मोडुन हाडे हाती घेतला हात (वळ्णावरती अवघड इतक्या सहज घातली लाथ) धडपडलो अन् धूम ठोकली मान घातली खाली त्या मौनाचा अर्थ सांगण्या मागे धाउन आली बुक्क्यांची मग उधळ्ण झाली कुठेकुठे ति भयंकर उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर प्रेरणा: पुष्कराज यांना सहज वाटेवर भेटलेली कविता

आम्ही जातो हिमालया.... पार्ट-१

लेखक दशानन यांनी बुधवार, 04/03/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
मार्केट मुळे मी बरबाद झालो... काहींचे काम गेले तर काहीचे ते काम गेले, काहीचीं नोकरी गेली काहींची लंगोटी पण गेली.. मिपावर वेळोवेळी होणा-या अर्थ चर्चे मध्ये हे झालं की हिमालयात जाउ ते झालं की जाऊ चा जो गजर होतं असे ते सर्व झाले, सगळ्यांनी मला बकरा केला व म्हणाले तु दिल्लीचा तुला हिमालय जवळच तुच बघ जमीन आश्रमासाठि.. मी त्यांना हिमालयातील एका अनोळखी जागी आश्रम बांधणे व राहणे ह्यासाठी घेऊ गेलो...

"डुर्र" मच्छराचा त्रास

लेखक सुनील यांनी बुधवार, 04/03/2009 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
"डुर्र" मच्छराचा त्रास ठाणे ४ मार्च २००९ (आमच्या बातमीदाराकडून) - येथिल सुप्रसिद्ध अशा मिसळपाव नावाच्या हॉटेलात सध्या "डुर्र" जातीच्या मच्छराने थैमान घातले आहे, असा आमचा ठाणे येथिल बातमीदार कळवितो. हा मच्छर अगदी नव्या प्रजातीचा असल्यामुळे, त्यावर अक्सर इलाज अद्याप सापडला नसल्याचे समजते.

(कोण म्हणतो रात्र झाली )

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 04/03/2009 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणतो रात्र झाली आताच अमुच्या जेवणाची आता कुठे सुरवात झाली बघुया चला - या फोडणीची नुकतीच टेट्रापॅकमधुनी डालड्याला जाग आली पदरही खोचला हिने अन् जिरे-मिरीची आग झाली प्रियेस माझ्या आजतर मी दगडफुले कित्येक वाहिली हिंग कुटला मी असा की धुंदी आजही राहीली त्याच गंधाने अजुनी जेवणाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण भूक बाकी - कहर आहे! समजून घ्या; खाण्याला, गाण्याला नि विडंबनाला वयाची अट नसते :)