Skip to main content

मौजमजा

ठाणे मिपा कट्टा ( काही विशेष फोटो )

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी गुरुवार, 06/08/2009 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुरूवातीची ओळख परेड ( रामदास , सुहास , श्री ) मास्तर , नितीन थत्ते , मदनबाण . संतोष जोशी , टिंग्या , हर्षद बर्वे. मधे बसलेले " सर्वसाक्षी " हास्य विनोदात रंगलेले सरपंच ( तात्या) सुनील आणि रामदास.

परिक्षण : मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ...

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 27/07/2009 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
"महेश मांजरेकर हे एक जेष्ठ व प्रतिष्ठित सिनेव्यक्तिमत्व आहे का ?” आहे. “महेश मांजरेकर हे उत्कृष्ठ अभिनेते आहेत का ?“ असु शकतात, नक्की सांगता येणार नाही. ते भाई अगर डॊनच्या रोलमध्ये जितके जिवंत वाटतात तितकेच ते शिवाजीमहाराजांच्या अस्थायी वाटतात. अर्थातच हा मतमतांतराचा मुद्दा असु शकतो. “महेश मांजरेकर हे एक उत्कॄष्ट आणि हुशार निर्माते / दिग्दर्शक आहेत का ? “ हो आहेत, हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत.

खुन्नस !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 27/07/2009 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
हे खरंतर (माझंच) नक्कल - चिकट लिखाण (कॉपी-पेस्ट) आहे. आधी एका संकेतस्थळावर प्रकाशित केलेलं. पण म्हटलं मि पा वर लिहायची सुरुवात ह्यानंच करावी. तुका म्हणे त्यातल्या त्यात..... ! नाही हो... ही खुन्नस म्हणजे एकेरी वाहतुकीतून उलट्या बाजूने येणाऱ्या पुणेकराकडे सिग्नल तोडणारा पुणेकर ज्या नजरेने बघतो ती खुन्नस नाही. किंवा हिमेश रेशमिया त्याच्या गाण्यांनी बिचाऱ्या श्रोत्यांवर काढतो तशीदेखील खुन्नस नाही. आपल्याला अभिप्रेत खुन्नस वेगळी आहे. खुन्नस.... तुम्ही म्हणाल अचानक खुन्नस ह्या प्रकाराबद्दल इतकं प्रेम उत्पन्न होण्याचं कारण? ते ही तसं इंटरेस्टिंग आहे.

लांडगे आले रे .... आणि परत गेले

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 27/07/2009 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
बावीस जुलैला सूर्याला लागलेले खग्रास ग्रहण शंभर वर्षातले सर्वात मोठे होते, तसेच चोवीस जुलैला मुंबईच्या समुद्राला शंभर वर्षातली सर्वात मोठी भरती आली होती असे त्या त्या विषयांमधले तज्ज्ञ सांगतात. या दोन्ही गोष्टी आपल्या छोट्या आयुष्यात आपल्याला पहायला मिळाव्यात हे आपले केवढे मोठे भाग्य? असे वाटण्याची शक्यता आहे. त्यांच्यासंबंधीच्या बातम्या, लेख आणि चर्चा वगैरे गोष्टी गेल्या तीन चार महिन्यांपासून सर्व प्रसारमाध्यमांवर येऊ लागल्या होत्या. हळू हळू त्यांची संख्या वाढत गेली आणि तमाम जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल उत्कंठा निर्माण करून ती पध्दतशीरपणे वाढवत नेली गेली.

झडती

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 26/07/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
परवा दूरचित्रवाणी बघताना माजी राष्ट्र्पती ए पी जे अब्दुल कलाम यांची कॉन्टीनेंटल एअरलाईन्सच्या कर्मचार्‍यांनी अवमानकारक पद्धतीने झडती घेतल्याची बातमी बघितली आणि अंगावर सरसरुन काटा आला. अचानक मन भूतकाळात गेले आणि एका जुन्या प्रसंगाची आठवण येवुन मी शहारलो. १९९७ सालच्या जुन महिन्यात ते सगळे सुरु झाले. अरुण गवळीची नुकतीच तुरुंगातुन सुटका झाली होती आणि त्याने अखिल भारतीय सेनेची स्थापनाही केली होती. त्यामुळे राज्यात बरीच राजकीय खळबळ माजली होती.

अंतराळशास्त्रज्ञांना सुचना

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 24/07/2009 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
अंतराळातील कचरा ही समस्या आता लांबून मजा बघण्याच्या पलिकडे गेलेली असल्यामुळे मला राहवले नाही. मी बराच विचार केला व मला दोन मार्ग दिसले ते येणे प्रमाणे- १. अंतराळात उपग्रह सोडतांना त्याला एक वाढीव रॉकेट जोडावे. उपग्रहाचे आयुष्य संपले की, ते वाढीव रॉकेट चालू करुन त्या उपग्रहाला आकाशगंगेच्या दिशेने गति द्यावी. २. येथून पुढे उपग्रह पृथ्वीभोवती न फिरवता चंद्राभोवती अथवा मंगळाभोवती फिरवावे.

अमेरिकन पाट्या!!!!!

लेखक शब्देय यांनी गुरुवार, 23/07/2009 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी पाट्यांच्या पाठोपाठ येत आहेत अमेरिकन पाट्या!!!!! १. हर्शे चॉकलेट पार्क, पेनसिल्वानिया. :X २. एक असेच रस्त्याचे नाव... ( देणारा कंटाळला असावा बिचारा (|: ३. NYSE च्या दारात ONE-WAY अशी पाटी आहे. आत गेलेला $ परत बाहेर येत नसावा. पाटी सार्थ आहे :D टीपः #१ मी स्वतः काढला आहे. # २, # ३ एका मित्राच्या Orkut मधून साभार!